*काही जण गायींना पोळी खाऊ घालतात खास त्यांचेसाठी*
पौर्णिमा असो किंवा अन्य कोणताही दिवस पोळी देऊ नका.
🐂🐄 *गो मातेचे अन्न* 🎋🌾
आपल्या घरी गाय आली की आपण तिला प्रेमाने पोळी-भाकरी खाऊ घालतो, असे चित्र सर्वसाधारणपणे सगळीकडे दिसून येते. गायी सुद्धा प्रेमाने पोळी खातात! पण वास्तव काही वेगळेच आहे, ते असे की पोळी गायीसाठी *जंक फूड* आहे. गायीला कृपया पोळी देऊ नका, *निसर्गाने गायीला शिजवलेले अन्न खायला बनवलेलेच नाही.*
आपण घरात आणलेल्या पालक, मेथी वगैरे भाज्यांमधून आपण आपल्यासाठी पाने ठेवतो आणि बाकी राहिलेले देठ, मुळे फेकून देतो. तुम्हाला जर गाईला, खायला काही द्यायचेच असेल तर उरलेल्या भाज्यांची देठ द्यावीत, तसेच गवत विकत घ्या आणि खायला द्या. दुसरा पर्याय म्हणजे एक रात्र भिजवलेले हरभरे, गहू, तांदूळ, मूग, मटकी द्यावी.
त्यांना पोळी, भाकरी खायला दिली तर त्यांच्या शेणाचा वास माणसाच्या विष्ठेसारखा येतो आणि गाईची पचनसंस्था बिघडते. त्यांच्या पचनसंस्थेमध्ये असलेले बॅक्टेरिया असे अन्न पचवण्यासाठी उपयुक्त नसतात किंवा मदत करत नाहीत. आगीवर स्वयंपाक केल्याने अन्नामध्ये रासायनिक बदल होतो, जो गवत खाणाऱ्या प्राण्यांना पचन संस्थेला मान्य होत नाही.
*निष्पाप प्राण्यांची सेवा करताना, कळत नकळत, त्यांचे आरोग्य बिघडण्याचे कारण बनू नका.*
आपण शिजवलेले अन्न खातो, त्यामुळे विष्ठेला दुर्गंधी येते. जर आपण कच्च्या भाज्या, फळे, म्हणजे सर्व काही कच्च खाल्ल्यास विष्ठेचा वास वेगळा असेल. देवाने ज्या स्वरूपात अन्न दिले आहे, त्याच रुपात गायीला द्यावे, त्यात छेडछाड करू नका.
मी नुकताच शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गोरक्षण संस्थेला भेट दिली. संस्था चालकांनी मला सांगितले की, गेल्या दोन वर्षापासून त्यांनी कुठलेही गोग्रास स्विकारण्यास बंदी घातली आहे. ज्यांना गाईला खाद्य द्यायचे आहे, त्यांना केवळ गवत देता येते. संस्था चालकांनी सांगितले; गोग्रास दिल्याने पूर्वी गाई वारंवार आजारी होत, त्यांच्या पोटात गॅस होई, त्यामुळे त्या अस्वस्थ असत. आता गोग्रस ( वरण, भात, भाजी, पोळी, तळलेले पदार्थ वगैरे केळीच्या पानावर ठेवून गाईला दिलेले अन्न) बंद केल्याने, गाई तंदुरुस्त असतात, आणि औषध कमी लागतात.
*शक्य असल्यास गायीला मका, ज्वारी, बाजरीचा भरडा द्यावा सोबत गूळ द्यावा हे तिचे अत्यंत आवडते आणि तिच्या साठी आरोग्यदायी खाद्य आहे*
No comments:
Post a Comment