Wednesday, 27 March 2024

भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विद्यापीठांकडे

 भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे

लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विद्यापीठांकडे

            मुंबई, दि. 27 : भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्राचे  आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे असणे गरजेचे आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

            राज्यपाल बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २६) लॉजिस्टिक उद्योगाच्या पाचव्या 'लॉजिक्स इंडिया - २०२४या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेचे उदघाटन हॉटेल वेस्ट-इन गोरेगाव मुंबई येथे संपन्न झालेत्यावेळी ते बोलत होते. परिषदेचे आयोजन फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सने (फियो) केले. 

            भारताला जागतिक लॉजिस्टिक हब बनविण्याचे दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण जाहीर केले आहे. लॉजिस्टिक उद्योगाचा विस्तार केवळ औद्योगिकीकरणाला चालना देत नाहीतर त्यात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे.

            राज्यात २७ सार्वजनिक विद्यापीठे असून लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची गरज भागवण्याची क्षमता विद्यापीठांकडे आहे. या दृष्टीने विद्यापीठांनी लॉजिस्टिक क्षेत्रातील निर्यात महासंघासोबत काम करावेअशी सूचना आपण विद्यापीठांना करू असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते परिषदेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

            उद्घाटन सत्राला शिपिंग कॉर्पोरेशनचे महासंचालक श्याम जगन्नाथनफेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सचे अध्यक्ष अश्वनी कुमारशारजा येथील सैफ झोनचे वाणिज्य संचालक रईद  बुखातिरफेडरेशनचे विभागीय अध्यक्ष परेश मेहता तसेच विविध देशांमधील लॉजिस्टिक उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

**

Maharashtra Governor inaugurates

International Logistics event 'LOGIX India' in Mumbai

            Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the 5th edition of LOGIX INDIA 2024, the international flagship logistics event in Mumbai on Tue (26 Mar). The 3 -day exhibition and buyer - seller Meet LOGIX India has been organised by the Federation of Indian Export Organisations (FIEO).

            Complimenting FIEO for promoting India's exports for the last six decades, the Governor said India's transformation into a developed country depends on its performance in the logistics sector. He said in order to realize the goal of a $5 trillion economy by 2027, India should have better global logistics linkages.

            The Governor said the government is taking measures such as creation of logistics parks, establishment of a common logistics platform and improving multi modal transport connectivity to support the growth of the logistics sector.

            Stating that India is working towards realizing the vision of making India a global logistics hub, he said that initiatives like Sagarmala project, Bharatmala Project and National Logistics Policy were implemented to enhance the country's logistics infrastructure, reduce costs and position India as a preferred logistics destination.

            The Governor said in his capacity as Chancellor of 27 public universities in the State, he will ask all universities to work closely with FIEO. The Governor added that the universities have the capability to meet the requirement of skilled manpower for the logistics sector. The Governor released the official catalogue of the 5th edition on the occasion.

            Managing Director of Shipping Corporation of India Shyam Jagannathan, Chairman of FIEO Ashwani Kumar, Commercial Director of SAIF Zone Raed Bukhatir, Regional Chairman of FIEO Paresh Mehta and members of the global logistics industry were present.

0000


Tuesday, 26 March 2024

Govt pensioners karita

 



दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जल अभ्यासक डॉ.सुमंत पांडे यांची मुलाखत

 ‘दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

जल अभ्यासक डॉ.सुमंत पांडे यांची मुलाखत

 

      


      मुंबईदि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात' 'पाण्याचे नियोजन आणि महत्वया विषयावर जल साक्षरता केंद्रयशदापुणेयेथील माजी कार्यकारी संचालक तथा 'चला जाणूया नदीलाच्या राज्यस्तरीय समितीतील अशासकीय सदस्यजल अभ्यासक डॉ.सुमंत पांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            पाणी ही एक नैसर्गिक संपत्ती आहे जी आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक आहे. आपण दैनंदिन कामांसाठी जे पाणी वापरतो त्यातील बहुतांश पाणी भूजलातून येते. आपल्याकडे स्थिर आणि निरोगी जीवनशैलीसाठी नैसर्गिक संसाधने खूप महत्वाची भूमिका बजावतात. चांगल्या आरोग्यासाठी गोड्या पाण्याचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे भूजलाचा वापर वाढत असून पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. यामुळे सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता पडू नयेतसेच भूजल संवर्धनासाठी जगभरात दरवर्षी 22 मार्च रोजी 'जागतिक जल दिनम्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य लक्षात घेता 'पाण्याचे नियोजन आणि महत्वया विषयावर जल अभ्यासक डॉ. पांडे यांनी 'दिलखुलासआणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

            'दिलखुलासकार्यक्रमात डॉ. पांडे यांची मुलाखत बुधवार दि. 27, गुरुवार दि. 28,  शुक्रवार दि. 29 आणि शनिवार दि.30 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहेतर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 29 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

00

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

 कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

            मुंबई, दि. 26 : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे.


            भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान दि. १९ एप्रिल, दि. २६ एप्रिल, दि. ७ मे, दि. १३ मे व दि. २० मे, २०२४ अशा पाच टप्प्यात होणार आहे.


            भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.


            या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.


             ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे.


            अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.


            कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहणार आहे. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांना या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी लागणार आहे.


            मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार आहे, अशा सूचनाही या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.


000

उसाच्या रसाचे फायदे*

 🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋

        *उसाच्या रसाचे फायदे*


*उसाच्या रसात शक्यतो बर्फ टाकू नये.उसाचा रस पिताना स्वचछते संबंधी लक्ष द्यावे.*


*१. उसाचा रस आपली पचनशक्ती वाढवतो. यामुळे पचनसंस्था सुरळीत होते.*


*२. पोटाशी संबंधित अनेक आजार बरे करण्यास उसाचा रस आपली मदत करतो. यामुळे पोट साफ होते व बद्धकोष्ठतेसारखे अनेक विकार बरे होतात.*


*३. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनीही उसाचा रस प्यायला पाहिजे. त्यामुळे पित्त दूर होते.*


*४. उसाचा रस प्यायल्याने हृदयाशी संबंधित अनेक रोगांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. हा प्यायल्याने हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्यता कमी होते.*


*५. उसाच्या रसाने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. शरीरातील धमन्यांचे कार्य सुरळीत होऊन त्यांच्यातील मळ बाहेर पडतो व शरीर स्वच्छ होते.*


*६. जर तुम्ही कमी पाणी पीत असाल तर उसाचा रस नक्की प्या. उसाच्या रसाने शरीरातील द्रव्याचे प्रमाण वाढते. याने शरीरातली पाण्याची कमतरता भरून येईल व किडनी स्टोन सारख्या आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता.*


*७. उन्हामुळे हात, पाय, डोळे यांची जळजळ होत असेल तर उसाचा रस घ्यावा.*


*८. ज्यांना रोज गाडीवर उन्हातून फिरावे लागते. त्यांनीही उन्हापासून बचाव करण्यासाठी रोज दोन वेळा उसाचा रस प्यावा.*


*९. उन्हामुळे येणारा थकवा दूर होण्यासाठीही उसाच्या रसाचा चांगला उपयोग होतो.*


*१०. नाकातून रक्त येणे, लघवीला आग होणे, जळजळ होणे असे त्रास होणाऱ्यांनी रोज उसाचा रस प्यावा.*


    *​!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​*


संकलक अज्ञात। 


सोर्स व्हाट्सअप। 

।।।।।।

Featured post

Lakshvedhi