Sunday, 27 October 2024

हसून हसून पोट दुखेल बाबाआजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीनम्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी-🍥

 हसून हसून पोट दुखेल  बाबाआजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीनम्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी-🍥

१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !🍥२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !🍥३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !🍥४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !🍥५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !🍥६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !🍥७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !🍥८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !🍥९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !🍥१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !🍥११) जागा लहान फ़र्निचर महान !🍥१२) उचलला मोबाईल लावला कानाला !🍥१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !🍥१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं 🍥१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !🍥१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी🍥१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !🍥१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !🍥१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला🍥२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !🍥२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !🍥२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !🍥२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !🍥२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना 🍥२६) वशिल्याच्या नोकरीला शिक्षण कशाला२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !🍥२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !🍥२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बराहोता !🍥३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !🍥३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !🍥३३)न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला!🍥३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !🍥३५) पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये !🍥३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !🍥३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही!🍥३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा !🍥३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !🍥४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !🍥४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !🍥४२) घरोघरी मॉडर्न पोरी !🍥४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !🍥४४) नाकापेक्षा चष्मा जड !🍥४५) अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार !🍥४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !🍥४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !🍥४८) काम कमी फाईली फार!🍥४९) लाच घे पण जाच आवर !🍥५०) मंत्र्याच पोर गावाला घोर !🍥५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे !🍥५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !🍥५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !🍥५४) रिकामी मुलगी शृंगार करी!🍥५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !🍥५६) दुरुन पाहुणे साजरे !🍥५७) ऑफीसात प्यून शहाणा !🍥५) सत्ता नको पण खैरनार आवर !🍥५९) एक ना धड भाराभर पक्ष !🍥६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !🍥६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !🍥६२) तोंडाला पदर गावाला गजर !🍥६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !🍥६४) रात्र थोडी डास फार !🍥६५) शिर सलामत तो रोज हजामत ६६) नेता छोठा कटआऊट मोठा !🍥६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!🍥६८) दैव देते आयकर नेत !🍥६९) डीग्री लहान वशिला महान!


करा शेअर...😀😀😀

अणुशक्तीनगर, चेंबूर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. हीरा लाल केंद्रीय निवडणूक निरीक्षक

 अणुशक्तीनगर, चेंबूर विधानसभा मतदारसंघासाठी

डॉ. हीरा लाल केंद्रीय निवडणूक निरीक्षक

 

मुंबई दि 27:- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगाकडून 172- अणुशक्तीनगर आणि 173- चेंबूर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. हीरा लाल (भा.प्र.से 2009) यांची केंद्रीय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. लाल हे उत्तर प्रदेश शासनात जलसंपदा विभागाचे विशेष सचिव तसेच  ग्रेटर शारदा सहाय्यक कमांड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष आणि प्रशासक आहेत.

जनतेला सुशासन देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवांचा वापर करून विविध पदांवर यशस्वीपणे प्रशासन चालवण्याचा डॉ. लाल यांचा दांडगा अनुभव आहे.

'ग्रीन इलेक्शनमॉडेल विकसित करण्यात पुढाकार

लोकसभा निवडणूक-2024 मध्ये सामान्य निरीक्षक म्हणून डॉ. लाल यांनी लोकसभा मतदारसंघ 6-आनंदपूर साहिबरूपनगरपंजाबमध्ये 'ग्रीन इलेक्शनमॉडेल विकसित केले आहे.

मॉडेल गावचे मानद मार्गदर्शक

डॉ. लाल सध्या मॉडेल गावचे मानद मार्गदर्शक देखील आहेत. बांदा येथील जिल्हा दंडाधिकारी म्हणून त्यांनी लोकप्रिय केलेल्या विकासाच्या प्रयोगांवर आधारितमॉडेल गाव ही त्यांची संकल्पना आहे.

पर्यावरणविषयक कामातही आघाडीवर

वातावरणातील बदलांवरील त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले असून हवामान बदलासाठी ग्राउंड ॲक्शन लीडर म्हणूनडॉ. लाल यांनी हवामान बदलामुळे होणारी हानी कमी करण्यासाठी किफायतशीरअंमलात आणण्यास सोपे उपाय विकसित केले आहेत.

*व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं

 *व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं.*


*अत्यंत महत्वपुर्ण लेख*


*आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक 'लाटा' उसळत असतात व कालांतराने त्या ओसरतात... त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात.*


*पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती. प्रत्येक बाल्कनी - टेरेस - अंगणात गव्हांकुर पिकू लागले. कॅन्सर, डायबेटीस, बी.पी. गायब होणार आणि एकदम तंदुरुस्त होणार...!*


*कैक टन गव्हांकुर संपले. मानसिक समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट ओसरली !*


*अल्कली WATER... ह्याची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती. म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार. २० हजार - ३० हजार मशीनची किंमत.. मशीन्स धूळ खात पडली... लाट ओसरली !!*


*सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी, वजन घटणार, बांधा सुडौल होणार, हजारो लिटर मध संपले. हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले. लाट ओसरली !!!*


*मग आली नोनी फळाची लाट. नोनीने नानी आठवली पण तीही लाट नानी व नाना पार्क मधून वैकुंठाला घेऊन गेली.*


*अलोव्हेरा ज्यूस...  सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार.. हजारो बाटल्या खपल्या... विशेष काही बदलले नाही... लाट ओसरली !*


*मग रामदेव बाबांची बिस्किटे आली ५०००करोड चा व्यवसाय झाला. परिस्थिती आहे तीच.*


*मग माधवबागवाले आले. तेल मसाज पंचकर्म करा हृदयाचे ब्लॉक घालवा. राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही. (आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो.)*


*मग आली दिवेकर लाट, मग आली दीक्षित  लहर.*


*आता तर जग दोन भागात विभागले आहे. दार उल दिवेकर आणि दार उल दीक्षित.*


*ही लाट आता उसळ्या घेतेय... ओसरेल लवकरच !!!!!*


*लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय.*


*डोकं वापरा आणि Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा.*


*आणखी थोडं डोकं लावा. आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र. रोजचे शाकाहारी जेवण पालेभाजी, वेलवर्गीय भाजी, फळभाजी, मोडआलेली कडधान्य, सँलड, साजुक तूप, बदलते गोडेतेल, गहूँ, ज्वारी, बाजरी, व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम...*


*पहा काय फरक पडतो. लोकांना शिस्त नकोय... जीभ चटावलीय.. पैसा बोलतोय... "स्वयंपाक नकोय..." आता तर घरपोच... पंधरा मिनीटात...*


*.....आली लाट मारा उड्या.*


*हसत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!!!*


*सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं, दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे. आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे.*


*आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर  सुरुवात करायला काय हरकत आहे?*


*दिर्घायुष्य लाभावं, आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत, या करीता आपला आहार, आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.*


*आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात.*


*या व्यायामात नियमितता व सातत्य असावं. दर दोन-तीन महिन्यांनी व्यायाम प्रकारात बदल जरूर करा.*


*आणि हो,*

*या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा.  ताणतणाविरहित जीवन जगा. ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच  स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल....*


*आजपासून सर्वांनी व्यायाम सुरू करून त्यात सातत्य ठेवावे व सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे हीच सदिच्छा व हार्दिक शुभेच्छा..*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(कॉपी पेस्ट)*

*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*

*

सोलापुर दाते पंचांगानुसार दिपावली मुहूर्त* 🌹

 🌹 *सोलापुर दाते पंचांगानुसार दिपावली मुहूर्त* 🌹



*वसुबारस*  

⭕२८ ऑक्टोबर २०२४ , सोमवार


*धनत्रयोदशी, यमदीपदान*  

⭕२९ ऑक्टोबर २०२४ , मंगळवार


*नरक चतुर्दशी* 

⭕३१ ऑक्टोबर २०२४ , गुरुवार


*लक्ष्मीकुबेर पूजन* 

⭕१ नोव्हेंबर २०२४ , शुक्रवार


*लक्ष्मीपूजन मुहूर्त*  

⭕१ नोव्हेंबर २०२४ , शुक्रवार

*दु. ३ ते ५:१५, सायं. ६ ते ८:३०, रात्री ९:१० ते १०:४५*


*वहीपूजन मुहूर्त* 

⭕२ नोव्हेंबर २०२४ , शनिवार

*पहाटे ४:१० ते ६:४०, सकाळी ८ ते १०:५०*


*यमद्वितीया (भाऊबीज)* 

⭕३ नोव्हेंबर २०२४ , रविवार

मराठी काव्य क्षेत्रातील* *भीष्माचार्यांच्या जन्मदिनाची*

 🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

          *मराठी काव्य क्षेत्रातील*

     *भीष्माचार्यांच्या जन्मदिनाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

                                                                                                                              

🌸🥀🔆🌺📖🌺🔆🥀🌸


    *जन पळभर म्हणतील,* 

    *'हाय हाय !'*

    *मी जातां राहील कार्य काय*

    *सूर्य तळपतील चंद्र झळकतील*  

    *तारे अपुला क्रम आचरतील* 

    *असेच वारे पुढे वाहतील*

    *होईल कांहिं का अंतराय*


        *'मी'. हे सभोवतीचे जग हे माझ्यावरच अवलंबून आहे. उद्या 'मी' नसलो तर ? विचारही करवत नाही. पण रामकृष्णही आले गेले त्याविण जग का ओसची पडले ? जन पळभर दुःख करतील. कामाला लागतील. जगरहाटी कुणासाठी कधी थांबत नाही, हे जीवन सत्य सांगणाऱ्या कवीचा आज जन्मदिन.*

        *भास्कर रामचंद्र तांबे (१८७३-१९४१). जन्म मुंगावली (झाशी जवळ). पण देवास ही त्यांची काव्यभूमी. बालवयात आईने त्यांना अनेक धर्मग्रंथ वाचायला शिकवले. पण बाराव्या वर्षीच पितृछत्र हरपले. पूढे अनेक अडचणींचा सामना केला. गुणवत्ता असूनही शिक्षण सुटले. अनेक नोकऱ्या करुन पूढे ग्वाल्हेरचे दिवाण झाले. 'राजकवी' सन्मान मिळाला.*

        *बालवयातच शाळेतील लेले मास्तरांनी त्यांची प्रतिभा हेरली. संस्कार करुन घडवले. इंग्रजी.. संस्कृत काव्याची माहिती करुन दिली. अमराठी भागातील हे असे कवी की त्यांच्यामुळे मराठीत दिग्गज कवी लाभले. संतकाव्या व्यतिरीक्त आज एवढ्या वर्षानी या अर्वाचीन कवींचे नाव उच्चारताच अनेक कविता.. गाणी पटकन आठवतात. एवढी वर्षे ते अधिराज्यच गाजवताहेत.*         

        *त्यांच्यावर टेनिसन- ब्राउनिंग.. जयदेव.. टागोरांचा प्रभाव होता. शास्त्रीय संगीत रागाचे ज्ञान त्यांना होते. काव्याखाली ते दिनांक.. वृत्त कोणते हे पण लिहायचे. बालकवितेपासून ते नाट्यगीते वरवर सरळ अर्थ वाटणाऱ्या पण गुढ अर्थाच्या, जीवनदर्शन घडविणाऱ्या त्यांच्या सर्वच कविता.. गाणी. त्यांच्या कवितेचा अभ्यास वर्षानुवर्षे होत राहणार आणि त्या आदर्शाने नवनवे समर्थ कवी देशाला सदैव मिळणार. पं. हृदयनाथ यांच्या संगीताने या कवितांना प्रत्येक हृदयी स्थान मिळाले.*

        *"जन पळभर म्हणतील हाय हाय", "डोळे हे जुलमि गडे", "तिनी सांजा सखे मिळाल्या", "तुझ्या गळा माझ्या गळा", "नववधू प्रिया मी बावरते", "मधु मागशी माझ्या", "मावळत्या दिनकरा", "या बाळांनो या रे या", "रे हिंदबांधवा थांब" या आहेत भा. रा. तांबे यांच्या अजरामर कविता. अशा या भीष्माचार्याना जन्मदिनी विनम्र अभिवादन.*

        *पृथ्वीवरील अनुपमेय सर्वांगसुंदर निसर्ग वर्णन असलेली.. त्याचे भावविश्व संपन्न करणारी त्यांची ही कविता.. गाणे.*


🌹⚜️🌸🥀📚🥀🌸⚜️🌹


  *पिवळे तांबुस ऊन कोवळे*

  *पसरे चौफेर*

  *ओढा नेई सोने वाटे* 

  *वाहुनिया दूर*


  *झाडांनी किती मुकुट घातले*

  *डोकीस सोनेरी*

  *कुरणावर शेतात पसरला*

  *गुलाल चौफेरी*


  *हिरवे हिरवेगार शेत हे*

  *सुंदर साळीचे*

  *झोके घेते कसे चहुकडे*

  *हिरवे गालीचे*


  *सोनेरी मखमली रुपेरी*

  *पंख कितिकांचे*

  *रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे*

  *इंद्रधनुष्याचे*


  *अशी अचल फुलपाखरे*

  *फुले साळीस जणु फुलती*

  *साळीवर झोपली जणु का*

  *पाळण्यात झुलती*


  *झुळकन्‌ सुळकन्‌ इकडून तिकडे*

  *किती दुसरी उडती*

  *हिरे माणके पाचू फुटुनी*

  *पंखची गरगरती*


  *पहा पाखरे चरोनी होती*

  *झाडांवर गोळा*

  *कुठे बुडाला पलिकडिल तो*

  *सोन्याचा गोळा*

 

🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹 

  

  *गीत : भा. रा. तांबे*  ✍  

  *संगीत : श्रीधर फडके*

  *स्वर : श्रीधर फडके*

  

  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

              *-२७.१०.२०२४-*


🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻

भक्त नामदेव परिवार पर भगवान् बिठ्ठल की अनुपम कृपा ?

 ।।श्रीगणेशाय नमः।।


भक्त नामदेव परिवार पर भगवान् बिठ्ठल की अनुपम कृपा ?


कन्धे पर कपड़े का थान लादे और हाट-बाजार जाने की तैयारी करते हुए नामदेव जी से पत्नि ने कहा- भगत जी! आज घर में खाने को कुछ भी नहीं है।

आटा, नमक, दाल, चावल, गुड़ और शक्कर सब खत्म हो गए हैं।

शाम को बाजार से आते हुए घर के लिए राशन का सामान लेते आइएगा।


भक्त नामदेव जी ने उत्तर दिया- देखता हूँ जैसी विट्ठल जी की इच्छा ।

अगर कोई अच्छा मूल्य मिला,

तो निश्चय ही घर में आज धन-धान्य आ जायेगा।


पत्नि बोली संत जी! यदि अच्छी कीमत ना भी मिले,

तब भी इस बुने हुए थान को बेचकर कुछ राशन तो ले आना।

घर के बड़े-बूढ़े तो भूख बर्दाश्त कर लेंगे।

पर बच्चे अभी छोटे हैं,

उनके लिए तो कुछ ले ही आना।


जैसी मेरे विट्ठल की इच्छा।

ऐसा कहकर भक्त नामदेव जी हाट-बाजार को चले गए।


बाजार में उन्हें किसी ने पुकारा-- वाह साँई! कपड़ा तो बड़ा अच्छा बुना है और ठोक भी अच्छी लगाई है।

तेरा परिवार बसता रहे।

ये फकीर ठंड में काँप-काँप कर मर जाएगा।

दया करके भगवान् के नाम पर दो चादरों का कपड़ा इस फकीर के ऊपर ओढा़ दे।


भक्त नामदेव जी- दो चादरे में कितना कपड़ा लगेगा फकीर जी!


फकीर ने जितना कपड़ा माँगा,

संयोग से भक्त नामदेव जी के थान में कुल कपड़ा उतना ही था।

और भक्त नामदेव जी ने पूरा थान उस फकीर को दान कर दिया।


दान करने के बाद जब भक्त नामदेव जी घर लौटने लगे तो उनके सामने परिजनों के भूखे चेहरे नजर आने लगे।

फिर पत्नि की कही बात

कि घर में खाने की सब सामग्री खत्म है।

दाम कम भी मिले तो भी बच्चो के लिए तो कुछ ले ही आना।


अब दाम तो क्या,

थान भी दान जा चुका था।

भक्त नामदेव जी एकांत में पीपल की छाँव मे बैठ गए।


जैसी मेरे विट्ठल की इच्छा।

जब सारी सृष्टि की सार पूर्ती वो खुद करता है,

तो अब मेरे परिवार की सार भी वो ही करेगा।

और फिर भक्त नामदेव जी अपने हरि विट्ठल के भजन में लीन गए।


अब भगवान कहां रुकने वाले थे।

भक्त नामदेव जी ने सारे परिवार की जिम्मेवारी अब उनके सुपुर्द जो कर दी थी।


अब भगवान जी ने भक्त जी की झोंपड़ी का दरवाजा खटखटाया।


नामदेव जी की पत्नी ने पूछा- कौन है?


नामदेव का घर यही है ना?

भगवान जी ने पूछा।


अंदर से आवाज हां जी.... यही है,आपको कुछ चाहिये....

भगवान सोचने लगे कि धन्य है नामदेव जी का परिवार घर मे कुछ भी नही है *फिर भी हृदय मे देने की, सहायता की जिज्ञासा है।*


भगवान बोले दरवाजा खोलिये


लेकिन आप कौन?


भगवान जी ने कहा- सेवक की क्या पहचान होती है भगतानी?

जैसे नामदेव जी विट्ठल के सेवक,

वैसे ही मैं नामदेव जी का सेवक हूl


ये राशन का सामान रखवा लो।

पत्नि ने दरवाजा पूरा खोल दिया।

फिर इतना राशन घर में उतरना शुरू हुआ,

कि घर के जीवों की घर में रहने की जगह ही कम पड़ गई।

इतना सामान! नामदेव जी ने भेजा है?

मुझे नहीं लगता।

पत्नी ने पूछा।


भगवान जी ने कहा- हाँ भगतानी! आज नामदेव का थान सच्ची सरकार ने खरीदा है।

जो नामदेव का सामर्थ्य था उसने भुगता दिया।

और अब जो मेरी सरकार का सामर्थ्य है वो चुकता कर रही है।

जगह और बताओ।

सब कुछ आने वाला है भगत जी के घर में।


शाम ढलने लगी थी और रात का अंधेरा अपने पांव पसारने लगा था।


समान रखवाते-रखवाते पत्नि थक चुकी थीं।

बच्चे घर में अमीरी आते देख खुश थे।

वो कभी बोरे से शक्कर निकाल कर खाते और कभी गुड़।

कभी मेवे देख कर मन ललचाते और झोली भर-भर कर मेवे लेकर बैठ जाते।

उनके बाल मन अभी तक तृप्त नहीं हुए थे।


भक्त नामदेव जी अभी तक घर नहीं आये थे,

पर सामान आना लगातार जारी था।


आखिर पत्नी ने हाथ जोड़ कर कहा- सेवक जी! अब बाकी का सामान संत जी के आने के बाद ही आप ले आना।

हमें उन्हें ढूंढ़ने जाना है क्योंकी वो अभी तक घर नहीं आए हैं।


भगवान जी बोले- वो तो गाँव के बाहर पीपल के नीचे बैठकर विट्ठल सरकार का भजन-सिमरन कर रहे हैं।

अब परिजन नामदेव जी को देखने गये


सब परिवार वालों को सामने देखकर नामदेव जी सोचने लगे,

जरूर ये भूख से बेहाल होकर मुझे ढूंढ़ रहे हैं।


इससे पहले की संत नामदेव जी कुछ कहते

उनकी पत्नी बोल पड़ीं- कुछ पैसे बचा लेने थे।

अगर थान अच्छे भाव बिक गया था,

तो सारा सामान संत जी आज ही खरीद कर घर भेजना था क्या?


भक्त नामदेव जी कुछ पल के लिए विस्मित हुए।

फिर बच्चों के खिलते चेहरे देखकर उन्हें एहसास हो गया,

कि जरूर मेरे प्रभु ने कोई खेल खेला है।


पत्नि ने कहा अच्छी सरकार को आपने थान बेचा और वो तो समान घर मे भेजने से रुकता ही नहीं था।

पता नही कितने वर्षों तक का राशन दे गया।

उससे मिन्नत कर के रुकवाया- बस कर! बाकी संत जी के आने के बाद उनसे पूछ कर कहीं रखवाएँगे।


भक्त नामदेव जी हँसने लगे और बोले- ! 


वो सरकार है ही ऐसी।

जब देना शुरू करती है तो सब लेने वाले थक जाते हैं।

उसकी बख्शीश कभी भी खत्म नहीं होती।

वह शक्ति, परम तत्व एक ही है,

उसको किसी भी नाम से पुकारो I

विट्ठल के नाम से, या राम कृष्ण साहेब के नाम से या अन्य किसी नाम से जब तक ईश्वर के बताये मार्ग पर चलोगे नहीं,परोपकार करोगे नहीं, एकाग्रचित् होकर भजन करोगे नही, हमारा अंदर मे बैठा राम, कृष्ण, विट्ठल, साहेब प्रसन्न होने वाले नहीं है।

BLO आणि अत्यावश्यक सेवेतील 33 प्रकारच्या कर्मचाऱ्यांना ( पोलीस, वनविभाग,फायरब्रिगेड,आरोग्य, ट्रेजरी,जेल,पोस्ट इत्यादी ना) पोस्टल बॅलेट बाबत महत्वाची सूचना...

 अत्यंत महत्वाचे/ कालमर्यादीत.. 


*BLO आणि अत्यावश्यक सेवेतील 33 प्रकारच्या कर्मचाऱ्यांना ( पोलीस, वनविभाग,फायरब्रिगेड,आरोग्य, ट्रेजरी,जेल,पोस्ट इत्यादी ना) पोस्टल बॅलेट बाबत महत्वाची सूचना...*📌📢


*● 1] BLO यांना पोस्टल बॅलेट-*


*१. बाहेरील तालुक्यातील (बाहेरच्या मतदारसंघातील) मतदार असलेल्या BLO यांनी पोस्टल बॅलेट साठी - फॉर्म नं 12 भरा*


-ज्या BLO यांचे मतदान त्यांच्या ऑफिस कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या मतदारसंघात आहे , अश्या BLO यांनी पोस्टल बॅलेट साठी कोरा नमुना नं 12 फॉर्म भरून आपण कार्यरत असलेल्या तहसील कार्यालयात जमा करायचा आहे..


*२.स्थानिक कर्मचारी जे BLO आहेत व स्वतः च्या च्या मतदारसंघात BLO म्हणून काम करत आहेत*-  त्यांना खरं तर *फॉर्म नं 12 अ* भरून देणे अपेक्षित आहे, परंतु काही जिल्ह्यात त्यांना मतदान करून मग ड्युटीवर या असे तोंडी आदेश देण्यात येत आहेत, तरी अश्या स्थानिक मतदार असलेल्या BLO नी आपल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करावे.. जर 12 अ (EDC) भरून घेणार असतील तर ते द्यावे अन्यथा आपल्या मूळ बूथ वर मतदान करून मग कार्यस्थळी बूथ वर कामकाजसाठी जावे..


*●2] अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट साठी फॉर्म नं 12 ड सुविधा उपलब्ध..*


 अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी त्यांच्या ड्युटी मुळे मतदानाच्या दिवशी मतदान करण्यास असमर्थ आहेत, अश्या   कर्मचाऱ्यांना फॉर्म 12 ड नुसार पोस्टल बेलेट ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, यात खालील 33 विभागाचे कर्मचारी आहेत.. 


1. मेट्रो


2. रेल्वे वाहतूक (प्रवासी आणि मालवाहतूक) सेवा


3. ज्या प्रसारमाध्यमांना अधिकृत पत्रे देण्यात आली आहेत, ते मतदानाच्या दिवसातील क्रियाकलाप कव्हर करण्यासाठी आयोग आहे


4. विद्युत विभाग


5. बीएसएनएल


6. पोस्ट आणि टेलिग्राम


7. दूरदर्शन


8. ऑल इंडिया रेडिओ


9. राज्य दूध संघ आणि दूध सहकारी संस्था


10. आरोग्य विभाग


11. भारतीय अन्न महामंडळ


12. विमानचालन


13. रस्ते वाहतूक महामंडळ


14. अग्निशमन सेवा


15. वाहतूक पोलीस


16. रुग्णवाहिका सेवा


17. शिपिंग


18. फायर फोर्स


19. जेल


20. अबकारी


21. जल प्राधिकरण


22. ट्रेझरी सेवा


23. वन


24. माहिती आणि जनसंपर्क विभाग


25. पोलीस


26. नागरी संरक्षण आणि गृहरक्षक


27. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार


28. पॉवर


29. भारतीय विमानतळ प्राधिकरण


30. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो


31. PWD विभाग


32. MTNL


33. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातील कर्मचारी)


या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट साठी निवडणूक आयोगाकडून फॉर्म नं 12 ड  नुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे..


दि- 18 ऑक्टोबर 2024 च्या राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी साठी 33 प्रकारच्या ( विभागाच्या) कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत अधिसूचित करण्यात आलेले असून  त्यांना अनुपस्थित मतदार श्रेणीत पोस्टल बेलेट सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.. 


त्यासाठी या सर्व अत्यावश्यक सेवेतील महाराष्ट्रातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांनी पोस्टल बेलेट साठी *फॉर्म नं 12 ड* भरून द्यावा.. फॉर्म 12 ड मधील भाग 1 कर्मचाऱ्यांनी भरावा तर भाग 2 हा नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आलेल्या त्या त्या कार्यालय प्रमुखांनी प्रमाणित करून त्यावर सही शिक्का मारणे अपेक्षित आहे..


त्यानंतर ते सर्व फॉर्म एकत्रितपणे संबंधित कार्यालय प्रमुखांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करायचे आहेत.. 

*सदर फॉर्म 12 ड  निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यापासून 5 दिवसात जमा करणे अपेक्षित आहे , निवडणूक अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी जाहीर झाली आहे त्यामुळे ,  जास्तीत जास्त 28 ते 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत हे फॉर्म आपल्या तहसील कार्यालयात अर्थात  त्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघाच्या तहसील कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करा..* त्याची पोच घ्या.. त्यानंतर संबंधित निवडणूक अधिकारी सदर 12 ड चा पोस्टल मागणी अर्ज तुमच्या गावाकडच्या मूळ मतदारसंघात पाठवतील व तिकडून त्यानंतर तुम्हाला पोस्टल बेलेट येईल.. तुम्हाला मिळालेलं पोस्टल बेलेट घेऊन नंतर तुमच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदान सुविधा केंद्रावर जमा करण्यासाठी जावे लागेल.. त्याशिवाय तुमचं पोस्टल बेलेट च मतदान ग्राह्य असणार नाही.. कुणीही परस्पर आपलं आलेलं पोस्टल बेलेट मतदान करून गावाकडे पोस्टाने जमा करण्यासाठी पाठवू नये.. ती पध्दत आता बंद झालेली आहे..


मिळालेलं पोस्टल बेलेट वर सुविधा केंद्रात नोंद करून व मतदान करून ते जमा करावे लागते, तिथून ते राज्यभर संबंधित विधानसभा निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहचवले जाते.. 


(तथापि ज्यांना प्रत्यक्षात मतदान करायला जाणे शक्य आहे त्यांनी सदर फॉर्म भरू नये..)


सारांश-


*BLO मतदार - फॉर्म नं 12*


*अत्यावश्यक सेवा मतदार फॉर्म 12 ड*


सोबत जोडायचे कागदपत्रे:-


*-मतदान कार्ड XEROX*

*-BLO असल्यास BLO ऑर्डर*

*-अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना फॉर्म 12 ड मधील भाग 2*


सदर पोस्ट सोबत निवडणूक आयोगाची अधिसूचना, फॉर्म नं 12 व 12 ड ची कोरी प्रत तसेच BLO यांना काही जिल्ह्यात सुरू असलेल्या पोस्टल बेलेट बाबत च्या आदेशाची प्रत अशी माहिती सोबत देत आहोत..



फॉर्म 12 / 12 ड काळजीपूर्वक भरा, आपलं यादीतील नाव / मूळ विधानसभा मतदार संघ क्र. नाव / यादी भाग क्र/ यादीतील अनुक्रमांक इत्यादी पहाण्यासाठी खाली निवडणूक आयोगाच्या वेबसाईटची लिंक देत आहोत त्यावर जाऊन माहिती बघा व फॉर्म भरा..


( https://electoralsearch.eci.gov.in/ )



सर्व कर्मचाऱ्यांनी 100% मतदान करुया, लोकशाही बळकट करूया... 

धन्यवाद..


जय हिंद जय महाराष्ट्र..

Featured post

Lakshvedhi