Saturday, 18 January 2025

राज्यातील आयकॉनिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यावरती पर्यटन विभागाने भर द्यावा पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करा -

 राज्यातील आयकॉनिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यावरती पर्यटन विभागाने भर द्यावा

पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. १७ : पर्यटन विभागाने पर्यटन धोरण २०२४ ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी त्याचप्रमाणे पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा चे बळकटीकरण करण्यावर भर द्यावा. केरळच्या धर्तीवर राज्यातही वैद्यकीय पर्यटनासाठी पर्यटन विकास करून  राज्यातील आयकॉनिक  पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर विभागाने भर द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाईअपर मुख्य सचिव नगरविकास असिमकुमार गुप्ता उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव एन.नवीन सोनापर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री  श्री.शिंदे म्हणाले कीपर्यटन विभागाने मंजूर प्राप्त निधीचा १०० टक्के विनियोग करावा. अमृत सांस्कृतिक वारसा हा पालघर परिसरात आदिवासी पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणेसभा मंडप आणि स्कायवॉक पंढरपूर ही कामे प्राधान्याने करावीत. महिलांसाठी राबवण्यात येणारे आई महिला केंद्रित पर्यटन धोरणाची अंमलबजावणी राज्यभर चांगल्या पद्धतीने करा. महिलांचा या धोरणामध्ये सहभाग वाढावा यासाठी जनजागृती करा. केंद्र शासनाच्या सर्व योजना देखील प्रभावीपणे राबवा असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले कीमहाराष्ट्रामध्ये अनेक अशी  पर्यटन स्थळे आहेत जिथे खाजगी गुंतवणूक होऊ शकते. अशी पर्यटन स्थळ विकसित करण्यावर पर्यटन विभागाने भर द्यावा. पर्यटन विभागाने आपली स्वतःची लँड बँक तयार करावी आणि त्यावरती पर्यटन विकासाचा आराखडा बनवा. खागी क्षेत्राच्या सहभागातून जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांनी दर्जेदार सेवा देऊन पर्यटकांचा ओघ राज्यात वाढवण्यासाठी पर्यटन विभागाचे नियोजन असले पाहिजे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीक्रुझ पर्यटनजल पर्यटन,  कॅरा व्हॅन  पर्यटनआदिवासी पर्यटनविंटेज संग्रहालयग्लोबल व्हिलेजकुंभमेळाबेट पर्यटनथीम पार्कबटरफ्लाय पार्कसाहसी पर्यटनलोक संग्रहालयमोबाईल टेंट सिटी अशी नाविन्यपूर्ण पर्यटन उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी पर्यटन विभागाने सूक्ष्म नियोजन करून राज्याच्या  पर्यटन विकासासाठी  प्रयत्न करावेत. नवीन महाबळेश्वर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची मदत घेऊन ही ठिकाणे विकसित करण्यावरती पर्यटन विभागाने समन्वयातून नियोजन करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.

***

तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भ पुढे जाण्यासाठी कॉम्पेक्स प्रदर्शन महत्वाचे ठरेल

 तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भ पुढे जाण्यासाठी कॉम्पेक्स प्रदर्शन महत्वाचे ठरेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø  कॉम्पेक्स-2025 प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांची भेट

Ø  नागपूर एआयचे महत्वाचे केंद्र ठरेल

Ø  राज्यात इनोव्हेशन सिटी तयार होत आहे

 

        नागपूर दि. 17 : परिवर्तन हा जीवनाचा नियम असून तंत्रज्ञान क्षेत्रात हा बदल झपाट्याने होत आहे. कॉम्पेक्स प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भासाठी माहिती तंत्रज्ञानडिजीटल गॅझेटगेमिंग कॉम्पुटींगकृत्रीम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात मोठे दालन उपलब्ध झाले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भाला पुढे घेवून जाण्यासाठी हे आयोजन महत्वाचे ठरत असल्याचे प्रतिपादनमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

            नागपुरातील भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्थेमध्ये (आयआयटी) उभारण्यात आलेले सेंटर ऑफ एक्सलन्स लवकरच एआय मधील महत्वाचे केंद्र ठरेलराज्यात विविध क्षेत्रातील संशोधनासाठी इनोव्हेशन सिटी तयार करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  सांगितले. त्यांनी  सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्सुला शाळेच्या मैदानावर आयोजित तंत्रज्ञान कॉम्पेक्स-2025’ प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. विदर्भ कंम्प्युटर मीडिया डिलर वेलफेयर असोसीएशनचे अध्यक्ष दिनेश नायडूसचिव ललित गांधीउपाध्यक्ष रोहीत जयस्वालकोषाध्यक्ष जयंतीभाई पटेलसहसचिव संजय चौरसीयामाजी अध्यक्ष प्रशांत उगेमुगे यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. यात तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी असून या क्षेत्राविषयी जनतेमध्ये जागरूकता होणे गरजेचे आहे. गेल्या 30 वर्षांपासून कॉम्पेक्स प्रदर्शनाचे नागपुरात सातत्याने होणारे आयोजन हे विदर्भातील आयटी क्षेत्रडिजीटल गॅझेटगेमींगक्लाउड कॉम्प्युटींग आदी क्षेत्राच्या वृद्धीसाठी महत्वाचे ठरत आहे. या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात  रोजगार निर्मीती होत आहे. तरूणांचा अशा आयोजनात सहभाग वाढत आहे. नागपूरसह विदर्भ या आयोजनामुळे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एक पाउल पुढे जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

            तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये  कृत्रीम बुद्धीमत्ता  बदल घडवत आहे. याचा स्वीकार करणे गरजेचे असून राज्य शासनाने गुगल सोबत सामंजस्य करार करून नागपूर आयआयटीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय सुरू केले आहे. येत्या काळात हे देशातील महत्वाचे केंद्र ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या बदलामुळे संशोधनातही काम करण्याची आवश्यकता लक्षात घेता राज्यात इनोव्हेशन सिटी तयार होत आहे. देशात सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून तंत्रज्ञान क्षेत्राची यात महत्वाची भूमिका राहिली आहे. सर्वाधिक युनिकॉनही राज्यातच आहेत. मुंबई ही देशाची अर्थ व तंत्रज्ञान राजधानी ठरत आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            विदर्भ कंम्प्युटर मीडिया डिलर वेलफेयर असोसीएशनचे अध्यक्ष दिनेश नायडू यांनी प्रस्ताविक केले तर सचिव ललित गांधी यांनी आभार मानले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रदर्शनाच्या विविध स्टॉल्सला भेट देवून पाहणी केली. या प्रदर्शनात एकूण 60 स्टॉल्सच्या माध्यमातून संगणकक्लाऊड सोल्युशन्ससायबर सुरक्षेसह अन्य क्षेत्रातील नवकल्पना प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. ग्राफिक्स सोल्युशन्ससीसीटीव्ही आणि क्लाउड  तंत्रज्ञानातील प्रगत उत्पादने व सेवाकृत्रिम बुद्धिमत्ता ट्रेंडतंत्रज्ञानातील करियर व संधी आणि आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी रोजगार आधी विषय  येथे प्रकर्षाने दिसून येतात.

****


Friday, 17 January 2025

पुणे नाहीं ऊने

 🏷️ *सन 754* : पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय'.


🏷️ *सन 993* : 'पुनवडी' हे पुण्याचे नाव पडले.


🏷️ *सन 1600* : मूळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव होते.


🏷️ *सन 1637* : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली - सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या.


🏷️ *सन 1656* : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते.


🏷️ *सन 1663* : मंगळवार पेठ वसली.


🏷️ *सन 1703* : बुधवार पेठ वसली.


🏷️ *सन 1714* : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू.


🏷️ *सन 1721* : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुनर्बांधणी सुरू.


🏷️ *सन 1730* : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला.


🏷️ *सन 1734* : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसवली.


🏷️ *सन 1749* : पर्वतीवरील देवालय बांधले.


🏷️ *सन 1750* : वेताळ पेठ वसवली, कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या.


🏷️ *सन 1755* : नागेश पेठ वसवली. पर्वती तळे बांधले.


🏷️ *सन 1756* : गणेश व नारायण पेठा वसवल्या.


🏷️ *सन 1761* : लकडी पूल बांधण्यात आला.


🏷️ *सन 1769* : सदाशिव व भवानी पेठा वसवल्या गेल्या.


🏷️ *सन 1774* : नाना, रास्ता व घोरपडे पेठा वसवल्या.


🏷️ *सन 1790* : फडणवीस वेस उभारण्यात आली.


🏷️ *सन 1818* : इंग्रजी अंमल सुरू. खडकी कटक स्थापना.


🏷️ *सन 1856* : पुणे-मुंबई लोहमार्ग सुरू झाला. व अभियांत्रिकी काॕलेजची स्थापना.


🏷️ *सन 1857* : पुणे नगरपालिकेची स्थापना.


🏷️ *सन 1869* : सर डेव्हिड ससून रुग्णालय कार्यान्वित.


🏷️ *सन 1875* : संगम (वेलस्ली) पूल वाहतुकीस खुला.


🏷️ *सन 1880* : खडकवासला धरण बांधून पूर्ण.


🏷️ *सन 1881 ते 1891*: मुठा उजवा कालवा खोदण्यात आला.


🏷️ *सन 1884* : डेक्कन कॉलेजची स्थापना.


🏷️ *सन 1885* : फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना.


🏷️ *सन 1886* : पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाला.


🏷️ *सन 1915* : आर्यन चित्रपटगृह सुरू झाले.


🏷️ *सन 1916* : नगरपालिकेने नगररचनेचे काम हाती घेतले.


🏷️ *सन 1915 ते 1925* : लक्ष्मी व टिळक रस्ता तयार व त्यांची सुधारणा.


🏷️ *सन 1919* : पुण्यात भुयारी गटारांची योजना हाती घेण्यात आली.


🏷️ *सन 1921* : पुण्याला वीजपुरवठा सुरू. नव्या पुलाचे बांधकाम.


🏷️ *सन 1941* : सिल्व्हर जुबिली मोटर ट्रान्सपोर्टतर्फे नागरी बससेवा सुरू.


🏷️ *सन 1950* : पुणे महानगरपालिकेची स्थापना. पी.एम.टी.ची बससेवा सुरू.


🏷️ *सन 1952* : पुणे विद्यापीठाची स्थापना.


🏷️ *सन 1953* : पुणे आकाशवाणी केंद्र सुरू.


🏷️ *सन 1961* : पानशेत धरण फुटले.


🏷️ *सन 1973* : सिंहगडावर टी.व्ही. टॉवर सुरू झाला. पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.


मित्रांनो, आपल्या पुण्याची सगळी माहिती आपल्या ग्रुपवर शेयर करा व बाकीच्यांनाही कळू द्या.


➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्र ‘एनएसएस’च्या 12 स्वयंसेवकांचा कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव

 महाराष्ट्र ‘एनएसएस’च्या 12 स्वयंसेवकांचा

कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव

 

नवी दिल्ली दि. 17 : प्रजासत्ताकदिनाच्या पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे 12 आणि गोव्यातील दोन असे एकूण 14 स्वयंसेवक कर्तव्यपथावर तसेच जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भर थंडीत कसून सराव करीत आहेत.

राजधानी दिल्ली येथे 76 व्या प्रजासत्ताक दिन मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएसच्या सराव शिबिराला जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सुरुवात झाली आहे. या सराव शिबिरात देशभरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण 200 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. हे शिबिरार्थीं योगकवायतपरेड संचलन सरावबौद्धिक सत्रसांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

            महाराष्ट्रातील स्वयंसेवकांनी सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यात साजरे होणाऱ्या विविध सणांचे  सादरीकरण केले. याअंतर्गत मकर संक्रातीचे महाराष्ट्रातील महत्व’ या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. याबरोबर 10 ते 12 जानेवारी  रोजी सर्व शिबिरार्थी राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्त भारत मंडपम प्रगती मैदान येथे सहभागी झाले होते.

हे शिबीर 31 जानेवारी 2025 पर्यंत चालणार असून दररोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे सराव करीत आहेतअशी माहिती महाराष्ट्रातून कार्यक्रम अधिकारी म्हणून एनएसएसच्या स्वयंसेवकांसह आलेले डॉ बी. एन. पुरंदरे (कला)श्रीमती एस. जी. गुप्ता (वाणिज्य) व श्रीमती एस. ए. मिठाईवाला (विज्ञान महाविद्यालय)लोनावाळा कॉलेजचे प्राध्यापक डॉ. पवन शिनगारे यांनी दिली.

महाराष्ट्रातील विद्यार्थी - विद्यार्थिनींचा असणार समावेश

महाराष्ट्रातून ‘एनएसएस’चे बारा विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. यातील 11 विद्यार्थी विद्यार्थिनी हे मुख्य पथसंचलनात असणार आहेत. एकूण सहभागी झालेले स्वयंसेवक हे राज्यातील विविध कॉलेजमधून आहेत. सिटी प्रीमियर कॉलेजचा तेजस सोनसरेजळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे कॉलेजचा हरीओम इंगळेनाशिक जिल्ह्यातील ( निफाडलासलगाव ) एन व्ही पी  मंडल्स आर्ट्सकॉमर्ससायन्स कॉलेजचा स्वरूप ठाकरेवर्धा जिल्ह्यातील बजाज कॉलेज ऑफ सायन्सचा गुरु प्रसाद सतोनेमुंबई येथील के सी कॉलेजचाआदित्य चंदोलाविद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधला राहुल धर्मराजकेटीएचएम कॉलेज नाशिक येथील कविता शेवरेभारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वूमन पुणे येथील वेदिका राजेमानेहुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुंदास महिला विज्ञान महाविद्यालय पुणे येथील पूजा बोंडगेमहात्मा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क तलोडा येथील सुनिता उंद्यालाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथील अभिज्ञा  मानुरकरश्री आर एल टी कॉलेज ऑफ सायन्सअकोला येथील लीना आठवले हे विद्यार्थी एनएसएसच्या शिबिरात सराव करीत आहेत.

गोवा राज्यातून दोन स्वयंसेवकांचा समावेश असून विद्या प्रबोधिनी कॉलेज ऑफ कॉमर्स एज्युकेशन कम्प्युटर अँड मॅनेजमेंटपर्वरी येथील फाल्गून प्रीयोळकर आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स खंडोला येथील अक्षता कलासगौदरचा समावेश आहे.

या शिबिरासाठी भारतातून 200 स्वयंसेवक सहभागी झाले असून यामधून 148 स्वयंसेवक कर्तव्यपथ येथे प्रजासत्ताक दिनी पथसंचलन करतील. हा एकूण चमु प्रधानमंत्री यांना आणि राष्ट्रपती यांनाही भेटणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 दावोसमध्ये · 2018 नंतर प्रथमच जाणार · पहिल्या कार्यकाळात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरुन आला होता पहिल्या क्रमांकावर

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 दावोसमध्ये

·         2018 नंतर प्रथमच जाणार

·         पहिल्या कार्यकाळात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरुन आला होता पहिल्या क्रमांकावर

 

मुंबईदि. 17 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी 19 तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे.

यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 3 वेळा दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी झाले होते. औद्योगिक विकासात पाचव्या क्रमांकावरुन महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला होता. राज्यात त्या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्राचे दोन वेळा आयोजन झाले. आताही या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम दावोस दौर्‍यात राहणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. या दौर्‍यात उद्योगमंत्री उदय सामंततसेच एमआयडीसीएमएमआरडीएसिडको अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल.

डेटा सेंटर्सऑटोमोबाईल्ससेमिकंडक्टरईव्हीइलेक्ट्रॉनिक्सस्टीलअन्नप्रक्रियावस्त्रोद्योगऔषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौऱ्यात होणार आहेत. महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून साध्य करण्याचा प्रयत्न होईल. अर्थात प्रामुख्याने यातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.

महाराष्ट्राने विविध प्रकारची धोरणे अलिकडेच जाहीर केली आहेतत्याबाबत सुद्धा ते विविध व्यावसायिक बैठकांमध्ये अवगत करतील आणि त्यातून महाराष्ट्राच्या एकूणच सर्वांगिण विकासाला चालना देतील.

समतोल विकासावर भर : देवेंद्र फडणवीस

राज्यात गुंतवणूक आणताना किंवा पायाभूत सुविधांचा विकास करताना आम्ही सातत्याने चौफेर विकास कसा होईल आणि प्रादेशिक समतोल कसा राखला जाईलयावर भर दिला. या दावोस दौऱ्यात सुद्धा महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक कशी येईलयादृष्टीने आमचे प्रयत्न असतीलअशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

0000


शिवभोजन थाळी योजनेसाठी ५० कोटी ८२ लक्ष रुपयांचा निधी वितरीत

 शिवभोजन थाळी योजनेसाठी 

५० कोटी ८२ लक्ष रुपयांचा निधी वितरीत

 

मुंबईदि. १७ - गरीब व गरजू व्यक्तींना राज्य शासन सवलतीच्या दरात शिवभोजान थाळी उपलब्ध करून देते. या योजनेसाठी डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीसाठी ५० कोटी८२ लाख १२ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने निर्गमित केला आहे.

००००

सर ज.जी. रुग्णालयात हृदय, किडनी व यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यातमू

 सर ज.जी. रुग्णालया हृदयकिडनी व यकृत 

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबईदि. 17 :- सर ज.जी रुग्णालयाचे राज्यात मोठे नाव आहे. या रुग्णालयात हृदयकिडनी व यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी आवश्यक साधने व उपकरणे उपलब्ध करुन दिली जातील. तसेच सर ज. जी. समूह रुग्णालयातील सर्वच वॉर्डचे नूतनीकरण करण्यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईलअसे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

या कार्यक्रमास आमदार मनीषा कायंदेप्रधान सचिव दिनेश वाघमारेवैद्यकीय शिक्षण व  संशोधनचे  आयुक्त राजीव नीवतकरअधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळेवैद्यकीय शिक्षण व  संशोधनचे  संचालक डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ११ कोटी ७४ लाख किमतींच्या कामांचे उद्घाटन आणि 205 कोटी 24 लाख रुपये किमतीच्या कामांचे ई - भूमिपूजन

ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ११ कोटी ७४ लाख किमतींच्या कामांचे उद्घाटन आणि 205 कोटी 24 लाख रुपये किमतीच्या कामांचे ई - भूमिपूजन करण्यात आले.  यामध्ये ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयात ईएनटी विभागऔषधवैद्यकशास्त्रअस्थिव्यंगोपचार कक्षफिजियोलॉजी लेक्चर हॉलचे उद्घाटन आणि महाविद्यालयात नव्याने बांधण्यात येणाऱ्या व नूतनीकरण करण्यात येणाऱ्या इमारतीच्या कामांचा समावेश आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.  मुश्रीफ म्हणालेराज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक यंत्रसामग्री व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. रुग्णालयात येणाऱ्या सामान्य माणसाला उत्तम प्रकारचे उपचार मिळावेत. यासाठी वैद्यकीय महाविद्यालये  व रुग्णालयातील डॉक्टर्सपरिचारिका  यासह सर्वच घटकांनी शासनाच्या आरोग्य योजनांचे दूत म्हणून आपली सेवा बजावावीअसे आवाहनही त्यांनी केले.

श्री. मुश्रीफ म्हणालेशासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णाला रुग्णालयात आपुलकीची वागणूक व सेवा मिळावी. राज्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याबाबत शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.  सर्व जिल्ह्यात अशी रुग्णालये उभारण्यात येणार असून या सुविधांमुळे जटिल आजारांवर अधिक प्रभावी उपचार होऊ शकतील. नागपूर येथील ९ शासकीय महाविद्यालयांमध्ये पीपीपी तत्त्वावर एमआरआयसिटीस्कॅन सेवा सुरू करण्यात येणार आहेत.  वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. याठिकाणी सुरू असलेल्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अवयवदान चळवळीमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे असून मेंदू मृत ( Brain Dead) झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून द्यावेअसेही श्री.  मुश्रीफ म्हणाले.

आमदार मनीषा कायंदेप्रधान सचिव दिनेश वाघमारेआयुक्त राजीव निवतकरसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी मनोगत व्यक्त केले. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी प्रास्ताविक केले. वैद्यकीय अधीक्षक  डॉ. संजय सुरासे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमात अवयवदान कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल डॉ. व्हर्नन वेल्हो,  एका आठवड्यात दोन मूत्र प्रत्यारोपण यशस्वीपणे केल्याबद्धल यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अमोल कांबळेनेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. गीता सेठसीव्हीटीएस विभाग प्रमुख डॉ. आशिष भिवापूरकर यांच्यासह  डॉ. गजानन चव्हाणडॉ.संजय सुरासेडॉ.अरुण राठोड डॉ. पूनम जैस्वालडॉ. चित्रा सेल्वराजसुनील पाटीलराजेंद्र  पुजारीश्रीमती योजना बेलदार श्री.नितीन नवलेसखाराम धुरीसुरेंद्र शिंदे यांचा यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Featured post

Lakshvedhi