अत्यंत महत्वाचे/ कालमर्यादीत..
*BLO आणि अत्यावश्यक सेवेतील 33 प्रकारच्या कर्मचाऱ्यांना ( पोलीस, वनविभाग,फायरब्रिगेड,आरोग्य, ट्रेजरी,जेल,पोस्ट इत्यादी ना) पोस्टल बॅलेट बाबत महत्वाची सूचना...*📌📢
*● 1] BLO यांना पोस्टल बॅलेट-*
*१. बाहेरील तालुक्यातील (बाहेरच्या मतदारसंघातील) मतदार असलेल्या BLO यांनी पोस्टल बॅलेट साठी - फॉर्म नं 12 भरा*
-ज्या BLO यांचे मतदान त्यांच्या ऑफिस कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या मतदारसंघात आहे , अश्या BLO यांनी पोस्टल बॅलेट साठी कोरा नमुना नं 12 फॉर्म भरून आपण कार्यरत असलेल्या तहसील कार्यालयात जमा करायचा आहे..
*२.स्थानिक कर्मचारी जे BLO आहेत व स्वतः च्या च्या मतदारसंघात BLO म्हणून काम करत आहेत*- त्यांना खरं तर *फॉर्म नं 12 अ* भरून देणे अपेक्षित आहे, परंतु काही जिल्ह्यात त्यांना मतदान करून मग ड्युटीवर या असे तोंडी आदेश देण्यात येत आहेत, तरी अश्या स्थानिक मतदार असलेल्या BLO नी आपल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करावे.. जर 12 अ (EDC) भरून घेणार असतील तर ते द्यावे अन्यथा आपल्या मूळ बूथ वर मतदान करून मग कार्यस्थळी बूथ वर कामकाजसाठी जावे..
*●2] अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट साठी फॉर्म नं 12 ड सुविधा उपलब्ध..*
अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी त्यांच्या ड्युटी मुळे मतदानाच्या दिवशी मतदान करण्यास असमर्थ आहेत, अश्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 12 ड नुसार पोस्टल बेलेट ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, यात खालील 33 विभागाचे कर्मचारी आहेत..
1. मेट्रो
2. रेल्वे वाहतूक (प्रवासी आणि मालवाहतूक) सेवा
3. ज्या प्रसारमाध्यमांना अधिकृत पत्रे देण्यात आली आहेत, ते मतदानाच्या दिवसातील क्रियाकलाप कव्हर करण्यासाठी आयोग आहे
4. विद्युत विभाग
5. बीएसएनएल
6. पोस्ट आणि टेलिग्राम
7. दूरदर्शन
8. ऑल इंडिया रेडिओ
9. राज्य दूध संघ आणि दूध सहकारी संस्था
10. आरोग्य विभाग
11. भारतीय अन्न महामंडळ
12. विमानचालन
13. रस्ते वाहतूक महामंडळ
14. अग्निशमन सेवा
15. वाहतूक पोलीस
16. रुग्णवाहिका सेवा
17. शिपिंग
18. फायर फोर्स
19. जेल
20. अबकारी
21. जल प्राधिकरण
22. ट्रेझरी सेवा
23. वन
24. माहिती आणि जनसंपर्क विभाग
25. पोलीस
26. नागरी संरक्षण आणि गृहरक्षक
27. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार
28. पॉवर
29. भारतीय विमानतळ प्राधिकरण
30. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो
31. PWD विभाग
32. MTNL
33. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातील कर्मचारी)
या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट साठी निवडणूक आयोगाकडून फॉर्म नं 12 ड नुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे..
दि- 18 ऑक्टोबर 2024 च्या राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी साठी 33 प्रकारच्या ( विभागाच्या) कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत अधिसूचित करण्यात आलेले असून त्यांना अनुपस्थित मतदार श्रेणीत पोस्टल बेलेट सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे..
त्यासाठी या सर्व अत्यावश्यक सेवेतील महाराष्ट्रातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांनी पोस्टल बेलेट साठी *फॉर्म नं 12 ड* भरून द्यावा.. फॉर्म 12 ड मधील भाग 1 कर्मचाऱ्यांनी भरावा तर भाग 2 हा नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आलेल्या त्या त्या कार्यालय प्रमुखांनी प्रमाणित करून त्यावर सही शिक्का मारणे अपेक्षित आहे..
त्यानंतर ते सर्व फॉर्म एकत्रितपणे संबंधित कार्यालय प्रमुखांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करायचे आहेत..
*सदर फॉर्म 12 ड निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यापासून 5 दिवसात जमा करणे अपेक्षित आहे , निवडणूक अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी जाहीर झाली आहे त्यामुळे , जास्तीत जास्त 28 ते 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत हे फॉर्म आपल्या तहसील कार्यालयात अर्थात त्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघाच्या तहसील कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करा..* त्याची पोच घ्या.. त्यानंतर संबंधित निवडणूक अधिकारी सदर 12 ड चा पोस्टल मागणी अर्ज तुमच्या गावाकडच्या मूळ मतदारसंघात पाठवतील व तिकडून त्यानंतर तुम्हाला पोस्टल बेलेट येईल.. तुम्हाला मिळालेलं पोस्टल बेलेट घेऊन नंतर तुमच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदान सुविधा केंद्रावर जमा करण्यासाठी जावे लागेल.. त्याशिवाय तुमचं पोस्टल बेलेट च मतदान ग्राह्य असणार नाही.. कुणीही परस्पर आपलं आलेलं पोस्टल बेलेट मतदान करून गावाकडे पोस्टाने जमा करण्यासाठी पाठवू नये.. ती पध्दत आता बंद झालेली आहे..
मिळालेलं पोस्टल बेलेट वर सुविधा केंद्रात नोंद करून व मतदान करून ते जमा करावे लागते, तिथून ते राज्यभर संबंधित विधानसभा निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहचवले जाते..
(तथापि ज्यांना प्रत्यक्षात मतदान करायला जाणे शक्य आहे त्यांनी सदर फॉर्म भरू नये..)
सारांश-
*BLO मतदार - फॉर्म नं 12*
*अत्यावश्यक सेवा मतदार फॉर्म 12 ड*
सोबत जोडायचे कागदपत्रे:-
*-मतदान कार्ड XEROX*
*-BLO असल्यास BLO ऑर्डर*
*-अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना फॉर्म 12 ड मधील भाग 2*
सदर पोस्ट सोबत निवडणूक आयोगाची अधिसूचना, फॉर्म नं 12 व 12 ड ची कोरी प्रत तसेच BLO यांना काही जिल्ह्यात सुरू असलेल्या पोस्टल बेलेट बाबत च्या आदेशाची प्रत अशी माहिती सोबत देत आहोत..
फॉर्म 12 / 12 ड काळजीपूर्वक भरा, आपलं यादीतील नाव / मूळ विधानसभा मतदार संघ क्र. नाव / यादी भाग क्र/ यादीतील अनुक्रमांक इत्यादी पहाण्यासाठी खाली निवडणूक आयोगाच्या वेबसाईटची लिंक देत आहोत त्यावर जाऊन माहिती बघा व फॉर्म भरा..
( https://electoralsearch.eci.gov.in/ )
सर्व कर्मचाऱ्यांनी 100% मतदान करुया, लोकशाही बळकट करूया...
धन्यवाद..
जय हिंद जय महाराष्ट्र..
No comments:
Post a Comment