Friday, 20 December 2024

सिम्बॉल ऑफ unity

 जपानमध्ये युद्घाच्या काळात हा मुलगा पाठीवर त्याच्या नुकत्याच मरण पावलेल्या भावाला पाठीशी बांधून पायी चालत होता. आपल्या मेलेल्या भावाला नीट दफन करावं या भावनेने तो दूरवर चालत आला होता. त्याला पाहताच एक सैनिक पुढे आला आणि म्हणाला... प्राण गेलेल्या भावाला पाठीवर घेऊन एवढ्या लांब चालत आहेस...ते ओझे खाली टाकून दे..म्हणजे तुला हलके वाटेल.... त्यावर तो छोटा मुलगा म्हणाला की, हे ओझे नाहीये सर. हा माझा भाऊ आहे..

हे ऐकून त्या सैनिकाच्या डोळ्यांत पाणी तरळले...

      तेव्हा पासून हा फोटो जपानमधे "सिम्बॉल ऑफ unity" म्हणून प्रसिद्ध झाला... "हे ओझे नाहीये सर... हा माझा भाऊ आहे..." हा बोध किती सुंदर आहे... आपले (लहान/मोठे)भाऊ बहीण आपल्यावर ओझे नाहीत... आयुष्याच्या वाटेवर चालताना ते पडले तर त्यांना उचला,  दमले तर आधार द्या,  ते चुका करतील तर त्यांना समजावून सांगा... मोठ्या मनाने माफ करा, आणि जर अख्ख्या जगाने त्यांना दूर लोटले  तर तुम्ही  त्यांना पाठीवर घ्या, कारण ते ओझे नाहीये.... ते तुमचे, स्वतः चे भाऊ/बहिण आहेत...

जेवणावरून स्वभाव

 😀 जेवणावरून स्वभाव 😀


माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत. 

जसे: हस्ताक्षर, सही, दिसणे, काही लकबी, वगैरे वगैरे.

😀

पण कधीकधी असे वाटते की पंगतीत वाढलेले ताट-- 

जेवताना, 

जेवण्याच्या आधी वा 

नंतर ...

जेवणाराची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.

😀

म्हणजे बघा .....


समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे, तेव्हा पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून तो उचलतो.


जसे की,


१) ताटातील गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात.

😀

२) तळण, पापड उचलणाऱ्या आणि पापड लवकर मोडतो अश्या माणसांत, संयम कमी असतो.

😀

३) वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे साधी सरळ असतात, ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.

😀

४) भजी उचलणारी माणसे भज्या सारखीच कुरकुरीत, नर्मविनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात, यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.

😀

५) जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहिभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात.

😀

६) लोणचे कुठले आहे? आंब्याचे, लिंबाचे कां मिक्स? हे पाहणारे आंबटशौकीन असतात.

😀

७) काही सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात ते लोक अतिचिकित्सक असतात.

😀

यात आणखी दोन उपप्रवाह आहेत.


अ) पहिला जेवणाच्या आधी काही प्रतिक्रिया असणारे आणि 

ब) दुसरा जेवणा नंतरची प्रतिक्रिया असणारे.

😀

१) जेवणाच्या आधी ताट, 

भांडी वाढायला सुरुवात झाली की भांडी स्वच्छ आहेत कां नाह?

हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे कां नाही? 

हे बघून त्याची चर्चा करणारे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात . 

अशी माणसे कटकट्या स्वभावाची आणि जुळवून घेणारी नसतात, अशांना मित्रमंडळी कमी किंवा असतीलच तर ते पण याच Category तील असतात.

😀

२) पंगतीत वाढणे सुरु आहे, अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे... 

माझ्या पानात नाही.. 

आत्ताच हवे म्हणून वाढप्याला (चार चार वेळेला) बोलावून वाढवून घेतात, भले त्यांना तो पदार्थ आवडणारा असो वा नसो.

😀

हे लोक मत्सरी असतात. सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .

😀

३) गोड पदार्थ वाढला जात असताना

"मी काय म्हणतो? फक्त बासुंदीच आहे, म्हणजे १६० रुपये ताट! स्वस्त पडले"

असा डायलॉग मारणारे, मुलाकडचे असतात वा अत्यंत व्यवहारी कंजूष मनोवृत्तीचे असतात.

😀

४) जेवणाच्या आधी वा जेवताना जे लोक 

"बाकी सगळे ठीक होते, पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते" 

म्हणणारी अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीची असतात. 

समोर चांगले ताट वाढले आहे. त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.

😀

५) ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतःच आनंदी !

😀

या सर्वांपलिकडे एक विशेष Category आहे.


६)जेवण झाल्यावर 

"ताक आहे का?" म्हणून विचारणार आणि नाही म्हणल्यावर 

"अरेरे, ताक असते ना तर, मजा आली असती." 

असा शेरा मारणारे कुजकटच..!.

आणि ताक नाही म्हटल्यावरही जे गटगटा शेवटचे पाणी पीत अहाहा म्हणत उठणारे मात्र समाधानी असतात..!!

😀😋😀

वाचा आणि ठरवा!

तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता?

😃😃😃

🙏😋🍱😋🙏

प्रत्येक मराठी माणसाचा योग्य मान-सन्मान ठेवणार

 प्रत्येक मराठी माणसाचा योग्य मान-सन्मान ठेवणार

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. 20 :  कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले आंबेडकरांचा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा संबंधित अधिकारी कितीही मोठा असलातरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान-सन्मान’ राज्यात ठेवला जाईलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्य सरकारची भूमिका मांडली. राज्यातल्या जनतेला आश्वस्त करतया प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतीलअसेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

कल्याण येथील योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला मारहाण आणि अन्यायाची बाब पॉईंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.

0000

 


 

कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही

 कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल

कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूरदि. २० : कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केले.

कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम 289 अन्वये चर्चेला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री ॲड. परबशशिकांत शिंदेअरुण उर्फ भाई जगतापसचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीकल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुक्ला हा ‘एमटीडीसी’चा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कार्यवाही सुरू आहे. 

महाराष्ट्रमुंबई ही मराठी माणसाची अस्मिता आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील विविध समाज, समुदाय येत असतात आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक लोक मराठी भाषा उत्तम बोलतातअनेक मराठी सण साजरे करतात. मात्रअशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागतेअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीएखाद्याचा आहार कोणत्या पद्धतीचा, प्रकारचा असावा याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

देशातील वैविध्य टिकले पाहिजेही आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजेच मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहेत्यावर घाला घातल्यास सहन करणार नाहीअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

0000

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई

 बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार,

दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·   बीड घटनेची न्यायालयीन तसेचएसआयटीमार्फत दुहेरी चौकशीपोलीस अधिक्षकांची      

 बदली

·   परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस अधिकारी निलंबित

·   बीडपरभणीतील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत

नागपूरदि. 20 : बीडपरभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईलअशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

बीडपरभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईलअसेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार बीड मध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे.

बीड मधील प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटी मार्फत चौकशी करण्याबरोबर जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करून बीड जिल्ह्यातील भूमाफियावाळूमाफियांसह इतर प्रकारच्या गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढूअशी स्पष्ट भूमिकाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. परभणीत पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांनी वाजवी पेक्षा अधिक पोलीस बळाचा  वापर केला आहे काययाची चौकशी केली जाईलअसेही त्यांनी सांगितले.

बीडपरभणी येथील घटनेसंदर्भात विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीपरभणी जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारताच्या संविधानाचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. त्यामुळे हा अपमान सहन केला जाणार नाही. परभणी येथील कृत्य एका मनोरूग्णाने केले आहे. तो मनोरुग्ण असल्याचा स्पष्ट वैद्यकीय अहवालही उपलब्ध आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. या प्रकरणात कोंबिंग ऑपरेशन झाले नाही. परभणीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा हा सर्वपक्षीय होता. या मोर्चात बांग्लादेशमधील हिंदूंसंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ही हिंदू विरूद्ध दलित अशी दंगल नाही. परभणीत झालेल्या तोडफोडीत दुकानेवाहनेसरकारी कार्यालयांचे नुकसान झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीबीड येथील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. बीडमध्ये आवाडा ग्रीन एनर्जी कंपनीने गुंतवणूक केली आहे. या कंपनीची कामे आम्हालाच द्या किंवा खंडणी द्या अशी मानसिकता काहींची तयार झाली आहे. त्यामुळे बीड प्रकरणातील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. बीड जिल्ह्यातील पोलीसांनी देखील योग्य कारवाई करावी. गुन्हे दाखल करताना वस्तुस्थिती तपासावीअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले

दिलखुलास’ कार्यक्रमात 'राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त' अध्यक्ष न्या. सुरेंद्र तावडे व कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात 'राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त' अध्यक्ष न्या. सुरेंद्र तावडे व  कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांची मुलाखत

 

मुंबई, दि. 20: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त’ राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष, न्या. सुरेंद्र तावडे तसेच मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व  केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दि. 23, मंगळवार दि. 24, बुधवार दि. 25 आणि गुरुवार दि.26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

दरवर्षी 24 डिसेंबर रोजी देशभरात 'राष्ट्रीय ग्राहक दिवस' साजरा केला जातो. ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर सातत्याने काळजी घेण्यात येत आहे. विकसित होणाऱ्या बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात नामांकित ब्रँडस् सहजपणे उपलब्ध होत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहक संरक्षण कायदाही लागू करण्यात आला आहे. ग्राहक  संरक्षण कायदा, त्याअंतर्गत ग्राहकांना कोणते अधिकार व संरक्षण देण्यात येते, ग्राहकांची फसवणूक झाल्यास दाद कुठे व कशी मागायची अशा विविध विषयांची या दिनानिमित्त विस्तृत माहिती राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष, न्या. तावडे व मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष श्री. देशपांडे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. जेष्ठ निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे. 

                                           

ooo

 

 


रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यात 2 हजार 856 कोटी रुपये जमा


रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यात

2 हजार 856 कोटी रुपये जमा

 

मुंबई, दि. 20 : राज्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या बँक खात्यामध्ये सन 2024- 25 मध्ये 2 हजार 856.30 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती रोजगार हमी योजना विभागाकडून देण्यात आली आहे.

            या योजनेंतर्गत 100 दिवसांपर्यंतची मजुरी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून दिली जाते. तर 100 दिवसांच्या वरील मजुरी राज्या शासनाच्या निधीतून दिली जाते. त्यानुसार सन 2024-25 मध्ये 100 दिवसांपर्यंत मजुरीचे 2 हजार 616.30 कोटी निधी आणि 100 दिवसांवरील मजुरीचे 240 कोटी रुपये असा एकूण 2 हजार 856.30 कोटी निधी मजुरांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून सन 2024-25 मध्ये अनुक्रमे 66.21 कोटी व 5.88 कोटी रुपये असा एकूण 72.09 कोटी इतका निधी मजुरीपोटी पालघर जिल्ह्यातील मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आला असल्याची महितीही ‘रोहयो’ विभागाने दिली आहे.

Featured post

Lakshvedhi