Saturday, 10 February 2024

उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

 उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            ठाणेदि. 09 (जिमाका) :- राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचे भूमीपूजन व "मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा"  (मेडिक्लेम पॉलिसी) शुभारंभ आज हॉटेल टिप-टॉप प्लाझा येथे झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

            यावेळी उद्योग मंत्री उदय सामंतमाजी आमदार रविंद्र फाटकमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपिन शर्मासहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारीविजय राठोडएमआयटीएलचे एम.डी. श्री.मल्लिकनेरस्थानिक पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेराज्यात उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. राज्यात उद्योगांना गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण आहे. आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेतयासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपण सर्वांनी गतिमानतेने कामे केली पाहिजेत. आज महाराष्ट्र एफडीआय मध्ये क्रमांक 1 चे राज्य आहे. उद्योगांसाठी असलेली ध्येय-धोरणे सुटसुटीत असली पाहिजेत.

      महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळ इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था वाढविली पाहिजे. एमआयडीसीतील अधिकारीकर्मचाऱ्यांच्या 8 वी ते 10 वी च्या पाल्यांला दरवर्षी टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. औद्योगिक विकास महामंडळातील 450 अधिकारीकर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारीकर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजना (मेडिक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. हा एक चांगला उपक्रम एमआयडीसीने राबविला आहे.

      राज्यात कॅशलेस आरोग्य सेवा संपूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 2 कोटी 8 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. प्रशासन त्यासाठी दिवसरात्र काम करीत आहेएकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहायला नकोयासाठी सर्वजण काम करीत आहेत. स्वच्छता मोहिमेमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी मधून गरजू रुग्णांना आतापर्यंत 2.5 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

      यावेळी उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले कीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी हा आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. गेले 16 महिने महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. हे सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झाल आहे. अधिकारीकर्मचाऱ्यांनी मागणी करण्याअगोदरच त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. ठाण्यात पार्किंगची व्यवस्था व्हावी व ट्रॅफिक पासून मुक्ती मिळावीयासाठी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळ व्हावेहा मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. यासाठी 34 कोटी रुपये खर्च करुन हे बहुस्तरीय वाहनतळ पूर्ण  करण्यात आले आहे.

      यावेळी मंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या काही पाल्यांना प्रातिनिधीक स्वरुपात काही पाल्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यापुढे दरवर्षी 8 वी ते 10 वी मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना टॅब वाटपाचे धोरण जाहीर करण्यात आले.औद्योगिक विकास महामंडळातील 450 अधिकारीकर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारीकर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजना" (मेडीक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. या विम्याचे हप्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरणार आहे.

       कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपिन शर्मा यांनी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळा विषयी माहिती दिली.     कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने व दिपप्रज्वलनाने झाली.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मानसी सोनटक्के यांनी केले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारीकर्मचारीत्यांचे कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000000


 

सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण विभागाचा, सचिव सुमंत भांगे यांच्याकडून आढावा

 सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण विभागाचा,

 सचिव सुमंत भांगे यांच्याकडून आढावा

 

            मुंबई‍‍दि.९ : सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागामार्फत राज्यात विविध योजना व उपक्रम राबविले जातात. सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मंत्रालयात याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. विविध योजनांसाठी आलेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी विभागाने नियोजन करावे, अशा सूचना सचिव श्री. भांगे यांनी दिल्या.

            सचिव श्री. भांगे म्हणालेसन २०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी निधी पूर्णपणे खर्चित होण्याच्या दृष्टीने विभागांतर्गत सर्व महामंडळेसमाज कल्याण आयुक्तालयप्रादेशिक उपायुक्तसहायक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व दिव्यांग कल्याण विभागाने त्यांचे स्तरावरुन मंजूर निधी खर्चाबाबत नियमानुसार विहीत वेळेत कार्यवाही करावी. त्यासंबंधी तातडीने प्रस्ताव सादर करावे.

            दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने निकाली काढण्याचे निर्देश ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी'  अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले. आमदार श्री. कडू हे दृकश्राव्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

            या  बैठकीमध्ये अर्थसंकल्पित निधीपैकी अखर्चित निधीबाबतचे प्रस्तावविशेष शाळांमधील रिक्‍त पदांच्या अनुषंगाने ना-हरकत प्रमाणपत्राचे प्रस्तावविशेष शाळांना अनुदान देण्याबाबत धोरणदिव्यांग शाळांचा बृहत आराखडानमो दिव्यांग शक्ती अभियान तसेच मानसिक आजारमुक्त व्यक्तींसाठी पुनर्वसन गृहे स्थापन करणेबाबतचे प्रस्ताव याबाबत चर्चा करण्यात आली.

            या बैठकीस समाज कल्याण आयुक्त  ओम प्रकाश बकोरियाबार्टीचे महासंचालक सुनील वारेसमाज कल्याण आयुक्तालयातील सर्व उपायुक्तराज्याचे सर्व प्रादेशिक उपायुक्तसहाय्यक आयुक्त ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी हिंदूस्थान ॲग्रोचे अध्यक्ष डॉ.ढोकणे पाटील,   सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कपुणे चे महासंचालक डॉ.राजेंद्र जगदाळेतसेच सामाजिक न्याय विभाग व दिव्यांग  कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

१ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी

 १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी

 - मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

१३ फेब्रुवारीला विशेष मोहीम

 

            मुंबईदि. ०९ : जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमियापोटदुखीउलट्याअतिसारमळमळभूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजार उद्भवण्याची शक्यता असते. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोनदा १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याची मोहीम राबविली जाते. येत्या १३ फेब्रुवारीला ही विशेष मोहीम राबविली जाणार असून१ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी या मोहिमेंतर्गत जंतनाशक गोळी घ्यावीअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

            राज्यातील आरोग्य विभाग या मोहिमेची जय्यत तयारी करीत असूनवैद्यकीय अधिकारीशिक्षक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना याविषयीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मोहिमेत १३ फेब्रुवारीला गोळी न घेऊ शकणाऱ्या मुलांना २० फेब्रुवारीला जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. राज्यभरामध्ये १३ फेब्रुवारी रोजी जवळपास २ कोटी ८० लाख मुला-मुलींना १ लाख १० हजार ९४४ अंगणवाडी केंद्रे१ लाख २७ हजार ८४९ शाळा व महाविद्यालयांमध्ये जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभागशिक्षण विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने राज्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावाअसे आवाहनही करण्यात आले आहे.

            आरोग्य विभागाकडून सप्टेंबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जंतनाशक मोहीम राबविली जाते. यंदा १३ फेब्रुवारी रोजी ही विशेष मोहीम राबविली जात असून त्यादृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. १ ते १९ वर्ष वयोगटातील मुलांना अर्धी ते एक गोळी खायला किंवा पाण्यात विरघळून दिली जाते. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये बैठकही घेतली जात आहे.

            जंतनाशक मोहिमेमध्ये १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २०० मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी२ ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येतेतर ३ ते ६ वर्षे वयोगटाच्या बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास किंवा पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते. ६ ते १९ वर्षे वयाच्या मुला-मुलींना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास देण्यात येते. वर्षातून दोन वेळा ही गोळी घ्यायला हवी. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावीअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

            या मोहिमेविषयी काही शंका असल्यास आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४ वर नागरिक संपर्क करू शकतात किंवा गरज भासल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका सेवेच्या टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करुन रुग्णवाहिका मागवू शकतात.

मोफत मिळते जंतनाशक गोळी

            अल्बेंडाझोल ही गोळी मोहिमेच्या दिवशी मोफत दिली जाते. तसेच आरोग्य उपकेंद्रप्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयजिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडीशाळामहाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जंतसंसर्गाच्या प्रतिबंधासाठी दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर जंतनाशक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली आहे.

मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2023 जाहीर

 मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2023 जाहीर

            मुंबईदि. 9 : महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या डॉ.अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 साठी डॉ. प्रकाश परब (व्यक्तीसाठी) यांची तर वाङ्मय चर्चा मंडळबेळगाव (संस्थेसाठी) यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी  भाषा संवर्धक पुरस्कार 2023 साठी डॉ. कौतिकराव ठाले पाटील (व्यक्तीसाठी) यांची तर कुसुमाग्रज प्रतिष्ठाननाशिक (संस्थेसाठी) यांची निवड करण्यात आली असल्याचे मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. प्रत्येकी दोन लाख रूपये रोखमानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

            मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षणसंगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस आणि संस्थेस भाषा संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांसाठी नेमलेल्या निवड समितीची बैठक दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती.

०००००

ज्येष्ट नागरिक हो तुमच्यासाठी



Friday, 9 February 2024

श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावे

 श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगडसह्याद्री व्याघ्र प्रकल्प

पर्यटन विकास आराखड्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावे

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई दि. 8 : पर्यटन विकास आराखड्यामध्ये महाबळेश्वरप्रतापगडसह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यानुसार कामे करताना मूळ वास्तू आणि परिसराच्या सुशोभीकरणाची कामे  नैसर्गिक रंग वापरूनबांधकामाचे साहित्य देखील पर्यावरण पूरक वापरण्यावर भर दिला जाईलया परिसराचे मूळ सौंदर्य राखले जाईल, अशी कामे प्रस्तावित करावीत. प्रशासनाने हे प्रस्ताव  तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

            मंत्रालयातील उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या दालनात श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड, निसर्ग पर्यटन विकास आराखडा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याबाबतची आढावा बैठक आज झाली. या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईआमदार मकरंद पाटील,  दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आमदार  शिवेंद्रसिंहराजे भोसलेनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेवित्त विभागाच्या सचिव ए.शैलासातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ,  पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीप्रतापगड किल्ला जतन आणि संवर्धन या बाबी लक्षात घेऊन गडावर जाणारे व येण्याचे मार्गबुरुज व तटबंदी  बांधकामकिल्ल्यावर झालेल्या पडझडीच्या दुरुस्तीची कामेपर्यटकांसाठी सोयीसुविधा या सर्व कामांचा पर्यटन विकास आराखड्यामध्ये समावेश करावा. किल्ल्याचे मूळ सौंदर्य कोणत्याही प्रकारे खराब दिसू नये याची खबरदारी घ्यावी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटन विकासाची कामे करताना या परिसरातील जैवविविधता राखली जावी. स्थानिक कृषी पर्यटनाला चालना मिळावीस्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या गोष्टी लक्षात घ्याव्यात.

            श्रीक्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास करताना स्थानिक ठिकाणी असलेली पुरातन मंदिरे तसेच वास्तू यांच्या रचना लक्षात घेऊन नवीन कामे प्रस्तावित करावी. जी कामे करणार ती गुणवत्तापूर्ण करून, परिसराचे सुशोभीकरणासाठी पुरातन वास्तूंची रचना लक्षात घेऊन त्याच प्रकारे कामे करावीत. किल्ले विकसित करण्यासाठी  वापरण्यात येणारे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकणारे असावे, याची दक्षता घ्यावी. श्री क्षेत्र महाबळेश्वर मध्ये असलेली पुरातन मंदिरनद्या आणि आजूबाजूचा परिसराची कामे करताना  स्थानिकांच्या सूचना विचारात घ्याव्यात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कायम टिकणारे पर्यटन विषयक कार्यक्रम राबवावा. राजस्थानकेरळ राज्याप्रमाणे पर्यटन महोत्सव राबवा. पर्यटन फेस्टिवलच्या दिनदर्शिकेमध्ये कांदाटी फेस्टिवलचा देखील समावेश करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

            आमदार श्री. भोसले यांनी प्रतापगडावरील पाणीटंचाई दूर करावी. श्री क्षेत्र महाबळेश्वरप्रतापगड किल्ला,सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देत ही कामे गतीने करण्याबाबतच्या सूचना केल्या.

            साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण केले. या प्रकल्पांतर्गत राबवण्याच्या संभाव्य उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. या परिसराचा विकास करताना स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण करण्यासाठी पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

*****

पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना विद्यार्थी उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील

 

पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग

सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना

विद्यार्थी उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

            मुंबईदि. 8 - राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावीअशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली आहे. विभागामार्फत अभ्यास करुन तज्ज्ञांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होईल आणि ते उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतीलअसा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

            राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर मंत्री श्री. केसरकर यांच्या निर्देशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञशिक्षण प्रेमीपालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे.

            शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाहीयाची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी. यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावीअसेही या परिपत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

            या अनुषंगाने केलेल्या अभ्यासामध्ये पुढील बाबी समोर आल्या आहेत. काही शाळा विशेषतः खासगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याचे दिसून येते. विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने ते शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात आणि रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो. मोसमी हवामानविशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणेपावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होऊन ते बहुदा आजारी पडतात.  सकाळी पाल्याला लवकर तयार करणेजेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुकेपाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.

            यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असून शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावाअशी सूचनाही करण्यात आली आहे.

            या परिस्थितीचा विचार करता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळेत बदल करणे आवश्यक होते. यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी नऊ किंवा नऊ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत या सूचना निर्गमित करण्यात आल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi