छत्रपती शिवरायांची दूर दृष्टी पहा..किल्ले रायगड
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 31 January 2025
हनुमान चालिसा महत्त्व
👆🏻☺️
सत्य घटना
8.15 मिनिट की हनुमान चालीसा के बारे में बहुत ही रोचक जानकारी मुझे ऐसा लगता है कि ये जानकारी सभी को पहली बार प्राप्त हो रही होगी। घर के सभी लोगो को सुनाने लायक ये रोचक वीडियो । 🌹💐👏🏻
कामगार संहितेनुसार नियमावली तयार;
कामगार संहितेनुसार नियमावली तयार;
विधीमंडळ अधिवेशनात नियमावली मांडणार
- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर
नवी दिल्ली दि. 29: महाराष्ट्र शासनाने कामगार संहितेनुसार नियमावली तयार केली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात ही नियमावली मांडण्यात येणार असल्याची, माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कामगार मंत्र्याच्या बैठकीत दिली.
येथील अशोका हॉटेलमध्ये काल आणि आज केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेत सर्व राज्यांच्या कामगार मंत्र्यांची दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री फुंडकर बोलत होते. या बैठकीस केंद्रीय कामगार मंत्री यांच्यासह केंद्रीय राज्य मंत्री शोभा कंरदलाजे, केंद्रीय कामगार विभागाच्या सचिव तसेच विविध राज्यांचे कामगार मंत्री आणि सचिव उपस्थित होते. कामगार मंत्री आकाश फुंडकर उपस्थित होते. तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन , रोजगार राज्य विमा योजनाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे उपस्थित होते.
राज्याचे कामगार मंत्री श्री फुंडकर यांनी संघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) या विषयावरील महत्त्वपूर्ण सत्राची सहअध्यक्षता केली. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री श्री मांडविया होते. यावेळी त्यांनी सांगितले, कामगार संहितांनुसार नियमावली तयार केली असून फेब्रुवारी २०२५ च्या अखेरीस राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ही नियमावली मांडली जाईल, असून मार्चमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात ही नियमावली सादर केली जाईल, अशी माहिती श्री. फुंडकर यांनी दिली.
ईएसआयसीसंदर्भात, श्री. फुंडकर यांनी ईएसआयसी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संलग्न करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले. ईएसआयसी अंतर्गत अधिक लोकांना लाभ देण्यासाठी त्याचे कार्यक्षेत्र वाढविणे, आरोग्यसेवेचे फायदे सुधारणे आणि धोरणात्मक सुधारणांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर श्री. फुंडकर यांनी भर दिला यासाठी केंद्राकडून मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा ही व्यक्त केली.
कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी ही परिषद आयोजित केल्याबद्दल केंद्राचे आभार मानले. यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय आणि संवादाची संस्कृती वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात महाराष्ट्रात असा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छाही श्री फुंडकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी औद्योगिक न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी केंद्राचे सहकार्य मागितले. उद्योगातील कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी प्रशिक्षण संस्थेची आवश्यकता असल्याचे माहिती दिली.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी राज्यात ईएसआयसीच्यावतीने सुरू असलेल्या योजनांची आणि आरोग्य सेवांची माहितीचे संगणकीकृत सादरीकरण केले. राज्य शासनाने कामगार विमा सोसायटी तयार असल्याची माहिती दिली.
स्त्रियांचे कुंकू '
' स्त्रियांचे कुंकू '
एक गोष्ट अशी,
एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडिंगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर. ऑफिसरने विचार केला, एवीतेवी बायको मरणार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी आणण्यास सांगितले. त्यांनी केळी आणली. एक केळं सोलून फाकवून त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले आणि ते केळं त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडिंग थांबले आणि दोन दिवसात त्याची बायको घरात काम करू लागली.
गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशरचा पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अॅबसॉर्ब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते.
मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-४ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले.
आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही.
कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे. कुंकू शुध्द असणे हे फार महत्वाचे आहे.
शुद्ध कुंकू कसे ओळखावे -
१] कुंकवाला हळदीचा वास येतो.
२] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते आणि त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो.
👉🏻 बांगडी, पैंजण आणि जोडवी केवळ सौभाग्याचे वाण नसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
👉🏻 " सोन्याचे दागिने उष्णता आणी चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि शीतलतेचे संतुलन राहते. "
बांगडी घालण्याचे फायदे :-
१) बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताचा रक्तसंचार वाढतो.
२) हे घर्षण उर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.
३) बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व ह्रदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
४) बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते.
५) तुटलेली बांगडी घालू नये, याने नकारात्मक उर्जा वाढते.
जोडवी घालण्याचे फायदे :-
१) विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ श्रृंगाराची वस्तू नाही.
२) दोन्ही पायांत जोडवी घातल्याने शरीरातील
"Hormonal System" योग्यरित्या कार्य करते.
३) जोडवी घालण्याने "Thyroid" चा धोका कमी होतो.
४) जोडवी "Acupressure" उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत होतात.
५) जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळी ही नियमित होते.
पैंजण घालण्याचे फायदे :-
१) पैजण पायातुन निघणारी शारीरिक विद्युत उर्जा शरिरात संरक्षित ठेवते.
२) पैंजण स्त्रियांचे पोट आणि त्यांच्या शरीरातील खालील भागातील "Fat's" कमी करण्यात मदत होते.
३) वास्तुशास्त्रानुसार पैंजणातून येणा-या स्वराने नकारात्मक उर्जा दूर होते.
४) चांदीच्या पैंजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते.
५) पायातील पैंजणामुळे महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पुर्ण करण्यात दिवस घालवून देते.
६) पायात सोन्याचे पैंजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते..
*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा📲*
*(कॉपी पेस्ट)*
अधिक माहितीसाठी खाली लिंक जॉईन करा आणि भरपूर लोकांना शेअर करा*
झिरो प्रीस्क्रिप्शन’ निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करावीमुख
झिरो प्रीस्क्रिप्शन’ निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करावी
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुंबई शहरच्या ६९० कोटीच्या प्रारुप आराखड्यास मान्यता
मुंबई, दि. ३० :- जनतेला दर्जेदार आणि सुलभतेने आरोग्य सुविधा देण्याची शासनाची भूमिका असून या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झिरो प्रिस्क्रिप्शन निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबई शहरचे खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य, लोकप्रतिनिधी, अपर मुख्य सचिव आय एस चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, पोलिस आयुक्त, सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री.शिंदे यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रथम प्राधान्य देण्याचे सूचित करुन केईएम.जे.जे यासह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना बाहेरुन औषध विकत घेण्याची वेळ येऊ नये, यादृष्टीने रुग्णालयामार्फत औषध उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून झिरो प्रिस्किप्शनची अंमलबजावणी तातडीने करण्याचे सूचित केले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या व इतर शासकीय रुग्णालयांमध्ये पूरेशा प्रमाणात एमआरआय, व्हेंटीलेटर, सिटी स्कॅन मशीन्सची सुविधा उपलब्ध ठेवण्याचे सूचित केले. केईएम मधील रुग्णांची संख्या लक्षात घेता त्याठिकाणी तातडीने नवीन अतिरिक्त एमआरआय मशीन खरेदी करण्यात यावे,त्यासाठीची खरेदी प्रक्रिया तातडीने राबवण्यात यावी, जोपर्यंत नवीन मशीन्स येत नाही तोपर्यंत रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी वाडीया,खालसा या रुग्णालयांतून तपासणी सुविधा उपल्ब्ध करुन द्यावी. केईएमच्या खाटांची क्षमता वाढवण्यासाठी त्याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या शताब्दी टॉवर संदर्भात लवकर कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध व्हेंटीलेटर व इतर सुविधांच्या बाबत आढावा घेऊन त्याची पूर्तता करावी. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येतील असे श्री.शिंदे यांनी सांगितले.
मुंबई मधील रस्ते सुव्यवस्थित चांगले ठेवण्यात यावे. रस्त्यांवरील वाहतूक लक्षात घेता फुटपाथवरुन सुरक्षित चालण्याची नागरिकांची जागा मोकळी करावी. पावसळ्यापूर्वी करावयाची कामे युद्धपातळीवर सुरु करण्यात यावी. रस्त्यांची डागडूजी, नालेसफाई या सर्व कामांना आत्ताच सुरवात करावी जेणेकरुन पावसळ्यापूर्वी ती योग्यपद्धतीने पूर्ण होतील. त्याचप्रमाणे लालबाग, माटुंगा, परळ याठिकाणच्या पूलांचे रिसफरिंग करावे. मुंबईतील पर्यावरणाचे संतुलन आणि हवेची गुणवत्ता अबाधित राखण्यास कटाक्षाने लक्ष देण्यात यावे,यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. मुंबई शहरातील सर्व बागांच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेने चांगली संस्था नेमून त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मुंबईच्या स्वच्छेतच्या दृष्टीने पुन्हा डीप क्लिन्सिंग ड्राईव्ह सुरु करण्यात यावे. महापालिकेने ससून डॉक व इतर भागातील कचरा स्वच्छ करावा. सर्व पुलांच्या खालील जागेचे सुशोभिकरण करण्यात यावे. त्याचप्रमाणे पावसळ्यापूर्वीच्या धोकादायक इमारतीच्या दुरुस्ती तसेच पुर्नविकास प्रकल्पांच्या विविध कामांसाठी ट्रान्झींट कॅम्प आवश्यक असून त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मुंबईतील आपल्या घराचे स्वप्न् पूर्ण करण्यासाठी शासन विविध शासकीय गृहनिर्माण संस्थ्याच्या सहकार्याने सर्वांना परवडणारी घरे या संकल्पनेची अंमलबजावणी मोठ्या स्वरुपात करणार असून यामध्ये महिला,विद्यार्थीनी,डबेवाले,गि
मुंबई शहरच्या सन २०२५ -२६ वर्षासाठीच्या एकूण ६९० कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीच्या व्यवस्थापनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद उपलब्ध करून द्यावी. तसेच हवेच्या गुणवत्ता लक्षात घेता मुंबई शहरातील स्मशान भूमीत शवदहनासाठी एलपीजी, सीएनजीची व्यवस्था करावी,असे सूचित केले.
कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी बांग्लादेशी आणि रोहिंग्ये यांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे सूचित केले. तसेच याबाबतच्या समितीचे लवकरात लवकर पुनर्गठन करण्याचे सूचना दिल्या. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन मंडळाच्या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध घुसखोरी संदर्भात उचित कार्यवाही करण्याचे सूचित केले.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ प्रारुप आराखडा
मुंबई शहरामध्ये एकूण ११ मोठी शासकीय रुग्णालय आहे या रुग्णालयांमध्ये मुंबई शहरातील रुग्णांची संख्या व मुंबई शहरा बाहेरील रुग्णांची संख्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर आहे, यामध्ये सर्वसाधारण आजार व गंभीर आजार अशा दोन्ही प्रकारचे सामान्य कुटुंबातील रुग्ण उपचार घेत आहेत, यासाठी रुग्णालयामध्ये औषधोपचार व यंत्रसामग्री तसेच रुग्णालयातील वॉर्डचे आधुनिकीकरण अद्यावतीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी रुपये १३२.४७ कोटीच्या निधीस मान्यता दिली.
मुंबई शहरातील काही भागांमध्ये डोंगर उतारा खाली झोपडपट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून यामध्ये अति सामान्य व गरीब कुटुंबे राहत आहेत यांच्या सुरक्षितेसाठी व संरक्षण अर्थ डोंगर उतारा खाली संरक्षण भिंतीची कामे घेण्यात येत आहे यासाठी रूपये २६.९० कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आली.
शासकीय महाविद्यालयाचा विकास या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील ९ मोठी शासकीय महाविद्यालय मध्ये आवश्यकता सोयी सुविधा व साधन सुविधा तसेच एज्युकेशन अपग्रेशन याकरिता रुपये २५.०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली.
महिला व बालविकास या विभागाअंतर्गत मुंबई शहरातील डेविड ससून डोंगरी उमरखडी येथील बालसुधार गृह इमारतींचे सक्षमीकरण तसेच येथील मैदानांचे सुशोभीकरण व बालक युवकांसाठी इतर क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, यासाठी रुपये १५.२० कोटीच्या निधीस मान्यता दिली. एकात्मिक बाल विकास योजना या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील सर्व अंगणवाडी येथे स्मार्ट अंगणवाडी तयार करण्याचे प्रयोजन आहे तसेच अंगणवाड्यांमध्ये आवश्यकता मूलभूत सुविधा साधन साहित्य साधनसामग्री उपलब्ध करून द्यायचे आहे यासाठी लागणारा आवश्यक निधी रुपये ५.२० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील सर्व कोळीवाड्यांमधील पायाभूत व मूलभूत सुविधांची कामे रंगरंगोटी व सौंदर्यकरण यांची कामे तसेच समुद्रकिनाऱ्यावरील जीटीची बांधकामे व मजबुतीकरण करण्यात येत आहे, यासाठी रुपये ३३.२६ कोटीची रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरामध्ये एकूण ५ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून यामध्ये एक युवतींसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एक अल्पसंख्यांक साठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे येथील यंत्र सामग्री साठी तसेच आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे यासाठी रुपये ८.२५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.
मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी ओपन जिम व शैक्षणिक संस्थांतर्गत असलेले खेळाच्या मैदानाचे सपाटीकरण करून मैदानी तयार करावयाचे आहेत यासाठी रुपये ५.१२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील युवकांना व युवतींना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे काम कौशल्य विकास विभाग करीत आहे, यासाठी रुपये ३.५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील ऐतिहासिक वास्तू एशियाटिक लायब्ररी या ठिकाणी जुन्या पुस्तकांचे जतन करण्यासाठी व त्यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे , यासाठी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत रुपये ०.०२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.
पोलीस व तुरुंग या विभागांना पायाभुत सुविधा पुरविणे यामध्ये पोलीसांना वाहन उपलब्ध करणे, पोलीस वसाहती व पोलीस स्थानके अद्ययावत करणे, पोलीस व तुरूंग या विभागांना साधनसामग्री पुरविणे, जिल्हा रस्ता सुरक्षा उपाय करणे, पोलीस व तुरुंग या विभागांच्या कामांसाठी रूपये ६४.१० कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्हयातील गतिमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत शासकीय कार्यालये व शासकीय निवासी इमारतींची दुरूस्ती करणे तसेच सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी अशा जागांभांवती संरक्षक भिंत बांधणे या कामांसाठी रूपये ४०.३६ कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करणे करीता रूपये ४६.६८ कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील गड-किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके संवर्धन करणे करीता रूपये २०.७० कोटीची निधी मागणी आहे (३% राखीव निधी) मुंबई शहर जिल्हयामध्ये नाविन्यपूर्ण योजना राबविणे करीता रूपये ३१.०५ कोटीची निधी मागणी आहे. (राखीव ४.५% शाश्वत विकास ध्येय १% सह) मुंबई शहर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा) अंतर्गत अपारंपारिक उर्जा विकास करणे करिता रूपये २.८५ कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा धारावी, सायन, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी व कुलाबा क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, येथील मूलभूत व पायाभूत सुविधांसाठी वाढीव निधीची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने रुपये २२५.१९ कोटीची निधी मागणी करण्यात आलेली आहे.
००००
वंदना थोरात/विसंअ
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...