🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*मराठी काव्य क्षेत्रातील*
*भीष्माचार्यांच्या जन्मदिनाची*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🌸🥀🔆🌺📖🌺🔆🥀🌸
*जन पळभर म्हणतील,*
*'हाय हाय !'*
*मी जातां राहील कार्य काय*
*सूर्य तळपतील चंद्र झळकतील*
*तारे अपुला क्रम आचरतील*
*असेच वारे पुढे वाहतील*
*होईल कांहिं का अंतराय*
*'मी'. हे सभोवतीचे जग हे माझ्यावरच अवलंबून आहे. उद्या 'मी' नसलो तर ? विचारही करवत नाही. पण रामकृष्णही आले गेले त्याविण जग का ओसची पडले ? जन पळभर दुःख करतील. कामाला लागतील. जगरहाटी कुणासाठी कधी थांबत नाही, हे जीवन सत्य सांगणाऱ्या कवीचा आज जन्मदिन.*
*भास्कर रामचंद्र तांबे (१८७३-१९४१). जन्म मुंगावली (झाशी जवळ). पण देवास ही त्यांची काव्यभूमी. बालवयात आईने त्यांना अनेक धर्मग्रंथ वाचायला शिकवले. पण बाराव्या वर्षीच पितृछत्र हरपले. पूढे अनेक अडचणींचा सामना केला. गुणवत्ता असूनही शिक्षण सुटले. अनेक नोकऱ्या करुन पूढे ग्वाल्हेरचे दिवाण झाले. 'राजकवी' सन्मान मिळाला.*
*बालवयातच शाळेतील लेले मास्तरांनी त्यांची प्रतिभा हेरली. संस्कार करुन घडवले. इंग्रजी.. संस्कृत काव्याची माहिती करुन दिली. अमराठी भागातील हे असे कवी की त्यांच्यामुळे मराठीत दिग्गज कवी लाभले. संतकाव्या व्यतिरीक्त आज एवढ्या वर्षानी या अर्वाचीन कवींचे नाव उच्चारताच अनेक कविता.. गाणी पटकन आठवतात. एवढी वर्षे ते अधिराज्यच गाजवताहेत.*
*त्यांच्यावर टेनिसन- ब्राउनिंग.. जयदेव.. टागोरांचा प्रभाव होता. शास्त्रीय संगीत रागाचे ज्ञान त्यांना होते. काव्याखाली ते दिनांक.. वृत्त कोणते हे पण लिहायचे. बालकवितेपासून ते नाट्यगीते वरवर सरळ अर्थ वाटणाऱ्या पण गुढ अर्थाच्या, जीवनदर्शन घडविणाऱ्या त्यांच्या सर्वच कविता.. गाणी. त्यांच्या कवितेचा अभ्यास वर्षानुवर्षे होत राहणार आणि त्या आदर्शाने नवनवे समर्थ कवी देशाला सदैव मिळणार. पं. हृदयनाथ यांच्या संगीताने या कवितांना प्रत्येक हृदयी स्थान मिळाले.*
*"जन पळभर म्हणतील हाय हाय", "डोळे हे जुलमि गडे", "तिनी सांजा सखे मिळाल्या", "तुझ्या गळा माझ्या गळा", "नववधू प्रिया मी बावरते", "मधु मागशी माझ्या", "मावळत्या दिनकरा", "या बाळांनो या रे या", "रे हिंदबांधवा थांब" या आहेत भा. रा. तांबे यांच्या अजरामर कविता. अशा या भीष्माचार्याना जन्मदिनी विनम्र अभिवादन.*
*पृथ्वीवरील अनुपमेय सर्वांगसुंदर निसर्ग वर्णन असलेली.. त्याचे भावविश्व संपन्न करणारी त्यांची ही कविता.. गाणे.*
🌹⚜️🌸🥀📚🥀🌸⚜️🌹
*पिवळे तांबुस ऊन कोवळे*
*पसरे चौफेर*
*ओढा नेई सोने वाटे*
*वाहुनिया दूर*
*झाडांनी किती मुकुट घातले*
*डोकीस सोनेरी*
*कुरणावर शेतात पसरला*
*गुलाल चौफेरी*
*हिरवे हिरवेगार शेत हे*
*सुंदर साळीचे*
*झोके घेते कसे चहुकडे*
*हिरवे गालीचे*
*सोनेरी मखमली रुपेरी*
*पंख कितिकांचे*
*रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे*
*इंद्रधनुष्याचे*
*अशी अचल फुलपाखरे*
*फुले साळीस जणु फुलती*
*साळीवर झोपली जणु का*
*पाळण्यात झुलती*
*झुळकन् सुळकन् इकडून तिकडे*
*किती दुसरी उडती*
*हिरे माणके पाचू फुटुनी*
*पंखची गरगरती*
*पहा पाखरे चरोनी होती*
*झाडांवर गोळा*
*कुठे बुडाला पलिकडिल तो*
*सोन्याचा गोळा*
🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹
*गीत : भा. रा. तांबे* ✍
*संगीत : श्रीधर फडके*
*स्वर : श्रीधर फडके*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-२७.१०.२०२४-*
🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻
No comments:
Post a Comment