Monday, 21 October 2024

तुका आकाश एवढा

 🌹⚜️🌹🎼🌅🎼🌹⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

    *स्वर यात्रेकरूच्या जन्मदिनाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

                                                      

🌸🥀🔆🌺🎶🌺🔆🥀🌸

       

        *आकाशवाणी. मराठी संगीत आकाशवाणीने घरोघरी पोहोचविले. त्यासाठी आकाशवाणीला रत्नपारखी लाभले होते. श्री रामचंद्र कृष्णाजी फाटक. जन्म अहिल्या नगर (१९१७-२००२). हे असेच रत्नपारखी आकाशवाणीचे गायक.. संगीतकार.*

        *गायक राम फाटक यांनी आपल्या नोकरीत केलेली संगीताची सेवा आदर्श ठरलीय. त्यांना गायनाची आवड होती. गंधर्व महाविद्यालयात ख्याल गायकी शिकले. भास्कर गोडबोले.. जे. एल. रानडे.. रुस्तमकाकांकडून संगीताचे धडे घेतले.* 

        *त्यांना बालगंधर्व यांनी नाटकात या निमंत्रण दिले होते पण त्यांनी ते नाकारले. प्रथम शिक्षक झाले. पूढे नागपूर आणि नंतर पुणे आकाशवाणीत नोकरी केली. मराठी संगीत लोकप्रिय करण्यासाठी नवे प्रयोग केले. नागपूरला 'सोनिया सुगंधु आला' आणि पुणे आकाशवाणीवर स्वरचित्र नामक आगळे मासिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये काव्याचा अर्थ.. रसग्रहणानंतर गायक गाणे गायचे. नोकरी करताना अनेक कवींना संधी दिली. परवीन सुलताना यांनाही मराठी गाणी गायला लावली.*

        *गायक राम फाटक यांनी बाबूजींच्या सुप्रसिद्ध 'गीत रामायण' मध्ये "उर्मिले त्रिवार वंदन.." सारखी काही गाणी गायलीत. गायकांना गायकीला पूर्ण न्याय देता यावा म्हणून संतसाहित्य निवडून त्याला संगीत दिले. पं. भीमसेन जोशी यांच्या भक्तगीत संग्रहाद्वारे संत ज्ञानोबा.. तुकोबा, एकनाथ इ. संतांना घरोघरी पोहोचवले. राम फाटक आणि पं. भीमसेन यांची जोडी, यामुळे संतकाव्य जगभर लोकप्रिय होण्याचा इतिहास घडलाय.*

        *पण त्यांनी भावगीतालाही तेवढाच न्याय दिल्याने ही गाणीही तेवढीच लोकप्रिय ठरली. जीवन म्हणजेच स्वरयात्रा असल्याने त्यांनी आपल्या आत्मचरित्राचे नाव 'स्वरयात्रा' ठेवले.*

        *"सखी मंद झाल्या तारका", "दिसलीस तू फुलले ऋतू", "डाव भांडून मांडून मोडू नकोस" सारखी त्यांनी संगीतबद्ध केलेली भावगीते, तसेच "तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल", "माझे माहेर पंढरी", "अणुरेणिया थोकडा" या सारखे गाजलेले अभंग त्यांनी पं. भीमसेन यांच्या गायकीने संगीतबद्ध केलेत.*

        *अशा या शिक्षक गायक संगीतकाराला जन्मदिनी विनम्र अभिवादन.*


🌹🌼🎼🌺🎶🌺🎼🌼🌹


  *अणुरेणियां थोकडा ।*

  *तुका आकाशाएवढा ॥१॥*


  *गिळुन सांडिलें कलेवर ।*

  *भव भ्रमाचा आकार ॥२॥*


  *सांडिली त्रिपुटी ।*

  *दीप उजळला घटीं ॥३॥*


  *तुका म्हणे आतां ।*

  *उरलो उपकारापुरता ॥४॥*


🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹


  *रचना : संत तुकाराम महाराज*  ✍️

  *संगीत : राम फाटक*

  *स्वर : पं. भीमसेन जोशी*


  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-२१.१०.२०२४-*


🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻

Bjp pranit उमेदवाराची महाराष्ट्र ची यादी








 

Sunday, 20 October 2024

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ६६७ तक्रारी प्राप्त; यापैकी ६६० निकाली

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४

 

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ६६७ तक्रारी प्राप्तयापैकी ६६० निकाली

 

२७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त

 

राज्यस्तरीय जाहिरात पूर्वप्रमाणीकरण समितीकडून विविध राजकीय पक्षांच्या १०८ जाहिरातींचे प्रमाणीकरण

 

मुंबईदि.२० : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

सजग नागरिकांना  आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्यस्तरीय जाहिरात पूर्वप्रमाणीकरण समितीकडून विविध राजकीय पक्षांच्या एकूण १०८ जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यात आले असून यामध्ये व्हिडिओक्रिएटिव्ह व ऑडिओ जाहिरातींचा समावेश आहे.

 

***

Assembly General Elections -2024

 

667 complaints of violation of Model Code of Conduct received by CVigil app, 660 resolved

 

·       Assets worth 27 crore 78 lakh seized

 

·       State level Advertising Pre- Certificate Committee certifies 108 advertisements of various political parties

 

Mumbai, October 20:- The Model Code of Conduct (MCC) for the Legislative Assembly General Elections- 2024 in the state is in force since 15th of October 2024. During 15th to 20th of October 2024, a total of 667 complaints have been received on the CVigil App. Out of this 660 complaints have been settled by the election commission i.e. a total of 99 percent of the complaints have been resolved. This information is given by the additional electoral officer of the state Dr Kiran Kulkarni.

The CVigil App, which helps the vigilant citizens to follow the model code of conduct, can be downloaded from any app store. The citizens can file complaints about violation of the model code of conduct using this app. The teams assigned the responsibility will initiate suitable action after conducting an enquiry.

 Under the action initiated by various enforcement machinery of the State Government and the Central Government, assets including illegal money, liquor, drugs and valuable metals worth 27 crore 78 lakh had been seized. The implementation of the model code of conduct in the state is being done effectively, Dr Kulkarni added.

 Certification of 108 advertisements related to different political parties had been done by the state level Advertisement Pre- certificate Committee. This includes video, creative and audio advertisements.

000

 


जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मतदान केंद्रांना भेट मतदान केंद्रावरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा

 जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मतदान केंद्रांना भेट

मतदान केंद्रावरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा

मतदारांची गैरसोय  होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करा जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्त सूचना

   

 मुंबईदि.19 : मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून तेथील सुविधांचा आढावा घेतला. निवडणूक संबंधित सर्व अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

     यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक  अधिकारी श्यामसूंदर सुरवसे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

             श्री. यादव म्हणालेभारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणीकचरापेटीस्वच्छतागृहदिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्थारांगांमध्ये गर्दी झाल्यास मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकडेमोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी,पंखे आदी किमान सुविधा यादृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व देखभाल दुरुस्त्या करुन घ्याव्यात. मतदान केंद्रावर ठळक अक्षरात येथील सुविधांचा फलक मतदार केंद्र क्रमांकदिशादर्शक लावावेत. आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले. 

            जेष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचे वय 85 वर्षापेक्षा अधिक आहे, असे नागरिक व दिव्यांग मतदार यांच्यासह निवडणूक कर्तव्यानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यपध्दती विहित करुन दिली आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणताही मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहू नये यादृष्टीने ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले व दिव्यांग मतदारांना गृह मतदान करता येणार आहे. गृह मतदानासाठी नमुना 12-ड तत्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मतदार नोंदणी झालेल्या प्रत्येक मतदाराला सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठ्यांचे वितरण  करावे व नागरिकांना मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करुन द्यावी. ज्या मतदारांचा संपर्क होत नाही त्यांना दूरध्वनी,एसएमएस,व्हाट्सअप  अशा माध्यमातून संपर्क करावा आणि मतदार केंद्राची माहिती दयावी. कोणत्याही प्रकारची मतदारांची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आदेशही         श्री. यादव यांनी यावेळी दिले.

 श्री. यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील परिसरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दरम्यान नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना मतदान स्लीप मिळाली कामतदान केंद्र कुठे आहेयाबाबत विचारणा केली. अनेक मतदारांनी जिल्हाधिकारी श्री.यादव यांच्याशी संवाद साधला मतदानदिवशीचा अनुभव सांगितला त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी  तिथेच आवश्यक सूचना दिल्या.

सर्व मतदान केंद्रांवरील संबंधित नोडल अधिकारी यांना मतदान जनजागृती उपक्रम विविध माध्यमातून राबवून मतदानांचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा असेही यावेळी सांगितले.

आज दिवसभरात कुलाबामलबारहीलमुबांदेवीवरळी,शिवडी,आणि भायखळा या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी भेट दिली.

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम

 मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम वेगात

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

भूषण गगराणी यांनी केले मार्गदर्शन

गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास

तात्काळ हजर राहण्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी

राजेंद्र क्षीरसागर यांचे निर्देश

 

दि 19:- मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत सर्वच 26 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रम वेगात सुरु आहेत. 158-जोगेश्वरी, 167- विलेपार्ले व 168 चांदिवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अंतर्गत विभागीय अधिकारी व अन्य अधिकारी यांच्यासाठी निवडणूक कामकाज विषयक व 'ईव्हीएमसंदर्भातील प्रथम प्रशिक्षण मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे झाले.

173- चेंबूर आणि 167- विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील प्रशिक्षण कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागरअतिरिक्त जिल्हाधिकारी मनोज गोहाड हे उपस्थित होते.

167- विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अंतर्गत निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास 672 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर 206 जण गैरहजर होते अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

मतदान केंद्र अध्यक्षप्रथम मतदान अधिकारीव इतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण यावेळी झाले. यावेळी हॅण्डस ऑन ट्रेनिंगची देखील व्यवस्था करण्यात आली होती अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

शिक्षणास तात्काळ हजर रहावे

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास तात्काळ हजर राहण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले आहेत.

गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले त्यांची माहिती संकलित करण्यात येत असून गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही श्री क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा निवडणूक 2024 साठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी

 परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेतनुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

 

मुंबईदि. 19 : राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसापरतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेतत्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावीअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.मुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेतत्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावीअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यातील विविध भागांमध्ये अमरावतीपुणेनाशिककोल्हापूरमराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजली आहेत. 

विशेषतः भातसोयाबीनतूरकपाशीऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे. 

या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावीअसे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

पंचनामे आणि नुकसान भरपाईसाठी नुकसानग्रस्त गावांमध्ये त्वरित यंत्रणा कार्यरत करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यातअसे निदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 

जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्षतालुकास्तरीय यंत्रणाइतर सर्व संबंधित विभाग यांनी यासाठी समन्वयाने काम करावेअशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

0000

 


Saturday, 19 October 2024

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी प्राप्त; यापैकी ४१४ निकाली १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त

 

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या

 ४२० तक्रारी प्राप्तयापैकी ४१४ निकाली

१०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबई, दि.१9 : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. यापैकी १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

००००००

राजू धोत्रे/विसंअ

 

 

 

 


 

A total of 420 complaints regarding violations of the Model Code of Conduct was received on the C-Vigil app,

Out of which 414 have been resolved

Additionally, property worth ₹1, 064 lakh has been seized

 

Mumbai, Date 19 Oct :-The Model Code of Conduct for the 2024 Maharashtra Legislative Assembly elections came into effect on October 15, 2024. Between October 15 and October 18, 2024, a total of 420 complaints was received across the state through the C-Vigil app, out of which 414 complaints have been resolved by the Election Commission. Notably, 256 complaints were addressed within 100 minutes. The highest number of complaints were resolved in Thane district.

Since the implementation of the Model Code of Conduct for the Assembly elections, various enforcement agencies of the state government have seized illegal cash, liquor, drugs, and valuable metals worth a total of ₹1,064 lakh.

000


Featured post

Lakshvedhi