*व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं.*
*अत्यंत महत्वपुर्ण लेख*
*आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक 'लाटा' उसळत असतात व कालांतराने त्या ओसरतात... त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात.*
*पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती. प्रत्येक बाल्कनी - टेरेस - अंगणात गव्हांकुर पिकू लागले. कॅन्सर, डायबेटीस, बी.पी. गायब होणार आणि एकदम तंदुरुस्त होणार...!*
*कैक टन गव्हांकुर संपले. मानसिक समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट ओसरली !*
*अल्कली WATER... ह्याची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती. म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार. २० हजार - ३० हजार मशीनची किंमत.. मशीन्स धूळ खात पडली... लाट ओसरली !!*
*सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी, वजन घटणार, बांधा सुडौल होणार, हजारो लिटर मध संपले. हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले. लाट ओसरली !!!*
*मग आली नोनी फळाची लाट. नोनीने नानी आठवली पण तीही लाट नानी व नाना पार्क मधून वैकुंठाला घेऊन गेली.*
*अलोव्हेरा ज्यूस... सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार.. हजारो बाटल्या खपल्या... विशेष काही बदलले नाही... लाट ओसरली !*
*मग रामदेव बाबांची बिस्किटे आली ५०००करोड चा व्यवसाय झाला. परिस्थिती आहे तीच.*
*मग माधवबागवाले आले. तेल मसाज पंचकर्म करा हृदयाचे ब्लॉक घालवा. राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही. (आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो.)*
*मग आली दिवेकर लाट, मग आली दीक्षित लहर.*
*आता तर जग दोन भागात विभागले आहे. दार उल दिवेकर आणि दार उल दीक्षित.*
*ही लाट आता उसळ्या घेतेय... ओसरेल लवकरच !!!!!*
*लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय.*
*डोकं वापरा आणि Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा.*
*आणखी थोडं डोकं लावा. आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र. रोजचे शाकाहारी जेवण पालेभाजी, वेलवर्गीय भाजी, फळभाजी, मोडआलेली कडधान्य, सँलड, साजुक तूप, बदलते गोडेतेल, गहूँ, ज्वारी, बाजरी, व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम...*
*पहा काय फरक पडतो. लोकांना शिस्त नकोय... जीभ चटावलीय.. पैसा बोलतोय... "स्वयंपाक नकोय..." आता तर घरपोच... पंधरा मिनीटात...*
*.....आली लाट मारा उड्या.*
*हसत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!!!*
*सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं, दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे. आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे.*
*आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर सुरुवात करायला काय हरकत आहे?*
*दिर्घायुष्य लाभावं, आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत, या करीता आपला आहार, आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.*
*आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात.*
*या व्यायामात नियमितता व सातत्य असावं. दर दोन-तीन महिन्यांनी व्यायाम प्रकारात बदल जरूर करा.*
*आणि हो,*
*या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा. ताणतणाविरहित जीवन जगा. ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल....*
*आजपासून सर्वांनी व्यायाम सुरू करून त्यात सातत्य ठेवावे व सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे हीच सदिच्छा व हार्दिक शुभेच्छा..*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
*(कॉपी पेस्ट)*
*आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*
*
No comments:
Post a Comment