Monday, 20 May 2024

भारत - चीन बॉर्डर वर फक्त आपले सैन्यच उभे नाही.. तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेथील शेतकरी देखील उभा ठाकला आहे...*

 सुप्रभात 🌹

⬇️⬇️⬇️*भारत - चीन बॉर्डर वर फक्त आपले सैन्यच उभे नाही..  तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेथील शेतकरी देखील उभा ठाकला आहे...* 

- - 30 अंश सेल्सिअस मध्ये १०१ प्रकारच्या भाज्या पिकवण्याचा रेकॉर्ड आपल्या DRDO व  DIHAR ने केला आहे. 

 

भारत - चीन च्या सियाचिन ग्लेशियर, लद्दाख बॉर्डर वर अंदाजे भारताचे २,५०,००० सैन्य उभे ठाकले आहे..ह्या सैन्याला पूर्वी टिनबंद अन्न पुरवले जायचे आणि लागणारा भाजीपाला चंदीगडहून एअरलिफ्ट करून हेलिकॉप्टरने सियाचीन ला पाठवला जायचा ..

 

Defence Research and Development Organisation's (DRDO) आणि Defence Institute of High Altitude Research (DIHAR) ह्यांनी मिळून सियाचिन ग्लेशियर बेस कॅम्पपासून सुमारे १५० किमी अंतरावर असलेल्या पाल्मो, लडाखमधील लेह, कारगिल, परतापूर आणि तुर्तुकमधील सुमारे २०,००० लहान शेतकऱ्यांना एकत्र करून Trench Cultivation आणि Polycarbonate Greenhouse च्या माध्यमातून प्रगत शेती तंत्र अवलंबण्यास शिकवले व त्यातून येणारे शेती उत्पादन भारतीय आर्मी ने खरेदी करण्यास सुरवात केली.. 


सहा महिन्यांच्या हिवाळ्यात तिथे जेव्हा तापमान -३० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते आणि जमीन गुडघाभर बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबली जाते तेव्हा ही अश्या वातावरणात हे शेतकरी आता शेती करतात आणि ह्याच प्रगत तंत्राचा वापर करून कोंबडी पालन ही करतात.. हिवाळ्याच्या हंगामात अंडी उबवण केंद्रे चालवतात. हे स्थानिक शेतकरी भाजीपाला लागवडीसाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी, भाजीपाला आणि नाशवंत अन्नपदार्थांवर प्रक्रिया आणि जतन करण्यासाठी, ऊर्जा उत्पादनासाठी बायोडिग्रेडेबल कचऱ्याचा वापर करतात.आता तिथे स्थानिक पशु / प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.भारतीय सैन्याला हजारो टनांपर्यंत लागणारा सकस ताजा भाजीपाला, फळे, दूध, मांस आणि पोल्ट्री आता लगेच व जवळच उपलब्ध होत आहे.. 

  

अति थंड वातावरणात आणि एवढ्या उच्च उंचीच्या प्रदेशात शेती करणे, भाजीपाला पिकवणे आतापर्यंत अश्यक्य बाब होती.. आपल्या सैन्यासाठी ताजे अन्नपदार्थ, भाज्या, फळे, दूध, मांस, अंडी आणि औषधी आणि सुगंधी वनस्पतींची ह्याची गरज लागते आणि आतापर्यंत ह्या सर्व गरजेच्या वस्तू खूप लांबून एअर लिफ्ट करून आणाव्या लागत होत्या.. 


DRDO व  DIHAR चे हे अथक प्रयत्न व टेक्नॉलॉजि ने तेथील स्थानिक शेतकर्‍यांना आर्थिक मदतच झाली ... तर सीमेवर, विशेषत: जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन हिमनदीवर खडा पहारा देण्यासाठी तैनात असलेल्या आपल्या सैन्यासाठी ही शेती आता वरदान ठरली आहे.. 


गेल्या वर्षी,तेथील शेतकऱ्यांनी लेहमध्ये एकाच हंगामात १०१ प्रकारच्या भाज्या पिकवण्याचा रेकॉर्ड केला आहे...( पूर्वी तिथे फक्त १० प्रकारचाच भाजीपाला पिकवला जात असे.) 


नोंद:- भारत - चीन बॉर्डर वर फक्त आपले सैन्यच उभे नाही..  तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेथील शेतकरी देखील उभा ठाकला आहे...


जय हिंद

Copy paste

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi