Friday, 8 March 2024

महिला दिन

 नारी तु, भारी तु ! 

संसारी तु, जग उद्धारि तु, 

संस्कारी तु, ललकारी तु, 

वैज्ञानिक तु, वैमानिक तु !! 


सामाजिक तु, राजकारणी तु, 

व्यावसायिक तु, प्रगतीशील तु, 

सैनिक तु, लढाऊ तु, 

वेगवान तु, गतीमान तु !!!


सलाम तुला, अन नारी दिनाच्या शुभेच्छा तुला.

नारी तु, अन लई भारी तु !!!!


सर्व लहानथोर महिलांना, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  भरभरून शुभेच्छा.  🙏💐🌹

मनोरंजन विश्वाच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

 मनोरंजन विश्वाच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 7 : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसमोर काही आव्हाने असली तरी मनोरंजन विश्वाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. मुंबईतील चित्रनगरीचे मेकओव्हर राज्य शासन करणार आहेगाला हेवा वाटेल अशी चित्रनगरी  आपण करू. चित्रपट ही मोठी इंडस्ट्री आहेमहाराष्ट्रातील कलाकार संस्कृती पुढे नेण्याचं काम करीत असल्याने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने मटा सन्मान २०२४ पुरस्कार प्रदान सोहळा विले पार्ले येथील मुकेश पटेल सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र टाइम्सचे समूह संपादक पराग करंदीकर यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मटा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांनावसुंधरा साथी सन्मान पुरस्कार बीजमाता राहीबाई पोपेरे यांना आणि युथ आयकॉन सन्मान शास्त्रीय गायक महेश काळे यांना प्रदान करण्यात आला.

            यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले कीमहाराष्ट्र टाइम्स सतत २४ वर्षे उत्कृष्ट कलाकृतींचा आणि गुणवंत कलावंतांचा गौरव करत आहे. ही अभिनंदनीय गोष्ट आहे. पत्रकारितेमध्ये ६-७ दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या मटाने मराठी वाचकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. विविध उपक्रमातून महाराष्ट्राच्या सामाजिकसांस्कृतिक प्रगतीत म.टा. ने महत्वाचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

             या सोहळ्यात सुमनताईंना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्याचे भाग्य आम्हा दोघांना लाभलेअसे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेसुमनताईंच्या आवाजात आपण अनेक सुमधुर गाणी ऐकली. त्यांची गाणी आणखी हजारे वर्षे अशीच ताजीतवानी वाटणार आहेत. तसेच तरुण पिढीपर्यंत भारतीय शास्त्रीय संगीत पोहोचवण्यात महेश काळे यांचे मोठे योगदान आहे.   केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही ते शास्त्रीय संगीताचा प्रसार करून खऱ्या अर्थाने  कला संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचे दूत बनले आहेतअशा शब्दात त्यांनी महेश काळे यांचा गौरव केला.

            ते म्हणालेराहीबाई पोपेरे यांना वसुंधरा साथी सन्मान’ दिला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातर्फे दिला जातो.पर्यावरण जागृतीसाठी व्यासपीठ म.टा.ने उपलब्ध करून दिले. बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई यांचं कर्तृत्व मोठं आहे. त्यांनी हायब्रिडविरुद्ध लढा उभारला आणि देशी बियाण्यांचा प्रसार केला. कोणतीही शैक्षणिक पदवी नसली तरी त्या सगळ्यांना डिग्री देणाऱ्या ठरल्या आहातअशा शब्दात त्यांनी राहीबाईंचे कौतुक केले.

            राहीबाई यांनी विषमुक्त शेतीसाठी जे काम सुरू केले आहे त्यासाठी शासन त्यांच्याबरोबर आहे राज्य सरकारने १२१ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. १५ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहेअशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

 

विष मुक्त शेती अभियान राज्यात सुरु

सुरांच्या दोन पिढ्यांचा आज सन्मान

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमटा सन्मान पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित झालो ही भावना मनामध्ये आहे. बीजमाता राहीबाई यांचे काम ही सर्वात मोठी सेवा आहे. आपण सध्या जल वायू प्रदूषणामुळे आरोग्य विषयक प्रश्नांना सामोरे जात आहोत. कॅन्सर रुग्ण वाढत आहेत. विष युक्त अन्न हे याचे मूळ कारण आहे. ते दूर करण्यासाठी राहीबाई प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जनजागृतीचे काम त्या करत आहेत.

            राज्य शासनाने विषमुक्त शेती मिशन सुरू केले आहे. राज्यातील २५ लाख हेक्टर शेती विष मुक्त करण्याचे उद्दिष्ट्य आपण ठेवले आहे. यासाठी काम सुरू झाले असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.

            आजच्या मटा सन्मान सोहळ्यात सुरांच्या दोन पिढ्यांचा सन्मान आज केला  गेला आहेअसे सांगून श्री. फडणवीस म्हणाले कीसुमनताई यांची गाणी अजरामर आहेत. त्यांनी १३ विविध भाषेत गाणी गायली. देवघरात तेवणारा दिवा त्याप्रमाणे सुमनताईंचे गाणे असल्याचे ते म्हणाले. महेश काळे यांनी अभिजात संगीताच्या माध्यमातून  नवीन पिढीला शास्त्रीय संगीताचे वेड लावले. जगातील वेगवेगळ्या देशात हे संगीत नेलेअसे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

            यावेळी पुरस्कारार्थीनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सुमन कल्याणपूर यांनी कृतार्थतेची भावना व्यक्त केली. गेली सत्तर दशके गायन करताना प्रत्येक वेळी रसिकांचे प्रेम मिळाले.  राहीबाई यांनीही आपण निसर्गाच्या शाळेत शिकलो आणि विषमुक्त अन्ना साठी आपण काम करत आहोत. सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तरमहेश काळे यांनीअभिजात संगीत जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशात नेऊन त्याच्या प्रसाराचे काम करण्यास या पुरस्काराने आणखी बळ मिळेल असे सांगितले.

            यावेळी नाट्य चित्र क्षेत्रातील कलावंततंत्रज्ञ यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

00000

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या १ वर्ष ८ महिन्यात एकूण २१३ कोटी अर्थसहाय्य वितरित

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या १ वर्ष ८ महिन्यात एकूण २१३ कोटी अर्थसहाय्य वितरित

 

               मुंबई, दि. 6 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले आहेत.

            यानुसार आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या एक वर्ष ८ महिन्यात २५,००० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण २१३ कोटी ७० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तत्काळ सुरू केला. मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याचीही गरज नाही. पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टीबायपास सर्जरीकर्करोगावरील शस्त्रक्रियाकेमोथेरपीडायलिसिसजन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रियासर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियारस्ते अपघातविद्युत अपघातभाजलेले रुग्णजन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

            दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कक्ष प्रमुख श्री. चिवटे यांनी केले आहे.

0000


 

रेशन दुकानांमध्ये फोर-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅनची सोय

 रेशन दुकानांमध्ये फोर-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅनची सोय 

            मुंबई, दि. 6 : रेशन दुकानांमध्ये आता 4-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना प्रतिक्षा करावी लागणार नाही.


            राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्याचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार/गैरव्यवहार थांबविण्यासाठी, लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले आहे. लाभार्थ्यांची ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूचे वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रास्तभाव दुकानांमध्ये 2जी/3जी ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या होत्या. सदर सेवा देणाऱ्या संस्थाचा कालावधी संपुष्टात आल्याने रास्तभाव दुकानांमध्ये नविन ई-पॉस मशिन बसविण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार ओयॅस्तिस विजनटेक आणि इंअैग्रा या तीन 3 सिस्टम इंटीग्रेटर संस्थांची नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून निवड करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदर कंपन्या सोबत नुकताच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करार करण्यात आला आहे. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे, उपसचिव नेत्रा मानकामे, अवर सचिव पूजा मानकर, कक्ष अधिकारी आशिष आत्राम यांच्यासह संबंधित संस्थाचे प्रतिनिधी मंजुनाथ, राजेंद्र नझरबागवाले व गिरीष पालकर उपस्थित होते.


            रास्तभाव दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नविन ई-पॉस मशिन 4जी व आयरीस स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आधारकार्ड वरील फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार पडताळणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार पडताळणी कशी करावी? हा मोठा प्रश्न यानिमित्ताने मार्गी लागला आहे. शिधापत्रिकेमध्ये आधार संलग्न पात्र असलेली पण फिंगरप्रिंट देता येत नसलेल्या व्यक्तींना 'IRIS स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे आता आधार संलग्न हाताचे ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्यांचे स्कॅन केले जाणार आहे. सदर प्रक्रीयेमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने रेशन दुकानावरील अन्न धान्य वितरण प्रणाली पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत असून नागरिकांना रेशन सहज व सुलभतेने उपलब्ध होणार असल्याचे विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले.


00000

पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा

 पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा


 प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ


रेल्वे, मेट्रो सेवेमुळे विकासाला मोठा वेग


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


       मुंबई, दि. 6 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी - चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.


            प्रधानमंत्री यांनी कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील या मेट्रो प्रकल्पांची दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी झाले होते.


            प्रधानमंत्री लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे.


            यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे या पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते आणि आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.


            प्रधानमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन देखील करण्यात आले.


            हा मार्ग 4.4 किमीचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे.


            मागील पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रात प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. रेल्वे आणि मेट्रोसाठी सुद्धा राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे, ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे.


            आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि आज त्यांच्याच हस्ते ही मेट्रो सेवा सुरू देखील झाली आहे.


            वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे.


            सर्व प्रकल्प आणि विकासकामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

उचंगी व आंबेहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू

 उचंगी व आंबेहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू

- मंत्री अनिल पाटील

 

            मुंबईदि. 6 :- उचंगी व आंबेहोळ लघु पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांवर  कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. या प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

            कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी व आंबेहोळ लघु पाटबंधारे प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसन प्रश्नांबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उप सचिव संजय धारूरकरजलसंपदा विभागाचे उपसचिव प्रवीण कोल्हेमुख्य अभियंता तथा सह सचिव अभय पाठक, तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल  येडगे व अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे (दूरदृश्य प्रणालीद्वारे),  कोल्हापूरच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघनपुनर्वसन विभागाचे कार्यासन अधिकारी अभिजित गावडे व प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले कीया प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या काही प्रश्नांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असून याबाबत शासनस्तरावर कार्यवाही केली जाईल. जिल्हास्तरावरील निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय व दिलासा द्यावा.  जलसंपदा विभागाने त्यांच्या अखत्यारीत असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. वनविभागाच्या हद्दीतून जात असलेल्या रस्त्याचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांची बैठक घेऊन सोडवावाअशा सूचना त्यांनी दिल्या.

            प्रकल्पग्रस्तांच्या पर्यायी जमीन मागणीबाबत जिल्हा प्रशासनाने तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करताना अन्य प्रकल्पांमध्ये कोणते निर्णय घेतले आहेत, याची ही तपासणी करून त्याचाही अहवाल सादर करावा, अशा सूचना  मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

            उचंगी व आंबेहोळ प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या गायरान जमिनीवर आकार नोंद करण्याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

००००

*संवाद!* सु

 *संवाद!*


खरंतर मेन्यू कार्डची त्याला 

उत्सुकता, प्रतीक्षा असते. 

कार्डावर बारकाईनं नजर टाकून 

तो वेटरला ऑर्डर देतो…


थोड्या वेळानं तो वेटर खाण्या-पिण्याचे पदार्थ 

आणि सोबत एक सुंदर तरुणी घेऊन येतो!


समोरच्या खुर्चीवर ती तरुणी विराजमान होते. 


_“हॅव ए गुड टाइम… एन्जॉय!”_

अशा शुभेच्छा देऊन वेटर निघून जातो. 

टेबलावर ते दोघंच…


अनोळखी, अपरिचित…

काही क्षण नि:शब्द जातात.

मग दोघंही एकमेकांचा परिचय करून देतात. 


या जुजबी ओळखीपाळखीनंतर 

तिच्यासाठी कॉफीची ऑर्डर दिली जाते.

दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सुरू झालेला संवाद 

हळुवारपणे रंगत जातो…

 

उभयतांच्या गप्पांचा फड 

चांगलाच रंगलेला असतानाच 

वेटर बिल घेऊन येतो…


दोघांचाही हिरमोड होतो


_“पुन्हा भेटू…!”_

म्हणत त्या तरुणीचा निरोप घेऊन 

तो हॉटेलबाहेर पडतो!


*‘लिसनर’* नावाच्या शॉर्टफिल्मचं 

हे संक्षिप्त कथानक…

जगभर ही फिल्म दाखविली गेली 

आणि तितकीच नावाजलीही गेली!


ही शाॅर्टफिल्म बनविण्यामागे संदर्भ होता 

अमेरिकेतल्या वॉल्डेन युनिव्हर्सिटीच्या 

*'ॲन्युयल रिविव्ह ऑफ सायकॉलॉजी'* 

या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख…


*'संवाद हरवलेली कुटुंबं'* हा त्या लेखाचा विषय. 

अर्थात, तो अमेरिकेतील एकल कुटुंब व्यवस्थेवर 

आणि त्यातही ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, 

आयबीएमसारख्या आयटी कंपन्यात काम करणाऱ्या 

कपल्सवर आधारित…


ज्यांच्या मेंदूतून व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, 

इन्स्टाग्रामसारखी सामाजिक संवादी माध्यमं 

_(सोशल मीडिया)_ जन्माला आली 

तीच माणसं वैयक्तिक आयुष्यात किती 

नि:शब्द, निरस आणि एकलकोंडी असतात, 

हा त्या लेखाचा निष्कर्ष!


या *'लिसनर’* शॉर्टफिल्मची प्रेरणा घेऊन 

कॅलिफोर्नियात, सिलिकॉन व्हॅलीसह युरोपात 

अशी हॉटेल्स सुरू झाली आहेत, 

जिथं तुम्हाला, तुमचं मन मोकळं करता येतं! 


मात्र, त्यासाठी पैसे मोजावे लागतात! 

ते तुमच्यात गुंतत नाहीत;

पण तुम्हाला गुंतवून ठेवतात. 

भावनिकदृष्ट्या कसलीही गुंतवणूक नसलेल्या 

एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पैसे मोजून 

तासभर संवाद साधायला *‘गिऱ्हाईकं’*

 येतील की नाही याबाबत 

हाॅटेलमालक थोडे साशंक होते…


पण त्यांची शंका क्षणभंगुर ठरली. 

बघता-बघता अशा प्रकारची 

*‘टॉक-टाइम’ हॉटेल्स* हाऊसफुल्ल झाली!


*संवाद हरवलेली कुटुंबं,* 

ही आता जागतिक समस्या बनलीय. 

जागतिकीकरणानंतर आर्थिक सुबत्ता आली, 

राहणीमान उंचावलं, पण कामाचा ताण, 

नोकरीची धास्ती आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी 

कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळं 

मनस्वास्थ्य हरवून बसलेली माणसं 

आपल्या घरात आहेत!


ही केवळ नोकरदार वर्गाची समस्या नाही…


विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, वृद्ध 

असे सगळे संवाद हरवून बसलेल्या एक प्रकारच्या 

मानसिक आजाराचे शिकार आहेत!


मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताकची राजधानी 

*प्राग* इथं नुकत्याच झालेल्या 

जागतिक मनोविकार तज्ज्ञांच्या परिषदेत 

या विषयावर अतिशय गांभीर्यानं चर्चा झाली…


विशेषत: कोरोना महामारीनंतर 

आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या 

लक्षणीय वाढीमागे *‘संवादाचा अभाव’*

हे कारण असल्याचं समोर आलंय!


सोशल मीडियावरची गर्दी आणि त्यावर 

खर्ची पडणाऱ्या वेळेत झालेली वाढ 

हे त्याचं एक प्रमुख लक्षण!


प्रत्येकाला काही तरी सांगायचंय, 

पण ऐकणारंच कुणी नाही, 

अशा एका विलक्षण कोंडीत जग अडकलंय!


हा कोंडमारा जीवघेणा ठरतोय…


परवा नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं 

आत्महत्या केली…

आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेली चिठ्ठी वाचून 

आई-वडिलांना धक्काच बसला…


त्यानं लिहिलं होतं, 

_'मी गेल्या अनेक दिवसांपासून_ 

_तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय;_ 

_पण तुम्ही ऐकूनच घेत नाही._ 

_माझ्याच घरात जर कुणी ऐकणारं,_ 

_समजून घेणारं नसेल,_ 

_तर...तर मी कोणाजवळ मन मोकळं करू?’_


या मुलानं लिहिलेल्या चिठ्ठीतल्या मजकुरानं 

आपले डोळे आणि कान उघडले तरी पुरे! 


अन्यथा, पैसे देऊन संवाद साधण्याची सोय 

उपलब्ध करून देणारी हॉटेल्स 

आपल्याकडेही येऊ घातली आहेतच!


*सारांश :* 

*बोला, व्यक्त व्हा, संवाद साधा,* 

*कुठंतरी मन मोकळं करा...*

Featured post

Lakshvedhi