जपानमध्ये युद्घाच्या काळात हा मुलगा पाठीवर त्याच्या नुकत्याच मरण पावलेल्या भावाला पाठीशी बांधून पायी चालत होता. आपल्या मेलेल्या भावाला नीट दफन करावं या भावनेने तो दूरवर चालत आला होता. त्याला पाहताच एक सैनिक पुढे आला आणि म्हणाला... प्राण गेलेल्या भावाला पाठीवर घेऊन एवढ्या लांब चालत आहेस...ते ओझे खाली टाकून दे..म्हणजे तुला हलके वाटेल.... त्यावर तो छोटा मुलगा म्हणाला की, हे ओझे नाहीये सर. हा माझा भाऊ आहे..
हे ऐकून त्या सैनिकाच्या डोळ्यांत पाणी तरळले...
तेव्हा पासून हा फोटो जपानमधे "सिम्बॉल ऑफ unity" म्हणून प्रसिद्ध झाला... "हे ओझे नाहीये सर... हा माझा भाऊ आहे..." हा बोध किती सुंदर आहे... आपले (लहान/मोठे)भाऊ बहीण आपल्यावर ओझे नाहीत... आयुष्याच्या वाटेवर चालताना ते पडले तर त्यांना उचला, दमले तर आधार द्या, ते चुका करतील तर त्यांना समजावून सांगा... मोठ्या मनाने माफ करा, आणि जर अख्ख्या जगाने त्यांना दूर लोटले तर तुम्ही त्यांना पाठीवर घ्या, कारण ते ओझे नाहीये.... ते तुमचे, स्वतः चे भाऊ/बहिण आहेत...
No comments:
Post a Comment