Tuesday, 22 October 2024

प्रकाशाच्या अनुभूतीची*

 🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


         *प्रकाशाच्या अनुभूतीची*

       

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

          *!! कार्तिक स्नानारंभ !!*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹

    

    *महायोगपीठे तटे भीमरथ्या*

    *वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः ।*

    *समागत्य तिष्ठंतमानंदकंदं*

    *परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ॥*

        *भारतीय संस्कृती परंपरा म्हणजे निरामय आरोग्याची गुरुकिल्लीच. भौतिक जगातील दुःखापासून दूर कसे रहावे.. आपले चित्त प्रसन्न कसे ठेवावे.. मन आनंदी कसे ठेवावे याचे संस्कार परंपरेने नकळत रुजविले आहेत. या परंपरेने हजारो वर्षे भारतीयांची भक्तीमार्गाने वाटचाल सुरु आहे. हे भाविक हे जगात सर्वात सुखी आहेत. त्यांचे विश्व सुसंपन्न आहे.*

        *सध्या परंपरेप्रमाणे कार्तिक स्नान करुन मंदिरात काकडा आरती सुरू आहे. मोठी देवस्थाने असोत.. शहरे-लहान खेड्यातील मंदिरे असोत वा महानगरात सोसायटीमधील मंदिरे यामध्ये भक्तांची गर्दी आहे. इथेच काशी.. पंढरपूर अवतरलेय.* 

        *ब्रह्म मुहुर्ती उठून लोक  पहाट वारे अनुभवत कार्तिक  स्नानाचा वेगळा आनंद अनुभवत आहे. मंदिरातील  काकडा आरती अनुभवणे हे पण तेवढेच आनंददायी.*

        *एकिकडे मंदिराच्या गाभाऱ्यात देवाला पंचामृत स्नान घातले जाणे.. मग शृंगार.. वस्त्र नेसवणे.. गंध लेपन, सुगंधी फुलांचे हार घालणे सुरू असते. तर समोर चंदनधारी वारकरी मंडळींचे टाळ मृदुंगाच्या साथीने एकसुरात अभंग गायन.. "ज्ञानोबा माऊली तुकाराम" म्हणत पावली खेळणे सुरू असते.*

        *ते भजनाचे सूर कानात रुंजी घालतात. हे सूर जगातील सगळी चिंता.. क्लेश.. दारिद्रय.. दुःख दूर सारतात. महिला मंडळी आरतीच्या ताटात पूजासाहित्य.. सुगंधी फुलांचे.. तुळशीचे हार आणि प्रज्वलीत दिवे घेऊन पूजेसाठी आतुर असतात.*

        *भक्तीभावाने हे सहस्त्रावधी दिवे दैवताच्या मूर्तीवरुन ओवाळले जातात. या दिव्यांचा प्रकाश दहाही दिशात पसरुन गगनही उजळते. सहस्त्रावधी भक्तांच्या आरतीचे हे मनोहर दृश्य बघून या दिव्यांच्या प्रकाशातील मूर्तीचे दिव्य रुपडे बघून चराचरही मोहरुन जाते. या दिव्याच्या किरणांनी सगळे तेज मूर्तीत एकवटते.*

        *मंदिरात दैवताला ओवाळताना भक्तांना होणाऱ्या सुखाचा आनंद अवर्णनीयच. ओवाळताना दिव्यानी पसरलेले हे तेज दैवताच्या मूर्ती भोवती तेजाचे वलय निर्माण करते. प्रत्येक भक्ताच्या डोळ्यातही.. भक्तीभावातही दिसते. काकड आरतीचे सूर.. भक्तांचा भक्तीभाव आणि जीवन उजळविणारे तेज नित्य अनुभवणारे हे भक्त खरोखरच भाग्यवान.*


🌹⚜🌸🔆🪔🔆🌸⚜🌹

  

  *सहस्त्र दीपे दीप कैसी*

  *प्रकाशली प्रभा ।*

  *उजळल्या दशदिशा*

  *गगना आलीसे शोभा ॥धृ॥*


  *काकड आरती माझ्या*

  *कृष्णा सभागिया ।*

  *चराचर मोहरले*

  *तुझी मूर्ती पहाया ॥१॥*


  *कोंदलेसे तेज*

  *प्रभा झालीसे एक ।*

  *नित्य नवा आनंद*

  *ओवाळितां श्रीमुख ॥२॥*


  *आरती करिता तेज*

  *प्रकाशले नयनी ।* 

  *तेणे तेजे मिनला*

  *एकाएकी जनार्दनी ॥३॥*


🌹⚜️🌸🔆🪔🔆🌸⚜️🌹


  *रचना : संत एकनाथ*  ✍️

  *स्वर-संगीत : वासुदेव आणि*

  *स्नेहल भाटकर*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *‼जय जय रामकृष्ण हरि‼*


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-२२.१०.२०२४-*


🌻🌸🥀🔆🪔🔆🥀🌸🌻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi