Wednesday, 14 February 2024

सैनिक कल्याण कार्यालयातील पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 सैनिक कल्याण कार्यालयातील

पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. १३ : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक-४०वसतिगृह अधीक्षक-१७कवायत प्रशिक्षक-०१शारीरिक प्रशिक्षण निदेशक-०१तर गट "क" या पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षिकागट-क-०३ या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांपैकी ०१ पद हे अपंग संवर्गातून किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येणार आहे.

            ही भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्या मार्फत होणार आहे.  परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड (Web-based) ऑन लाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Recruitment Tab येथे ३ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होणार असल्याचे सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील फळपीक बागायतदारांना विमा भरपाईबाबत शासन सकारात्मक

 वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील फळपीक बागायतदारांना

विमा भरपाईबाबत शासन सकारात्मक

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

            मुंबई, दि. १३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री भागातील काजू उत्पादकांना विमा भरपाई देण्याबाबत तसेच वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण मंडळातील पात्र शेतकरी बागायतदारांना फळ पीक विमा अनुदान देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी  सांगितले.

             शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडामकृषी संचालक दिलीप झेंडेअवर सचिव नीता शिंदे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी तसेच वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

            हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2022 -23 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री भागातील माडखोलशिरशिंगेकलंबिस्तओवाळीयेवेर्लेपालपोलीकारिवडे निरुखे व भोम गावातील काजू उत्पादकांची नुकसान भरपाईची मागणी होती. वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण मंडळांतर्गत बागायतदार शेतकऱ्यांचीही अनुदानासंदर्भात मागणी होती. माडखोल येथील शेतकऱ्यांना सावंतवाडीऐवजी आंबोली महसूल मंडळाच्या अंतराची तांत्रिक बाब दुरुस्त करण्यासाठी पीक विमा तक्रार निवारण समितीकडे तक्रारी दाखल करण्याच्या सूचना करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

प्रवाशांच्या सेवेसाठी” या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी

 प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यानुसार

प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी

                                                            - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात

5 हजार 150 इलेक्ट्रिक बस दाखल

            ठाणेदि. 13 (जिमाका) :- खाजगी बस सेवेशी स्पर्धा करताना प्रवासी हाच आपला परमेश्वर  असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावीअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या. या बसेसचा लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. 

            यावेळी आमदार प्रताप सरनाईकमाजी आमदार रविंद्र फाटकमाजी महापौर नरेश म्हस्केजिल्हाधिकारी अशोक शिनगारेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैनव्यवस्थापकीय संचालक माधव पुसेकरगोपाल लांडगेमिनाक्षी शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 5 हजार 150 इलेक्ट्रिक बस आपण देत आहोत. काळ बदलतोयस्पर्धात्मक जगात पुढे जातोयअशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे. गाव तिथे रस्तागाव तिथे एसटी या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी एसटी ची बस सेवा खेडोपाडी पोहोचते. अनेक वर्षांपासून एसटी चालक-वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळले आहेत. एसटी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे. एसटीचे ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान आहे. अविश्रांत काम करणारा एसटी कर्मचारी आपल्या सर्वांच्या जवळचा आहे. इलेक्ट्रिक बससीएनजी/एलएनजी गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही. पर्यावरण पूरक वातावरण कायम राहील. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सध्या बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत आहे.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणालेइलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महानगरपालिकांना निधी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही वातानुकूलित सेवा मिळणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांनाही चांगल्या सोयीसुविधा मिळायला हव्यातयासाठी शासन प्रयत्नशील आहे. एस.टी. प्रवासासाठी महिलांना 50 टक्के सवलतीत तिकीट योजना65 ते 75 वयातील नागरिकांना 50 टक्के सवलत तर 75 वर्ष व त्यावरील वय असलेल्या नागरिकांना मोफत प्रवास योजना या योजना महाराष्ट्र राज्यात यशस्वी झाल्या आहेत.

            एसटी नफ्यात येण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. एसटी आपली आहे असे मानून तिचा सांभाळ करायला हवाअसे आवाहन करुन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी चांगली सेवा देणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना वेतनिक लाभ देण्यात यावेतअसे निर्देश दिले. ते म्हणाले कीएस.टी आगार स्वच्छ असले पाहिजेतिथे आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा असाव्यात. शासनाकडून औद्योगिक विकास महामंडळाला एसटी सुशोभिकरणासाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून एस.टी. आगारातील रस्ते चांगले व्हावेतरंगकाम व्हावेइतर सोयीसुविधा निर्माण केल्या जाव्यातही अपेक्षा आहे. नवनवीन कल्पना अंमलात आणून एस.टी अधिक लोकप्रिय होण्यासाठी सर्वांनी झटून काम करावे. डीप क्लीन ड्राईव्ह च्या माध्यमातून सर्वत्र उत्तम प्रकारे स्वच्छता होत आहे. शहरी व ग्रामीण भाग कचरामुक्त होण्यासाठी शासन स्तरावरुन सर्व प्रकारचे प्रयत्न होत आहेत. एस.टी आगारांतर्गत स्वच्छता स्पर्धा आयोजित कराव्यात. तेथील स्वच्छतागृह उत्तम दर्जाचे असावेत. एस.टी.चालक-वाहक यांची विश्रांतीगृहे चांगली असावीत. एस.टी. कॅन्टीन चांगले असावे. तिथल्या अन्नाचा दर्जा उत्तम असावा. गाड्या स्वच्छ असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा मिळायला हवी. गेल्या आठ महिन्यांपासून आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील 193 बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण योजना जाहीर केली आहे.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीराज्यात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हात दाखवा एसटी थांबवा या उपक्रमामुळे लोकांमध्ये आणि एस.टीमध्ये भावनिक नाते तयार झाले आहे. एस.टी कर्मचारी गावातील गरजूंना सेवा देतात. एस.टी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लावू. अनेक तीर्थक्षेत्रासाठी आपल्या एसटीच्या सेवा दिल्या जातात. राज्यातील सर्वच गाड्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा देवून आपल्या एस.टी. ला नफ्यात आणूयाअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव पराग जैन यांनी केले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी खोपट बसस्थानकाची पाहणीही केली व संबंधित अधिकाऱ्यांना बसस्थानकात अधिक  सोयीसुविधा निर्माण करण्याविषयी आवश्यक त्या सूचना दिल्या.

0000


मुंबईत विशेष मतदार नोंदणी मोहीम

 मुंबईत विशेष मतदार नोंदणी मोहीम

मुंबई शहर, उपनगर जिल्हा व मनपा यांची संयुक्त बैठक

            मुंबई दि. 13 : आगामी लोकसभा निवडणूका जाहीर होण्याआधी प्रत्येक मुंबईकराचा मताधिकार सुनिश्चित व्हावा या हेतूनंमुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदार नोंदणीची विशेष मोहिम राबवणार आहे.

            आज मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  संजय यादवबेस्टचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलस्वीप नोडल ऑफिसर फरोग मुकादमविशेष कार्य अधिकारी डॅा. सुभाष दळवीमुख्य  निवडणूक कार्यालय स्वीप समन्वयक पल्लवी जाधवमुंबई महानगरपालिकेचे सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक झाली.

            बैठकीत 18 वर्षावरील नागरीकांसाठी मतदार नोंदणीची विशेष मोहीम तसेच दिव्यांग मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे  या मतदारांपर्यंत पोहचण्याचेअंथरुणावर खिळून असलेल्या नागरिकांची  आरोग्य विभागाकडील उपलब्ध  माहिती तपासून मतदार यादीतील नावांची खात्री करून घेणेमुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या मुंबई विद्यापीठएसएनडीटी महिला विद्यापीठआरोग्य विद्यापीठ आणि होमी भाभा स्टेट विद्यापीठयांच्यासह मुंबई शहर आणि उपनगर भागातील खाजगी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी समन्वय साधून नवमतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्याबाबत  सविस्तर चर्चा करण्यात आली.

नवमतदार नोदणी विशेष मोहिमेत मुंबई महानगरपालिकेचे सर्वतोपरी सहकार्य

- आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल

            बृहन्मुंबई महानगर पालिकेशी संलग्नीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संलग्न आरोग्य सेविकाआशा सेविकामहिला स्वयंसहाय्यता गटमहिला बचत गटस्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान वस्ती पातळीवरील कार्यरत संस्था व त्यांचे स्वयंसेवक आणि नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून नवमतदार नोदणी विशेष मोहिमेत मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी बैठकीत दिले. तसेच सर्व संबंधितांनी निवडणुकीच्या कामाला अधिक प्राधान्य द्यावेअसे निर्देशही बैठकीत दिले.

            जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  संजय यादव यांनी  मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाही मध्ये सहभागी होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे.असे सांगून मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावेआणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in / Voter Helpline Mobile App / मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

000

कलावंतांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोहोचवण्याचे काम

 कलावंतांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती

जगभरात पोहोचवण्याचे काम

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 13 : महाराष्ट्राच्या संस्कृतीला जगभरात सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम कलावंतांनी केले आहे. या सर्व कलावंतांनी महाराष्ट्राच्या रसिकांची सेवा केली आहे. त्यामुळेच राज्य शासनाने या कलावंतांच्या पुरस्काराच्या सन्मान निधीत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात यामध्ये आणखी वाढ करण्यात येईल. त्याचसोबतवृध्द कलावंतांच्या  पेन्शन योजनेच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईलअशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.

            सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारभारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव  पुरस्कारनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारसंगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारतमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान समारंभ आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला. यावेळी मंत्री श्री. मुनगुंटीवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे व्यासपीठावर उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेहे सर्व कलावंत आणि त्यांची कला ही अनेक पिढ्यांचे समाधान करत आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्याची प्रथापरंपरा आहे. आपला देश संस्कृतीप्रधान आहेएखाद्याच्या योगदानाचे मनापासून कौतुक करणेत्याला दाद देण्यासाठी विशाल हृदय लागते. महाराष्ट्र शासनाने ही सहृदयता जपली आहे. आपल्या मराठी माणसाचं आपण कौतुक करणं यापेक्षा मोठा आनंद नाही. प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या कामासाठी मान्यता आणि कृतज्ञता दर्शविणारा हा सोहळा आहेअशी भावना त्यांनी व्यक्त केली.

            अभिनयलेखनकीर्तनप्रवचननृत्यदिग्दर्शन या विविधांगी कलांनी आपला महाराष्ट्र नटलेला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला ऐतिहासिक आणि गौरवशाली परंपरा आहे.

            समर्पित भावनेने काम करणाऱ्या वृद्ध कलावंतांना राज्य शासन मदत करते. त्यासाठी असणारी वयोमर्यादा आपण ५० वर्षे इतकी ठेवली. या वृध्द कलावंतांच्या पेन्शन मध्येही आपण लवकरच वाढ करीत असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

            राज्यात ७५ चित्र नाट्य मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवायमहासंस्कृती उत्सव घेतला. रसिकांनी जिल्ह्याच्या ठिकाणी यामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमांना भरभरुन दाद दिली. राज्यात सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी तयार केलेली समिती काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी बोलताना प्रधान सचिव श्री. खारगे म्हणालेमहाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणाऱ्यांचा हा सन्मान आहे. विविध परंपरेनेसंस्कृतीने नटलेला असा हा आपला महाराष्ट्र आहे.

            राज्याबाहेर जाऊनही आपण मराठी संस्कृती प्रसारासाठी काम करत आहोत.  दरवर्षी  तीन मराठी चित्रपट कान्स फिल्म महोत्सवासाठी पाठवतो. पुरी ते पंढरपूर हा ओडिशा राज्यासोबत आपण कार्यक्रम करत आहोत. इतर राज्यासोबत आपण मराठी संस्कृती प्रसारासाठी काम करत आहोत. यावर्षी राज्याच्या सर्व जिल्ह्यात पाच दिवसांचा महासंस्कृती महोत्सव आयोजित केला आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्याचे आयोजन केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

            यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध पुरस्कारार्थीना सन्मानचिन्हमानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. राज्य सांस्कृतिक पुरस्कार रक्कम यावर्षीपासून तीन लाख रुपये तर जीवनगौरव पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

            यामध्येयावेळी सन 2023 साठीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह. भ. प. नारायण जाधव यांना,  भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी पं. उल्हास कशाळकर आणि सन 2023 साठी पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळेनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी सुहासिनी देशपांडे आणि सन 2023 साठी अशोक समेळसंगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन 2022 साठी नयना आपटे आणि सन 2023 साठी पं. मकरंद कुंडलेतमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सन 2021 साठी श्रीमती हिराबाई कांबळे आणि सन 2022 साठी अशोक पेठकर यांना प्रदान करण्यात आला.

            तसेच सन 2022 आणि सन 2023 साठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कारही या समारंभात प्रदान करण्यात आले. सन 2022 च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये वंदना गुप्ते (नाटक)मोरेश्वर अमृतराव निस्ताने  (उपशास्त्रीय संगीत)अपर्णा मयेकर (कंठसंगीत)हिरालाल रामचंद्र सहारे (लोककला)शाहीर जयवंत अभंगा रणदिवे (शाहिरी),  लता सुरेंद्र (नृत्य)चेतन दळवी (चित्रपट)प्राची गडकरी (कीर्तन /समाजप्रबोधन)पं. अनंत केमकर (वाद्यसंगीत)डॉ. संगीता राजेंद्र टेकाडे (कलादान)अब्दुलरहेमान माशुम बेपारी उर्फ बुड्डणभाई बेपारी (वेल्हेकर) (तमाशा) आणि भिकल्या लाडक्या धिंडा (आदिवासी गिरीजन) यांना गौरवण्यात आले. श्रीमती गुप्ते यांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारला.

            सन 2023 च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये ज्योती सुभाष (नाटक)पं.ह्रषिकेश बोडस  (उपशास्त्रीय संगीत)रघुनंदन पणशीकर (कंठसंगीत)कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज (लोककला)शाहीर राजू राऊते (शाहिरी),  सदानंद राणे (नृत्य)निशिगंधा वाड (चित्रपट)अमृताश्रम स्वामी महाराज (ह.भ.प. अमृतमहाराज जोशी) (कीर्तन /समाजप्रबोधन)शशिकांत सुरेश भोसले (वाद्यसंगीत)यशवंत रघुनाथ तेंडोलकर (कलादान)उमा खुडे (तमाशा) आणि सुरेश नाना रणसिंग (आदिवासी गिरीजन) यांना गौरवण्यात आले.

            यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य संचालक श्री. चवरे यांनी केले, तर आभार सहसंचालक श्रीराम पांडे यांनी मानले.

0000

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

 मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी

निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीची बैठक

           

            मुंबईदि. 13 : महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया अर्थात मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार  प्रकल्पाची शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्भया पथकांच्या माध्यमातून महिलांची सुरक्षा पोलीस विभाग करीत आहेत. निर्भया प्रकल्पांतर्गत प्राप्त निधीचा उपयोग करून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करून मुंबईत महिलांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी विविध बाबींवर आज मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

            निर्भया योजनेंतर्गत मुंबई पोलिसांचे श्वान पथक’ सक्षम करून गुन्हे सिद्धतेसाठी अधिकचे पुरावे मिळणार आहे. त्यामुळे महिला अत्याचार गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्यास मदत होईल.  वितरीत करण्यात आलेला निधीमधून या पथकाचे सक्षमीकरण होईल. यामधून श्वान पथकाची निश्चितच क्षमतावृद्धी होणार आहे.

                 रेल्वे पोलिसांना निर्भया प्रकल्पांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  या निधीचा उपयोग करून रेल्वेलोकलमध्ये महिला सुरक्षेच्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुंबई शहरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये महिला सुरक्षिततेसाठी असलेल्या निर्भया पथकातील कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी वॉर्म कॅमेरे’ देण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे सिद्ध करतेवेळी पुरावे गोळा करण्यासाठी  निर्भया पथकातील कर्मचाऱ्यांकडे असलेल्या अशा कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डींग उपयोगी ठरणार आहे.

              त्याचप्रमाणे या प्रकल्पांतर्गत महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमधील तपास कार्य जलद गतीने पूर्ण  करण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने संवदेनशील भागात फिरत्या गस्त वाहनांची संख्याही वाढविण्यात येईल. तसेच महिला सुरक्षेबाबत जनजागृती मोहीमही राबविण्याचे प्रस्तावित आहे. अशा विविध बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

*****

नीलेश तायडे/विसंअ/

 


पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात आगामी काळात विविध संधी

 पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात आगामी काळात विविध संधी

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबई, दि. 13 : देशात इंद्रधनुष्याप्रमाणे कृषी क्षेत्रात हरित क्रांतीदुग्ध उत्पादनात श्वेत क्रांतीडाळींच्या उत्पादनात पित क्रांतीमत्स्य उत्पादनात नील तर मांस उत्पादनात लाल क्रांती झाली. आगामी काळात पशुपालनमत्स्य शेती व दुग्धव्यवसाय हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी आकर्षक  होणार असून या क्षेत्रात गुंतवणूकउद्योग व रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतीलअसे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.

            राज्यपाल श्री. बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा (माफसू) ११ वा दीक्षांत समारंभ झालात्यावेळी ते बोलत होते.

            शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात पशुसंवर्धनदुग्धव्यवसाय व मत्स्यपालनाची भूमिका महत्वाची आहे, असे सांगून पशुविज्ञान विद्यापीठातील स्नातकांकडे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याची तसेच  रोजगार निर्मिती करुन ग्रामीण भागात उपजीविका उपलब्ध करुन देण्याचे सामर्थ्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  या क्षेत्रातील स्नातकांनी पशुपालनदुग्ध व्यवसाय व मत्स्यपालन या क्षेत्रात उद्योग सुरु करावेअसे आवाहन राज्यपालांनी केले. 

            विद्यापीठातील प्राध्यापक - स्नातकांनी २०२२ या वर्षी ‘लम्पी’ त्वचा रोगाच्या निर्मूलनाचे कार्य करताना अनेक प्राण्यांचे जीव वाचवले तसेच स्वदेशी गायींच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

            दोन महिन्यांपूर्वी आपण गोरेवाडा नागपूर येथील वन्यजीव बचाव व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली होती असे सांगून मनुष्य व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.    

            आपल्या दीक्षांत भाषणात मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अनिलकुमार श्रीवास्तव यांनी दुग्ध उत्पादन क्षेत्रातील श्वेतक्रांतीचा प्रभाव व सकल मूल्य हरित क्रांतीपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. अन्नधान्य उत्पादनात देश आत्मनिर्भर आहे. पोषण सुरक्षेची समस्या दूधअंडीमासे व मांस यांच्या माध्यमातून सोडविता येऊ शकते असे त्यांनी सांगितले.  वातावरणातील टोकाच्या बदलांचा मोठा परिणाम कृषी व अन्नधान्य उत्पादनावर होत असून राज्यात तसेच देशात पशुसंवर्धन व मत्स्यपालन उद्योग यातील मोठ्या क्षमतांची नोंद घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

            दीक्षांत समारोहात १७९० स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या९५ स्नातकांना सुवर्ण व रौप्य पदके देण्यात आली तर तीन स्नातक विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देण्यात आली. 

            यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. ‘माफसु’चे कुलगुरु डॉ. नितीन पाटील यांनी विद्यापीठ अहवाल सादर केला.

            दीक्षांत समारोपाला विद्यापीठाचे माजी कुलगुरुइतर विद्यापीठांचे कुलगुरुविभाग प्रमुखशिक्षक व स्नातक उपस्थित होते. 

*****


 

Maharashtra Governor presides over

11th Convocation of MAFSU through online mode

 

      Maharashtra Governor and Chancellor of universities Ramesh Bais presided over the 11th Annual Convocation of the Maharashtra Animal and Fishery Sciences University (MAFSU) through online mode.

      Degrees were awarded to 1769 candidates, while gold and silver medals were given to 95 candidates. Three graduating students were given cash prizes.

      The Message of Minister of Animal Husbandry and Dairy Development Radhakrishna Vikhe Patil was read out on the occasion.

      Vice Chancellor of Pt Deen Dayal Upadhyaya Veterinary Science University Mathura Dr A K Shrivastav delivered the Convocation address while MAFSU Vice Chancellor Niteen Patil read out the University's Report.

      Former vice chancellors of the University, vice chancellors of other universities, Heads of Department, teachers and graduating students were present.

0000

Featured post

Lakshvedhi