Saturday, 19 October 2024

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी प्राप्त; यापैकी ४१४ निकाली १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त

 

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या

 ४२० तक्रारी प्राप्तयापैकी ४१४ निकाली

१०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबई, दि.१9 : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. यापैकी १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

००००००

राजू धोत्रे/विसंअ

 

 

 

 


 

A total of 420 complaints regarding violations of the Model Code of Conduct was received on the C-Vigil app,

Out of which 414 have been resolved

Additionally, property worth ₹1, 064 lakh has been seized

 

Mumbai, Date 19 Oct :-The Model Code of Conduct for the 2024 Maharashtra Legislative Assembly elections came into effect on October 15, 2024. Between October 15 and October 18, 2024, a total of 420 complaints was received across the state through the C-Vigil app, out of which 414 complaints have been resolved by the Election Commission. Notably, 256 complaints were addressed within 100 minutes. The highest number of complaints were resolved in Thane district.

Since the implementation of the Model Code of Conduct for the Assembly elections, various enforcement agencies of the state government have seized illegal cash, liquor, drugs, and valuable metals worth a total of ₹1,064 lakh.

000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi