*"ll🔆👆ll"*
*"सिर्फ एक नदी ने दो देशों को अलग-अलग कर रखा हैं..!!"*
*"ll🔰♻️♻️🔰ll"*
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
*"सिर्फ एक नदी ने दो देशों को अलग-अलग कर रखा हैं..!!"*
*"ll🔰♻️♻️🔰ll"*
राज्यपाल रमेश बैस - रामबाई बैस यांचे दक्षिण मुंबईत मतदान
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाअंतर्गत मलबार हिल येथे मतदानाचा हक्क बजावला. राजभवन येथील भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनीही मतदान केले.
००००
Lok Sabha Elections 2024: Governor Ramesh Bais casts vote in South Mumbai
Mumbai Dated 20 : Maharashtra Governor Ramesh Bais cast his vote for the Lok Sabha election at the Raj Bhavan Club polling both at Malabar Hill coming under South Mumbai Lok Sabha constituency. Wife of the Governor, Rambai Bais also cast her vote at the polling booth.
0000
लोकसभा चुनाव: राज्यपाल रमेश बैस का दक्षिण मुंबई में मतदान
मुंबई, ता. 20 : महाराष्ट्र के राज्यपाल रमेश बैस और राज्य की प्रथम महिला रामबाई बैस ने सोमवार (दि. २० मई ) को लोकसभा चुनाव 2024 के लिए अपना मतदान किया ।
राज्यपाल ने दक्षिण मुंबई लोकसभा चुनाव क्षेत्र में आने वाले मलबार हिल स्थित राजभवन क्लब मतदान केंद्र पहुंच अपना मतदान किया ।
0000
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान
मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजल्या पासून सुरु झाले. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:-
धुळे- २८.७३ टक्के
दिंडोरी- ३३.२५ टक्के
नाशिक - २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६ टक्के
भिवंडी- २७.३४ टक्के
कल्याण - २२.५२ टक्के
ठाणे - २६.०५ टक्के
मुंबई उत्तर - २६.७८ टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - २८.४१ टक्के
मुंबई उत्तर - पूर्व - २८.८२ टक्के
मुंबई उत्तर - मध्य - २८.०५ टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण - २४.४६ टक्के
000
सुप्रभात 🌹
⬇️⬇️⬇️*भारत - चीन बॉर्डर वर फक्त आपले सैन्यच उभे नाही.. तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेथील शेतकरी देखील उभा ठाकला आहे...*
- - 30 अंश सेल्सिअस मध्ये १०१ प्रकारच्या भाज्या पिकवण्याचा रेकॉर्ड आपल्या DRDO व DIHAR ने केला आहे.
भारत - चीन च्या सियाचिन ग्लेशियर, लद्दाख बॉर्डर वर अंदाजे भारताचे २,५०,००० सैन्य उभे ठाकले आहे..ह्या सैन्याला पूर्वी टिनबंद अन्न पुरवले जायचे आणि लागणारा भाजीपाला चंदीगडहून एअरलिफ्ट करून हेलिकॉप्टरने सियाचीन ला पाठवला जायचा ..
Defence Research and Development Organisation's (DRDO) आणि Defence Institute of High Altitude Research (DIHAR) ह्यांनी मिळून सियाचिन ग्लेशियर बेस कॅम्पपासून सुमारे १५० किमी अंतरावर असलेल्या पाल्मो, लडाखमधील लेह, कारगिल, परतापूर आणि तुर्तुकमधील सुमारे २०,००० लहान शेतकऱ्यांना एकत्र करून Trench Cultivation आणि Polycarbonate Greenhouse च्या माध्यमातून प्रगत शेती तंत्र अवलंबण्यास शिकवले व त्यातून येणारे शेती उत्पादन भारतीय आर्मी ने खरेदी करण्यास सुरवात केली..
सहा महिन्यांच्या हिवाळ्यात तिथे जेव्हा तापमान -३० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते आणि जमीन गुडघाभर बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबली जाते तेव्हा ही अश्या वातावरणात हे शेतकरी आता शेती करतात आणि ह्याच प्रगत तंत्राचा वापर करून कोंबडी पालन ही करतात.. हिवाळ्याच्या हंगामात अंडी उबवण केंद्रे चालवतात. हे स्थानिक शेतकरी भाजीपाला लागवडीसाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी, भाजीपाला आणि नाशवंत अन्नपदार्थांवर प्रक्रिया आणि जतन करण्यासाठी, ऊर्जा उत्पादनासाठी बायोडिग्रेडेबल कचऱ्याचा वापर करतात.आता तिथे स्थानिक पशु / प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.भारतीय सैन्याला हजारो टनांपर्यंत लागणारा सकस ताजा भाजीपाला, फळे, दूध, मांस आणि पोल्ट्री आता लगेच व जवळच उपलब्ध होत आहे..
अति थंड वातावरणात आणि एवढ्या उच्च उंचीच्या प्रदेशात शेती करणे, भाजीपाला पिकवणे आतापर्यंत अश्यक्य बाब होती.. आपल्या सैन्यासाठी ताजे अन्नपदार्थ, भाज्या, फळे, दूध, मांस, अंडी आणि औषधी आणि सुगंधी वनस्पतींची ह्याची गरज लागते आणि आतापर्यंत ह्या सर्व गरजेच्या वस्तू खूप लांबून एअर लिफ्ट करून आणाव्या लागत होत्या..
DRDO व DIHAR चे हे अथक प्रयत्न व टेक्नॉलॉजि ने तेथील स्थानिक शेतकर्यांना आर्थिक मदतच झाली ... तर सीमेवर, विशेषत: जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन हिमनदीवर खडा पहारा देण्यासाठी तैनात असलेल्या आपल्या सैन्यासाठी ही शेती आता वरदान ठरली आहे..
गेल्या वर्षी,तेथील शेतकऱ्यांनी लेहमध्ये एकाच हंगामात १०१ प्रकारच्या भाज्या पिकवण्याचा रेकॉर्ड केला आहे...( पूर्वी तिथे फक्त १० प्रकारचाच भाजीपाला पिकवला जात असे.)
नोंद:- भारत - चीन बॉर्डर वर फक्त आपले सैन्यच उभे नाही.. तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेथील शेतकरी देखील उभा ठाकला आहे...
जय हिंद
Copy paste
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात
सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान
मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे- १७.३८ टक्के
दिंडोरी- १९.५० टक्के
नाशिक - १६.३० टक्के
पालघर- १८.६० टक्के
भिवंडी- १४.७९ टक्के
कल्याण - ११.४६ टक्के
ठाणे - १४.८६ टक्के
मुंबई उत्तर - १४.७१ टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - १७.५३ टक्के
मुंबई उत्तर - पूर्व - १७.०१ टक्के
मुंबई उत्तर - मध्य - १५.७३ टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- १६.६९ टक्के
मुंबई दक्षिण - १२.७५ टक्के
0000
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात
सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे- ६.९२ टक्के
दिंडोरी- ६.४० टक्के
नाशिक - ६.४५ टक्के
पालघर- ७.९५ टक्के
भिवंडी- ४.८६ टक्के
कल्याण - ५.३९ टक्के
ठाणे - ५.६७ टक्के
मुंबई उत्तर - ६.१९ टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - ६.८७ टक्के
मुंबई उत्तर - पूर्व - ६.८३ टक्के
मुंबई उत्तर - मध्य - ६.०१ टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- ७.७९ टक्के
मुंबई दक्षिण - ५.३४ टक्के
0000
मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई
मुंबई, दि. १९ : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी २० मे, २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वा. दरम्यान मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.
श्री. यादव म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण २५२० मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन दक्ष आहे.
मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात आला आहे. मतदारांना मतदान केंद्रापासून १०० मीटर बाहेर मोबाइल ठेऊन मतदान करण्यासाठी जावे लागेल, असे श्री. यादव यांनी सांगितले.
0000
शैलजा पाटील/विसंअ/