Wednesday, 23 October 2024

मतदारांसाठी मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध

 मतदारांसाठी मतदान केंद्रावर 

किमान आवश्यक सुविधा उपलब्ध

- अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी  डॉ. अश्विनी जोशी

 

            मुंबईदि. २२ : मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.

     विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

   या पत्रकार परिषदेस मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवअतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादमउपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

   डॉ. जोशी म्हणाल्याप्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणीस्वच्छता गृहे,  दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदि सुविधा पुरविण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विविध पथके तैनात करण्यात आली असून यासाठी क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi