🌹⚜️🌹🎼🌅🎼🌹⚜️🌹
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*स्वर यात्रेकरूच्या जन्मदिनाची*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🌸🥀🔆🌺🎶🌺🔆🥀🌸
*आकाशवाणी. मराठी संगीत आकाशवाणीने घरोघरी पोहोचविले. त्यासाठी आकाशवाणीला रत्नपारखी लाभले होते. श्री रामचंद्र कृष्णाजी फाटक. जन्म अहिल्या नगर (१९१७-२००२). हे असेच रत्नपारखी आकाशवाणीचे गायक.. संगीतकार.*
*गायक राम फाटक यांनी आपल्या नोकरीत केलेली संगीताची सेवा आदर्श ठरलीय. त्यांना गायनाची आवड होती. गंधर्व महाविद्यालयात ख्याल गायकी शिकले. भास्कर गोडबोले.. जे. एल. रानडे.. रुस्तमकाकांकडून संगीताचे धडे घेतले.*
*त्यांना बालगंधर्व यांनी नाटकात या निमंत्रण दिले होते पण त्यांनी ते नाकारले. प्रथम शिक्षक झाले. पूढे नागपूर आणि नंतर पुणे आकाशवाणीत नोकरी केली. मराठी संगीत लोकप्रिय करण्यासाठी नवे प्रयोग केले. नागपूरला 'सोनिया सुगंधु आला' आणि पुणे आकाशवाणीवर स्वरचित्र नामक आगळे मासिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये काव्याचा अर्थ.. रसग्रहणानंतर गायक गाणे गायचे. नोकरी करताना अनेक कवींना संधी दिली. परवीन सुलताना यांनाही मराठी गाणी गायला लावली.*
*गायक राम फाटक यांनी बाबूजींच्या सुप्रसिद्ध 'गीत रामायण' मध्ये "उर्मिले त्रिवार वंदन.." सारखी काही गाणी गायलीत. गायकांना गायकीला पूर्ण न्याय देता यावा म्हणून संतसाहित्य निवडून त्याला संगीत दिले. पं. भीमसेन जोशी यांच्या भक्तगीत संग्रहाद्वारे संत ज्ञानोबा.. तुकोबा, एकनाथ इ. संतांना घरोघरी पोहोचवले. राम फाटक आणि पं. भीमसेन यांची जोडी, यामुळे संतकाव्य जगभर लोकप्रिय होण्याचा इतिहास घडलाय.*
*पण त्यांनी भावगीतालाही तेवढाच न्याय दिल्याने ही गाणीही तेवढीच लोकप्रिय ठरली. जीवन म्हणजेच स्वरयात्रा असल्याने त्यांनी आपल्या आत्मचरित्राचे नाव 'स्वरयात्रा' ठेवले.*
*"सखी मंद झाल्या तारका", "दिसलीस तू फुलले ऋतू", "डाव भांडून मांडून मोडू नकोस" सारखी त्यांनी संगीतबद्ध केलेली भावगीते, तसेच "तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल", "माझे माहेर पंढरी", "अणुरेणिया थोकडा" या सारखे गाजलेले अभंग त्यांनी पं. भीमसेन यांच्या गायकीने संगीतबद्ध केलेत.*
*अशा या शिक्षक गायक संगीतकाराला जन्मदिनी विनम्र अभिवादन.*
🌹🌼🎼🌺🎶🌺🎼🌼🌹
*अणुरेणियां थोकडा ।*
*तुका आकाशाएवढा ॥१॥*
*गिळुन सांडिलें कलेवर ।*
*भव भ्रमाचा आकार ॥२॥*
*सांडिली त्रिपुटी ।*
*दीप उजळला घटीं ॥३॥*
*तुका म्हणे आतां ।*
*उरलो उपकारापुरता ॥४॥*
🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹
*रचना : संत तुकाराम महाराज* ✍️
*संगीत : राम फाटक*
*स्वर : पं. भीमसेन जोशी*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-२१.१०.२०२४-*
🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻
No comments:
Post a Comment