Wednesday, 23 October 2024

निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

 निवडणूक प्रक्रिया निःपक्षपातीशांततापूर्ण वातावरणात

पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव

सर्व निवडणूक प्रक्रिया निःपक्षपातीभयमुक्त आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. मतदान केंद्रावर मतदाराना अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेवून प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतीक्षा कक्षटोकन सिस्टीम याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.

   जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणालेमतदारांना मतदान केंद्राची माहिती व्हावी यासाठी बीएलओमार्फत घरोघरी मतदार चिट्टीचे वाटप करण्याची मोहीम सुरू आहे. मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदानासाठी संकल्पपत्र हा अभिनव उपक्रम मुंबई शहर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

भारत निवडणूक आयोगाने  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबईशहर जिल्हयात 10 विधानसभा मतदार संघांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर व प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे

 निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करणेबाबचा दिनांक -   22 ऑक्टोबर 2024

 नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटचा दिनांक -                  29 ऑक्टोबर 2024

                                                                                     (मंगळवार) 

 नामनिर्देशन पत्र छाननी दिनांक -                                  30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)

 नामनिर्देशन पत्र परत घेण्याचा शेवटचा दिनांक -              4 नोव्हेंबर 2024 (सोमवार)

  मतदानाचा दिनांक -                                                  20 नोव्हेंबर 2024 (बुधवार)

  मतमोजणीचा दिनांक -                                              23 नोव्हेंबर 2024 (शनिवार)

 

मतदारांसाठी मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध

 मतदारांसाठी मतदान केंद्रावर 

किमान आवश्यक सुविधा उपलब्ध

- अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी  डॉ. अश्विनी जोशी

 

            मुंबईदि. २२ : मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.

     विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

   या पत्रकार परिषदेस मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवअतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादमउपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

   डॉ. जोशी म्हणाल्याप्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणीस्वच्छता गृहे,  दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदि सुविधा पुरविण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विविध पथके तैनात करण्यात आली असून यासाठी क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Tuesday, 22 October 2024

जन जागर

सर्वांना विनंती आहे की PM Kisan list.Apk Gharkul yojana.Apk CSC CENTER.APK SBI Rewards.APK MGB Rewards.APK Solar Pump list.Apk इत्यादी कुठलीही APK (android app) फाईल डाऊनलोड, करून install किंवा उघडू नये म्हणजे ह्या PDF किंवा डॉक्युमेन्ट फाईल नसतात. ही APK फाईल डाऊनलोड किंवा इंस्टॉल केल्यावर लगेच आपला मोबाईल चे नियंत्रण जाते म्हणजे मोबाईल हँग होतो, तसेच हँग करणारी व्यक्ती त्या मोबाईल वरून ग्रुप वर ही APK फाईल सर्व ग्रुप वर पाठवते. व त्या मोबाईल वरील फोनेपे, गुगल पे, पे टीम, अमेझॉन सारखे ॲप हॅक करून धडाधड 7 ते 8 OTP येतात व बँक खाते रिकामे होते. तसेच बँकेतून पैसे कमी झालेले SMS येतात ते सुद्धा हॅकर माणसे डिलीट करून टाकतात त्यामुळे आपल्याला समजत नाही. उपाय - ही ॲप इंस्टॉल करून मोबाईल हँग झाले असता लगेच शक्य झाल्यास जमल्यास इंटरनेट बंद करून, इंस्टॉल झालेले ही ॲप लगेच uninstall करणे किंवा डिलीट करणे तरी सर्वांनी अश्या frauds ला बळी पडू नये... 🙏

सनातन धर्म में अगरबत्ती को क्यों नहीं जलाया जाता है…?

 *सनातन धर्म में अगरबत्ती को क्यों नहीं जलाया जाता है…? अधिकांश लोगों को इस बारे में पता नहीं है और हम अपनी पूजा पद्धति में अगरबत्ती जलाना अनिवार्य समझते हैं।*


लोगों का भगवान की आराधना करने का अपना-अपना तरीका होता है। कुछ लोग घी तेल आदि का दीपक जलाते हैं तो वहीं कुछ लोग धूप दीप या अगरबत्ती जलाते हैं। लेकिन क्या आप जानते हैं कि धर्म शास्त्रों में पूजा के दौरान 'अगरबत्ती' जलाना शुभ नहीं माना जाता। बांस को जलाने से भाग्य और वंश का नाश होता है। मान्यताओं में बांस को भाग्यवर्धक और वंश वृद्धि का प्रतीक माना जाता है। आइए इसके पीछे मौजूद धार्मिक और वैज्ञानिक कारण जानते हैं।


हम अक्सर शुभ (जैसे; हवन अथवा पूजन) और अशुभ (दाह संस्कार) कामों के लिए विभिन्न प्रकार के लकड़ियों को जलाने में प्रयोग करते है लेकिन क्या आप ने कभी किसी काम के दौरान बांस की लकड़ी को जलता हुआ देखा है। नहीं ना…?


भारतीय संस्कृति, परंपरा और धार्मिक महत्व के अनुसार, 'हमारे शास्त्रों में बांस की लकड़ी को जलाना वर्जित माना गया है। यहाँ तक की हम अर्थी के लिए बांस की लकड़ी का उपयोग तो करते है लेकिन उसे चिता में जलाते नहीं।' हिन्दू धर्म के अनुसार बांस जलाने से पितृ दोष लगता है, वहीं जन्म के समय जो नाल 'माता और शिशु' को जोड़ के रखती है, उसे भी बांस के वृक्षों के बीच में गाड़ते हैं ताकि वंश सदैव बढ़ता रहे।


*क्या इसका कोई वैज्ञानिक कारण है…?*


बांस में लेड व हेवी मेटल प्रचुर मात्रा में पाई जाती है। लेड जलने पर लेड ऑक्साइड बनाता है जो कि एक खतरनाक नीरो टॉक्सिक है हेवी मेटल भी जलने पर ऑक्साइड्स बनाते हैं। लेकिन जिस बांस की लकड़ी को जलाना शास्त्रों में वर्जित है यहां तक कि चिता में भी नहीं जला सकते, उस बांस की लकड़ी को हम लोग रोज अगरबत्ती में जलाते हैं। अगरबत्ती के जलने से उत्पन्न हुई सुगन्ध के प्रसार के लिए फेथलेट नाम के विशिष्ट केमिकल का प्रयोग किया जाता है। यह एक फेथलिक एसिड का ईस्टर होता है जो कि श्वांस के साथ शरीर में प्रवेश करता है। इस प्रकार अगरबत्ती की तथाकथित सुगन्ध न्यूरोटॉक्सिक एवं हेप्टोटोक्सिक को भी श्वांस के साथ शरीर में पहुंचाती है। इसकी लेश मात्र उपस्थिति कैंसर अथवा मष्तिष्क आघात का कारण बन सकती है। हेप्टो टॉक्सिक की थोड़ी सी मात्रा लीवर को नष्ट करने के लिए पर्याप्त है।


*Break…*


*`Follow Us :`*

_https://kutumbapp.page.link/Ra5PThHzaHG8JPjU7_


*Continue…*


शास्त्रों में पूजन विधान में कही पर भी 'अगरबत्ती' का उल्लेख नहीं मिलता सब जगह 'धूप' ही लिखा है, हर स्थान पर धूप, दीप, नैवेद्य का ही वर्णन है।


अगरबत्ती का प्रयोग भारतवर्ष में इस्लाम के आगमन के साथ ही शुरू हुआ है। मुस्लिम लोग अगरबत्ती मजारों में जलाते हैं, हम हमेशा अंधानुकरण ही करते हैं, जब कि हमारे धर्म की हर एक बातें वैज्ञानिक दृष्टिकोण के अनुसार मानवमात्र के कल्याण के लिए ही बनी है।


⁃⁃⁃⁃⁃⁃⁃⁃❏ ⁃⁃⁃⁃⁃⁃⁃⁃⁃❏ ⁃⁃⁃⁃⁃⁃⁃

*लेख के लिए सर्वप्रथम नंबर 👉🏻 +918423630629 को सेव कर अपना (नाम, जिला, राज्य) लिखकर WhatsApp करें। 🙏*

⁃⁃⁃⁃⁃⁃⁃⁃❏ ⁃⁃⁃⁃⁃⁃⁃⁃⁃❏ ⁃⁃⁃⁃⁃⁃⁃


✍️ साभार


*🚩 हमारी समिति के सभी संदेश नियमित पढ़ने हेतु हमारे निम्न व्हाट्सएप चैनल को अवश्य फॉलो किजिए॥ 🙏⛳🚩*


_https://whatsapp.com/channel/0029Va9dBNq6WaKetQIhG52z_

▬▬▬▬▬๑⁂❋⁂๑▬▬▬▬

*जनजागृति हेतु लेख प्रसारण अवश्य करें॥*

_यस्य पुत्रो वशीभूतो भार्या छन्दानुगामिनी।_

_विभवे यस्य सन्तुष्टिस्तस्य स्वर्ग इहैव हि।।_


*प्रशासक समिति ®️✊🚩*

_एकात्मिता सोशल वेल्फेयर सोसाइटी_

Govt pensioner साठी ऑनलाईन ललाइफ सर्टिफिकेट


 

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ७७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ७७३ निकाली ३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ७७६ तक्रारी प्राप्त;

यापैकी ७७३ निकाली

३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

 मुंबईदि. २१ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ७७६ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ७७३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

 सजग नागरिकांना  आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रकाशाच्या अनुभूतीची*

 🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


         *प्रकाशाच्या अनुभूतीची*

       

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

          *!! कार्तिक स्नानारंभ !!*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹

    

    *महायोगपीठे तटे भीमरथ्या*

    *वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः ।*

    *समागत्य तिष्ठंतमानंदकंदं*

    *परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ॥*

        *भारतीय संस्कृती परंपरा म्हणजे निरामय आरोग्याची गुरुकिल्लीच. भौतिक जगातील दुःखापासून दूर कसे रहावे.. आपले चित्त प्रसन्न कसे ठेवावे.. मन आनंदी कसे ठेवावे याचे संस्कार परंपरेने नकळत रुजविले आहेत. या परंपरेने हजारो वर्षे भारतीयांची भक्तीमार्गाने वाटचाल सुरु आहे. हे भाविक हे जगात सर्वात सुखी आहेत. त्यांचे विश्व सुसंपन्न आहे.*

        *सध्या परंपरेप्रमाणे कार्तिक स्नान करुन मंदिरात काकडा आरती सुरू आहे. मोठी देवस्थाने असोत.. शहरे-लहान खेड्यातील मंदिरे असोत वा महानगरात सोसायटीमधील मंदिरे यामध्ये भक्तांची गर्दी आहे. इथेच काशी.. पंढरपूर अवतरलेय.* 

        *ब्रह्म मुहुर्ती उठून लोक  पहाट वारे अनुभवत कार्तिक  स्नानाचा वेगळा आनंद अनुभवत आहे. मंदिरातील  काकडा आरती अनुभवणे हे पण तेवढेच आनंददायी.*

        *एकिकडे मंदिराच्या गाभाऱ्यात देवाला पंचामृत स्नान घातले जाणे.. मग शृंगार.. वस्त्र नेसवणे.. गंध लेपन, सुगंधी फुलांचे हार घालणे सुरू असते. तर समोर चंदनधारी वारकरी मंडळींचे टाळ मृदुंगाच्या साथीने एकसुरात अभंग गायन.. "ज्ञानोबा माऊली तुकाराम" म्हणत पावली खेळणे सुरू असते.*

        *ते भजनाचे सूर कानात रुंजी घालतात. हे सूर जगातील सगळी चिंता.. क्लेश.. दारिद्रय.. दुःख दूर सारतात. महिला मंडळी आरतीच्या ताटात पूजासाहित्य.. सुगंधी फुलांचे.. तुळशीचे हार आणि प्रज्वलीत दिवे घेऊन पूजेसाठी आतुर असतात.*

        *भक्तीभावाने हे सहस्त्रावधी दिवे दैवताच्या मूर्तीवरुन ओवाळले जातात. या दिव्यांचा प्रकाश दहाही दिशात पसरुन गगनही उजळते. सहस्त्रावधी भक्तांच्या आरतीचे हे मनोहर दृश्य बघून या दिव्यांच्या प्रकाशातील मूर्तीचे दिव्य रुपडे बघून चराचरही मोहरुन जाते. या दिव्याच्या किरणांनी सगळे तेज मूर्तीत एकवटते.*

        *मंदिरात दैवताला ओवाळताना भक्तांना होणाऱ्या सुखाचा आनंद अवर्णनीयच. ओवाळताना दिव्यानी पसरलेले हे तेज दैवताच्या मूर्ती भोवती तेजाचे वलय निर्माण करते. प्रत्येक भक्ताच्या डोळ्यातही.. भक्तीभावातही दिसते. काकड आरतीचे सूर.. भक्तांचा भक्तीभाव आणि जीवन उजळविणारे तेज नित्य अनुभवणारे हे भक्त खरोखरच भाग्यवान.*


🌹⚜🌸🔆🪔🔆🌸⚜🌹

  

  *सहस्त्र दीपे दीप कैसी*

  *प्रकाशली प्रभा ।*

  *उजळल्या दशदिशा*

  *गगना आलीसे शोभा ॥धृ॥*


  *काकड आरती माझ्या*

  *कृष्णा सभागिया ।*

  *चराचर मोहरले*

  *तुझी मूर्ती पहाया ॥१॥*


  *कोंदलेसे तेज*

  *प्रभा झालीसे एक ।*

  *नित्य नवा आनंद*

  *ओवाळितां श्रीमुख ॥२॥*


  *आरती करिता तेज*

  *प्रकाशले नयनी ।* 

  *तेणे तेजे मिनला*

  *एकाएकी जनार्दनी ॥३॥*


🌹⚜️🌸🔆🪔🔆🌸⚜️🌹


  *रचना : संत एकनाथ*  ✍️

  *स्वर-संगीत : वासुदेव आणि*

  *स्नेहल भाटकर*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *‼जय जय रामकृष्ण हरि‼*


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-२२.१०.२०२४-*


🌻🌸🥀🔆🪔🔆🥀🌸🌻

Featured post

Lakshvedhi