Sunday, 27 October 2024

अणुशक्तीनगर, चेंबूर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. हीरा लाल केंद्रीय निवडणूक निरीक्षक

 अणुशक्तीनगर, चेंबूर विधानसभा मतदारसंघासाठी

डॉ. हीरा लाल केंद्रीय निवडणूक निरीक्षक

 

मुंबई दि 27:- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगाकडून 172- अणुशक्तीनगर आणि 173- चेंबूर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. हीरा लाल (भा.प्र.से 2009) यांची केंद्रीय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. लाल हे उत्तर प्रदेश शासनात जलसंपदा विभागाचे विशेष सचिव तसेच  ग्रेटर शारदा सहाय्यक कमांड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष आणि प्रशासक आहेत.

जनतेला सुशासन देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवांचा वापर करून विविध पदांवर यशस्वीपणे प्रशासन चालवण्याचा डॉ. लाल यांचा दांडगा अनुभव आहे.

'ग्रीन इलेक्शनमॉडेल विकसित करण्यात पुढाकार

लोकसभा निवडणूक-2024 मध्ये सामान्य निरीक्षक म्हणून डॉ. लाल यांनी लोकसभा मतदारसंघ 6-आनंदपूर साहिबरूपनगरपंजाबमध्ये 'ग्रीन इलेक्शनमॉडेल विकसित केले आहे.

मॉडेल गावचे मानद मार्गदर्शक

डॉ. लाल सध्या मॉडेल गावचे मानद मार्गदर्शक देखील आहेत. बांदा येथील जिल्हा दंडाधिकारी म्हणून त्यांनी लोकप्रिय केलेल्या विकासाच्या प्रयोगांवर आधारितमॉडेल गाव ही त्यांची संकल्पना आहे.

पर्यावरणविषयक कामातही आघाडीवर

वातावरणातील बदलांवरील त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले असून हवामान बदलासाठी ग्राउंड ॲक्शन लीडर म्हणूनडॉ. लाल यांनी हवामान बदलामुळे होणारी हानी कमी करण्यासाठी किफायतशीरअंमलात आणण्यास सोपे उपाय विकसित केले आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi