Saturday, 18 January 2025

तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भ पुढे जाण्यासाठी कॉम्पेक्स प्रदर्शन महत्वाचे ठरेल

 तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भ पुढे जाण्यासाठी कॉम्पेक्स प्रदर्शन महत्वाचे ठरेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø  कॉम्पेक्स-2025 प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांची भेट

Ø  नागपूर एआयचे महत्वाचे केंद्र ठरेल

Ø  राज्यात इनोव्हेशन सिटी तयार होत आहे

 

        नागपूर दि. 17 : परिवर्तन हा जीवनाचा नियम असून तंत्रज्ञान क्षेत्रात हा बदल झपाट्याने होत आहे. कॉम्पेक्स प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भासाठी माहिती तंत्रज्ञानडिजीटल गॅझेटगेमिंग कॉम्पुटींगकृत्रीम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात मोठे दालन उपलब्ध झाले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भाला पुढे घेवून जाण्यासाठी हे आयोजन महत्वाचे ठरत असल्याचे प्रतिपादनमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

            नागपुरातील भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्थेमध्ये (आयआयटी) उभारण्यात आलेले सेंटर ऑफ एक्सलन्स लवकरच एआय मधील महत्वाचे केंद्र ठरेलराज्यात विविध क्षेत्रातील संशोधनासाठी इनोव्हेशन सिटी तयार करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  सांगितले. त्यांनी  सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्सुला शाळेच्या मैदानावर आयोजित तंत्रज्ञान कॉम्पेक्स-2025’ प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. विदर्भ कंम्प्युटर मीडिया डिलर वेलफेयर असोसीएशनचे अध्यक्ष दिनेश नायडूसचिव ललित गांधीउपाध्यक्ष रोहीत जयस्वालकोषाध्यक्ष जयंतीभाई पटेलसहसचिव संजय चौरसीयामाजी अध्यक्ष प्रशांत उगेमुगे यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. यात तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी असून या क्षेत्राविषयी जनतेमध्ये जागरूकता होणे गरजेचे आहे. गेल्या 30 वर्षांपासून कॉम्पेक्स प्रदर्शनाचे नागपुरात सातत्याने होणारे आयोजन हे विदर्भातील आयटी क्षेत्रडिजीटल गॅझेटगेमींगक्लाउड कॉम्प्युटींग आदी क्षेत्राच्या वृद्धीसाठी महत्वाचे ठरत आहे. या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात  रोजगार निर्मीती होत आहे. तरूणांचा अशा आयोजनात सहभाग वाढत आहे. नागपूरसह विदर्भ या आयोजनामुळे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एक पाउल पुढे जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

            तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये  कृत्रीम बुद्धीमत्ता  बदल घडवत आहे. याचा स्वीकार करणे गरजेचे असून राज्य शासनाने गुगल सोबत सामंजस्य करार करून नागपूर आयआयटीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय सुरू केले आहे. येत्या काळात हे देशातील महत्वाचे केंद्र ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या बदलामुळे संशोधनातही काम करण्याची आवश्यकता लक्षात घेता राज्यात इनोव्हेशन सिटी तयार होत आहे. देशात सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून तंत्रज्ञान क्षेत्राची यात महत्वाची भूमिका राहिली आहे. सर्वाधिक युनिकॉनही राज्यातच आहेत. मुंबई ही देशाची अर्थ व तंत्रज्ञान राजधानी ठरत आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            विदर्भ कंम्प्युटर मीडिया डिलर वेलफेयर असोसीएशनचे अध्यक्ष दिनेश नायडू यांनी प्रस्ताविक केले तर सचिव ललित गांधी यांनी आभार मानले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रदर्शनाच्या विविध स्टॉल्सला भेट देवून पाहणी केली. या प्रदर्शनात एकूण 60 स्टॉल्सच्या माध्यमातून संगणकक्लाऊड सोल्युशन्ससायबर सुरक्षेसह अन्य क्षेत्रातील नवकल्पना प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. ग्राफिक्स सोल्युशन्ससीसीटीव्ही आणि क्लाउड  तंत्रज्ञानातील प्रगत उत्पादने व सेवाकृत्रिम बुद्धिमत्ता ट्रेंडतंत्रज्ञानातील करियर व संधी आणि आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी रोजगार आधी विषय  येथे प्रकर्षाने दिसून येतात.

****


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi