🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋
*उसाच्या रसाचे फायदे*
*उसाच्या रसात शक्यतो बर्फ टाकू नये.उसाचा रस पिताना स्वचछते संबंधी लक्ष द्यावे.*
*१. उसाचा रस आपली पचनशक्ती वाढवतो. यामुळे पचनसंस्था सुरळीत होते.*
*२. पोटाशी संबंधित अनेक आजार बरे करण्यास उसाचा रस आपली मदत करतो. यामुळे पोट साफ होते व बद्धकोष्ठतेसारखे अनेक विकार बरे होतात.*
*३. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनीही उसाचा रस प्यायला पाहिजे. त्यामुळे पित्त दूर होते.*
*४. उसाचा रस प्यायल्याने हृदयाशी संबंधित अनेक रोगांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. हा प्यायल्याने हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्यता कमी होते.*
*५. उसाच्या रसाने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. शरीरातील धमन्यांचे कार्य सुरळीत होऊन त्यांच्यातील मळ बाहेर पडतो व शरीर स्वच्छ होते.*
*६. जर तुम्ही कमी पाणी पीत असाल तर उसाचा रस नक्की प्या. उसाच्या रसाने शरीरातील द्रव्याचे प्रमाण वाढते. याने शरीरातली पाण्याची कमतरता भरून येईल व किडनी स्टोन सारख्या आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता.*
*७. उन्हामुळे हात, पाय, डोळे यांची जळजळ होत असेल तर उसाचा रस घ्यावा.*
*८. ज्यांना रोज गाडीवर उन्हातून फिरावे लागते. त्यांनीही उन्हापासून बचाव करण्यासाठी रोज दोन वेळा उसाचा रस प्यावा.*
*९. उन्हामुळे येणारा थकवा दूर होण्यासाठीही उसाच्या रसाचा चांगला उपयोग होतो.*
*१०. नाकातून रक्त येणे, लघवीला आग होणे, जळजळ होणे असे त्रास होणाऱ्यांनी रोज उसाचा रस प्यावा.*
*!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!*
संकलक अज्ञात।
सोर्स व्हाट्सअप।
।।।।।।
No comments:
Post a Comment