⚜🌹⚜🚩🕉🚩⚜🌹⚜
🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻
*२/२*
*सूर्याच्या उपासनेची*
*आज रथसप्तमी*
⚜🌹☀️🚩🛕🚩☀️🌹⚜
*ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों*
*तेजो राशे जगत्पते,*
*अनुकंपयेमां भक्त्या,*
*गृहाणार्घय दिवाकर*
*भारतीय संस्कृती पंचमहाभुताचा आदर करणारी. सर्वात प्राचीन सनातन भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणाचा आनंद प्रदीर्घ टिकणारा असतो. मर्मबंध ठेवींचा ठरतो.*
*आज रथसप्तमी. हळदीकुंकू कार्यक्रमाचा शेवटचा दिवस. महिनाभर घरोघरी हळदीकुंकवाचे कार्यक्रमात नवविवाहितांचे.. बालकांचे हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक सुरु होते.*
*हळदीकुंकू कार्यक्रम हा व्यापक समाज हिताचा. फ्लॅट संस्कृतीत तर फारच गरजेचा. सासर माहेरच जोडणारा नाही तर समाजही जोडणारा कार्यक्रम. महिनाभर सेवन केलेला तिळगुळ आरोग्यदायी ठरलाच पण एकमेकांना दिलेल्या वाणाची आठवण वर्षभर राहणार. घरात कितीही वस्तू असल्या तरीही हे नित्योपयोगी वस्तूंचे वाण वर्षभर आठवण देणारे. अगदी पोस्टकार्ड वाणात दिले तरीही कित्येक नाती जोडली जातात.*
*आज रथसप्तमीला पहाटेच गावोगावच्या नदीत स्नान करुन सूर्याला अर्घ्य दिले जाणार. तो आमचे जीवन तेजोमय करायला रोज येतोय. आज तुळशी वृंदावनासमोर रथ आणि सूर्य अशी रांगोळी काढून त्याचे पूजन..खीर नैवेद्य अर्पण होणार. सूर्य पूजनाचा प्रकार म्हणून देशविदेशात आरोग्यदायी सूर्य नमस्काराचे विक्रम होणार.*
*सूर्य ही आमची देवता. डोळ्याने दिसणारी, कृपेचा अनुभव देणारी ही देवता. सूर्य निरपेक्षपणे अविरत कार्य कसे करावे याचा आदर्श. सूर्य कृपेवरच या चराचराचे जीवन.. भवितव्य अवलंबून आहे. चराचरात आमच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारा हा सूर्य.*
*कोवळी सूर्यकिरणे ही आरोग्य दायी, अनेक रोगापासून मुक्तता देणारी, हे आज विज्ञानाने सिद्ध झालेय. सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे. त्याच्याप्रमाणेच निस्पृह होत स्वयंप्रकाशीत होण्यासाठी प्रेरणा देतो. परप्रकाशीत म्हणजे परावलंबी, तर स्वयंप्रकाशीत.. सामर्थ्यवान.. तेजस्वी होत इतरांचेही जीवन उजळवा हा संदेश सूर्य देतो. आहे.*
*आत्यंतिक सुखाच्या अट्टाहासात होणारी वाटचाल कधीकधी निसर्गचक्रात अडथळा आणते, मग वसुंधराच संकटात सापडते. या वसुंधरेला वाचवायला जावे ते सूर्य देवाकडेच.*
*हे गगनराज, व्योमराज.. भास्कर तुमच्या तेजाने हे भूमंडळ उजळते. तुमची कोटी कोटी किरणे म्हणजे उधळलेले अग्निबाणच. पण आमच्याकडे येताना मात्र अमृत कण होत इथल्या अणूरेणूंना प्रकाशमान करतात. त्या तेजावरच आमचे जनन मरण अवलंबून आहे, तेच नविन साज चढवतात.*
*ज्योती प्रमाणे चमकणारी तुमची मुर्ती आहे. तुमच्या राजसभेत सगळ्या ग्रहांचे मंत्रिमंडळ हजर आहे. हे भास्करा आता तूच या वसुंधरेची लाज राख. पृथ्वीवरचे संकट दूर कर. आमच्या जीवनाचा विकास कर.*
🌹🌞🌹🔆🙏🔆🌹🌞🌹
*तेजोनिधी लोहगोल,*
*भास्कर हे गगनराज*
*दिव्य तुझ्या तेजाने*
*झगमगले भुवन आज*
*हे दिनमणि व्योमराज,*
*भास्कर हे गगनराज*
*कोटी कोटी किरण तुझे*
*अनलशरा उधळिती*
*अमृतकण परि होउन*
*अणुरेणु उजळिती*
*तेजातच जनन मरण,*
*तेजातच नविन साज*
*हे दिनमणि व्योमराज,*
*भास्कर हे गगनराज*
*ज्योतिर्मय मूर्ति तुझी,*
*ग्रहमंडळ दिव्यसभा*
*दाहक परि संजीवक*
*तरुणारुण किरणप्रभा*
*होवो जीवन विकास,*
*वसुधेची राख लाज*
*हे दिनमणि व्योमराज,*
*भास्कर हे गगनराज*
🌷💫🌺☀️🏵☀️🌺💫🌷
*गीत : पुरुषोत्तम दारव्हेकर* ✍️
*संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी*
*स्वर : पं. वसंतराव देशपांडे*
*नाटक : कट्यार काळजात घुसली*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
🚩 *ॐ सूर्याय नमः* 🚩
🌹🙏 *सुमंगल प्रभात* 🙏🌹
*०४.०२.२०२५*
🌻☀️💫🏵🌞🏵💫☀️🌻
No comments:
Post a Comment