Friday, 20 December 2024

प्रत्येक मराठी माणसाचा योग्य मान-सन्मान ठेवणार

 प्रत्येक मराठी माणसाचा योग्य मान-सन्मान ठेवणार

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. 20 :  कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले आंबेडकरांचा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा संबंधित अधिकारी कितीही मोठा असलातरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान-सन्मान’ राज्यात ठेवला जाईलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्य सरकारची भूमिका मांडली. राज्यातल्या जनतेला आश्वस्त करतया प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतीलअसेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

कल्याण येथील योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला मारहाण आणि अन्यायाची बाब पॉईंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.

0000

 


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi