Friday, 20 December 2024

कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही

 कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल

कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूरदि. २० : कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केले.

कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम 289 अन्वये चर्चेला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री ॲड. परबशशिकांत शिंदेअरुण उर्फ भाई जगतापसचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीकल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुक्ला हा ‘एमटीडीसी’चा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कार्यवाही सुरू आहे. 

महाराष्ट्रमुंबई ही मराठी माणसाची अस्मिता आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील विविध समाज, समुदाय येत असतात आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक लोक मराठी भाषा उत्तम बोलतातअनेक मराठी सण साजरे करतात. मात्रअशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागतेअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीएखाद्याचा आहार कोणत्या पद्धतीचा, प्रकारचा असावा याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

देशातील वैविध्य टिकले पाहिजेही आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजेच मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहेत्यावर घाला घातल्यास सहन करणार नाहीअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi