Saturday, 25 November 2023

रमाकांत पांडा यांचे छायाचित्रणाबरोबरचवन संवर्धनाचे कार्य महत्वपूर्ण

 . रमाकांत पांडा यांचे छायाचित्रणाबरोबरचवन संवर्धनाचे कार्य महत्वपूर्ण

                                                                                -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 25 : निसर्ग विविधतेने नटलेला आहे. या निसर्गातील वन्य प्राण्यांचे डॉ. रमाकांत पांडा यांनी केलेले छायाचित्रण कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. या बरोबरच त्यांनी सुरू केलेले वन संवर्धानाचे कार्य महत्वपूर्ण आहेअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            प्रसिध्द हृदय विकार शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांनी भारतातील पेंचजिम कॉर्बेटसातपुडाताडोबाबांधवगड या व्याघ्र प्रकल्पांसह केनियादक्षिण आफ्रिकाटांझानियाचा प्रवास करून सिंहवाघहत्तीबिबट्यासह वन्य प्राण्यांच्या काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर कला दालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळडॉ . रमाकांत पांडाएशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीनाथ के. ए. आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीडॉ. पांडा हे देशातील प्रथितयश हृदय शस्त्रक्रिया तज्ञ आहेत. त्यांनी निसर्गवन्य प्राणीपशु पक्षी यांचे केलेले छायाचित्रण सुंदर आहे. त्यांनी निसर्गाचे छायाचित्रण करण्याबरोबर संवर्धनाचे काम केले आहे. ते अनुकरणीय आहे. यावेळी  डॉ. पांडा यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. 

 

घराचे स्वप्न साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त

 L

घराचे स्वप्न साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त

                                                                                                -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. 25 : आपले स्वतःचे घरकुल असावेअसे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त ठरेल. या क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातीलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिलच्या (NAREDCO) वतीने बांद्रा- कुर्ला संकुलात देशातील सर्वात मोठे होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज दुपारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नारडेकोचे अध्यक्ष संदीप रुणवालसचिव अभय चांडक आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ‘नारडेकोने देशातील सर्वात मोठे प्रदर्शन भरविले आहे. यामुळे सर्व सामान्य घर खरेदीदारांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. या क्षेत्रात वेगवेगळ्या कंपन्याकॉर्पोरेट हाऊस यांनी प्रवेश केला आहे. घर खरेदीदारांना स्वस्त आणि चांगले घर निवडण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे.             बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी महारेरा ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बांधकाम क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच अशा प्रकारचे प्रदर्शन पुढील वर्षी आयोजित करावेअशीही सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. 

यावेळी श्री. रुणवाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 लल

                                                                                                -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            मुंबई, दि. 25 : आपले स्वतःचे घरकुल असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त ठरेल. या क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिलच्या (NAREDCO) वतीने बांद्रा- कुर्ला संकुलात देशातील सर्वात मोठे ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज दुपारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘नारडेको’चे अध्यक्ष संदीप रुणवाल, सचिव अभय चांडक आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ‘नारडेको’ने देशातील सर्वात मोठे प्रदर्शन भरविले आहे. यामुळे सर्व सामान्य घर खरेदीदारांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. या क्षेत्रात वेगवेगळ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांनी प्रवेश केला आहे. घर खरेदीदारांना स्वस्त आणि चांगले घर निवडण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे. बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी ' महारेरा ' ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बांधकाम क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच अशा प्रकारचे प्रदर्शन पुढील वर्षी आयोजित करावे, अशीही सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. 


यावेळी श्री. रुणवाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पोलीस गस्त नौकासागरी किनारा सुरक्षिततेसाठी विविध उपाय योजना

 पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पोलीस गस्त नौकासागरी किनारा सुरक्षिततेसाठी विविध उपाय योजना

            मुंबईदि. 25: राज्यात 26/11 च्या दहशतवादी हल्ल्या नंतर गृह विभागानकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेचे उपाय योजना करण्यात आल्या आहेत.  त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाय योजनांचा समावेश आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पोलीस गस्त नौका आहेत. सध्या राज्यात 30 पोलीस बोटी कार्यरत आहेत आणि राज्याच्या किनारपट्टीवर नियमितपणे गस्त घालत आहेत.  याशिवाय राज्याने 25 ट्रॉलर भाड्याने घेतले असूनहे सर्व ट्रॉलर्स सातही सागरी पोलीस घटकांमार्फत सागरी किनारीभागात गस्त घालण्यासाठी वापरले जातात. 

            तसेच राज्य शासनातर्फे  28 नवीन बोटी तीन टप्प्यात घेण्याच्या प्रक्रिया सुरु आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 10 नवीन बोटी खरेदी केल्या जाणार आहेत. राज्य पोलीस दलाकडे सध्या असलेल्या बोटींचे आधुनिकीकरण करण्याच्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाकडील एक बोट - मुंबई 2,  हिचे आधुनिकीरण  करण्यात आले आहे. तसेच सदर नौकाच्या सागरी चाचणीनंतर तिचा वापर सागरी गस्तीसाठी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याच मार्गावर इतर बोटींना कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

          सर्व गस्ती नौकांच्या गस्तीवर लक्ष ठेवण्यासाठीराज्याने सर्व किनारी घटकांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी 53 लाख रुपये मंजूर केले आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हे नियंत्रण कक्ष समुद्रात गस्त घालणाऱ्या पोलीस नौकांवर लक्ष ठेवणार असूनत्यांना मार्गदर्शन देखील करु शकणार आहेत. पुढील पाच वर्षांसाठी इंटरमीडिएट सपोर्ट व्हेसल्स (ISV) भाडेत्तवावर घेण्यासाठी राज्य शासनाने 51 कोटी चा निधी मंजूर केला आहे.  या मोठ्या बोटी असून समुद्रात खोलवर जाण्याची त्यांची क्षमता आहे. तसेच त्या प्रतिकूल हवामानाचा सामना देखील करू शकतात.  तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने अलीकडेच 81 मास्टर्स आणि इंजिन डायव्हर्स आणि 158 खलाशांच्या कायमस्वरूपी भरतीला मंजुरी दिली आहे. पोलीस गस्ती नौका चालवण्यासाठी आणि नौकांच्या देखभालीसाठी मदत करतात.  महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने त्यांच्या जेट्टीचा वापर पोलीस नौकांसाठी करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे पोलीसांच्या गस्ती नौकांच्या देखभाल दुरुस्तीकरीता व पेट्रोलींग करणे सोईचे झाले आहे. 

        अलीकडेच 16 आणि 17 नोव्हेंबर 2023 रोजी सर्व सागरी सुरक्षेशी निगडीत अस्थापनांच्या सतर्कतेचे मूल्यांकन करण्यासाठी तटरक्षक दलाने ऑपरेशन सागर कवच आयोजित केले होते. या ऑपरेशन मध्ये सर्व 44 किनारी पोलीस ठाण्यांनी भाग घेतला आणि बोटी आणि व्यक्तींच्या अनधिकृत प्रवेशास यशस्वीरित्या प्रतिबंध केला आहे,  अशा विविध सुरक्षेच्या उपायोजना राज्य शासनामार्फत करण्यात आल्या आहेत. अशी माहिती गृह विभागाच्यावतीने  दिली आहे.

 

0000

 


राज्यपालांच्या उपस्थितीत एशियाटिक सोसायटीचा 219 वा वर्धापन दिवस संपन्न

 राज्यपालांच्या उपस्थितीत एशियाटिक सोसायटीचा 219 वा वर्धापन दिवस संपन्न

"वाचन सुलभता वाढविण्यासाठी अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटायझेशन करावे" : राज्यपाल रमेश बैस

 

            मुंबई दि. 25 :-  नवी पिढी वाचनापासून दूर जात आहेहा चुकीचा समज आहे.  डिजिटल माध्यमे आल्यामुळे नवी पिढी वाचन सुलभता शोधत आहे. 'व्यापार सुलभते'प्रमाणेच वाचकांना वाचन सुलभता हवी आहे. ग्रंथ वाचन बंद झाले नाही तर वाचण्याची पद्धत बदलली आहे. त्यामुळे ग्रंथालयांनी अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटलायझेशन करावेअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.    

            मुंबईचे सांस्कृतिक वैभव असलेल्या एशियाटिक सोसायटीचा 219 वा वर्धापन दिवस राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत  सोसायटीच्या सभागृहात संपन्न झालात्यावेळी ते बोलत होते. 

            लाखो दुर्मिळ ग्रंथहस्तलिखितेनाणी व नकाशांचा संग्रह असलेली एशियाटिक सोसायटी आपल्या अस्तित्वासाठी लढताना दिसत आहे. परंतु मुंबई हे दानशूर लोकांचे शहर आहे. मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून शेकडो अशासकीय संस्था आपल्या सेवाभावी कार्यांसाठी मुंबईतून निधी संकलन करीत असतात. त्यामुळे निधीची कमी नाहीतर योग्य व्यक्तींकडे योग्य प्रस्तावासह पोहोचणे आवश्यक असल्याचे राज्यपाल  श्री. बैस यांनी यावेळी सांगितले. 

            एशियाटिक सोसायटीने राज्यातील सर्व विद्यापीठांसोबत काम करावेआपल्या भव्य जागेची पुनर्रआखणी करावी व युवा वाचकांना साहित्य उपलब्ध करुन द्यावे, जगातील मोठमोठी ग्रंथालये स्वतःला कसे बदलत आहेत याचे अध्ययन करुन आपण त्यानुसार बदल करावे तसेच युवा पिढीला व कॉर्पोरेट सदस्यांना व्यवस्थापनात घ्यावे अशा सूचनाही राज्यपालांनी यावेळी केल्या. 

            एशियाटिक सोसायटीला अध्यक्ष म्हणून इतिहासकारलेखक व संपादकांची परंपरा लाभली आहे. सोसायटीने स्वतःचा वार्षिक साहित्य उत्सव निर्माण करावा. संगीत समारोहाचे देखील आयोजन करावे. अनेक देश आज आपल्या देशातील ऐतिहासिक वारशाच्या माध्यमातून पैसे कमवत आहेत. एशियाटिक सोसायटीने आपले कार्य सुरु ठेवण्यासाठी आपले स्थापत्य व ग्रंथ वैभव जगापुढे आणावे अशी सूचना राज्यपालांनी केली.      

            यावेळी डॉ सरयू दोशी (भारतीय कलाइतिहास व संस्कृती)डॉ अनुरा मानातुंगा (लेखक व क्युरेटर । कला इतिहास),  प्रो. नोबुयोशी नामाबे (बुद्धिस्ट स्टडीज)प्रो गोपाल कृष्ण कान्हेरे (रौप्य पदक) व प्रो. ब्रजकिशोर स्वैन (धर्मशास्त्र - महामहोपाध्याय डॉ पां. वा. काणे  सुवर्ण पदक) यांना राज्यपालांच्या हस्ते संस्थेची फेलोशिप व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. संगीतकार झुबीन मेहताप्रो उपिंदर सिंग व प्रो सुभाष चंद्र मलिक उपस्थित राहू शकले नाहीत.    

            एशियाटिक  सोसायटीचे अध्यक्ष श्रीमती विस्पी बालापोरिया यांनी प्रास्ताविक केले तर मानद सचिव मंगला सरदेशपांडे यांनी आभार मानले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सब्यसाची मुखर्जीसोसायटीच्या उपाध्यक्ष श्रीमती  शहरनाज नलवालाडॉ फरोख  उदवाडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

 

0000

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा- अजित

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी

एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा-  पवार

 

पुणे, दि.26:  प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी 50 वर्षाचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन इमारतीचे आराखडे तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याच्यावेळी दिले.

यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, अपर कामगार आयुक्त शैलेश पोळ आदी उपस्थित होते.

विकास कामांची पाहणी  करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर काळानुरुप गरजेनुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विस्तारित इमारत आदी शासकीय इमारतीचे काम नव्याने पूर्ण करण्यात आले आहेत. नोंदणी भवन, शिक्षण भवन, कृषी भवन, सहकार भवन, कामगार भवन आदी इमारतींचे काम सुरु आहेत तर काही इमारतींच्या कामांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यताही देण्यात आल्या आहेत.

आगामी काळातही विविध शासकीय इमारती नव्याने बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहेत. प्रशासकीय इमारतीचे आराखडे तयार करताना संबंधित विभाग प्रमुखाला विश्वासात घेऊनच आराखडे तयार करावेत. आराखड्यात प्रामुख्याने वीज, वाहनतळ, अग्निशमन यंत्रणा या बाबतीत सुरक्षितेच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करा. यासाठी नामांकित, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करावी.

इमारती पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीवरचा खर्च कमीत कमी झाला पाहिजे. वाहनतळाचे नियोजन करताना कार्यालयातील मनुष्यबळाबरोबर नागरिकांच्या वाहनाचांही विचार करावा. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे वारंवार मार्गदर्शन घ्यावे. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे.

सारथी येथील बैठक सभागृहात ध्वनी प्रणाली व प्रकाश व्यवस्था अत्याधुनिक बसवावी. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन काम करावे. नूतन कार्यालयाच्या इमारतीचे दरवाजे, खिडक्या मजबूत आणि पुरेशा उंच बनवाव्या. सहकार आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचा आराखडा पारंपरिक न राहता त्यामध्ये नाविन्यता असली पाहिजे. वाहनतळ जागेचा विचार करता ते दुमजली करा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

प्रस्तावित कामगार भवन परिसरातील येथील नागरिकांसोबत चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, कामगार भवन बांधकामाच्यावेळी विरोध करु नये. या कामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील श्री. पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भांबुर्डा येथील सारथी मुख्यालय, 'शिक्षण भवन' वास्तू बांधकाम, शिवाजी नगर येथील प्रस्तावित 'कृषी भवन' इमारत, साखर संकुल येथील सहकार आयुक्त कार्यालय आणि वाकडेवाडी येथील 'कामगार भवन' इमारतीच्या जागेची पाहणी केली.

 

राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण

 राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण

- मंत्री अतुल सावे

            मुंबईदि. 24 :  राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावेयासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण आखले जात आहे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज येथे दिली.

            नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) च्यावतीने बांद्रा-कुर्ला संकुल मध्ये देशातील सर्वात मोठे ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्सो’ चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मंत्री श्री.सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नारडेकोचे अध्यक्ष संदीप रुणवालसचिव अभय चांडकमाजी अध्यक्ष निरंजन हिरानंदानीराजन बंदलकनअभिनेता रितेश देशमुखजेनेलिया देशमुखसचिन खेडेकर आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री.सावे म्हणाले कीअन्नपाणीनिवारा ही सर्वांची गरज असून ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मुंबई महानगर परिसरात जागेची मर्यादा असल्याने आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन सारख्या योजना राबवत आहोत. या शिवाय मुंबईतमुंबई मेट्रोएमटीएचएलमुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसी लिंक प्रकल्पकोस्टल रोडधारावी पुनर्विकास प्रकल्प इत्यादीसारखे मोठे इन्फ्रा प्रकल्प सुरू आहेत. मुंबईला सर्वात विकसित शहर बनवत आहोत.

             मुंबई आणि राज्यात अधिकाधिक घरे निर्माण करण्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न नव्या गृहनिर्माण धोरणात सोडवले जातीलअसे मंत्री श्री. सावे यांनी नमूद केले. नवीन धोरणासाठी विकासकांनी सूचना कराव्यातत्यांचा नव्या धोरणात समावेश केला जाईल.

             "म्हाडाच्या 4 हजार घरांसाठी दोन लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. हे घरांची मागणी दर्शवते. भविष्यातआम्ही गृहनिर्माण क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणुकीची अपेक्षा करतो." म्हाडाच्या माध्यमातून बीडीडी चाळ पुनर्विकासगिरणी कामगारांसाठी घरेम्हाडाच्या इमारतीचा पुनर्विकासआणि उपकर आणि उपकर नसलेल्या इमारती इत्यादी प्रमुख प्रकल्प घेतले आहेत.

            शहरात जवळपास 13 हजार उपकर प्राप्त इमारती आहेत. त्यांचा पुनर्विकास करण्याची गरज आहे.  येत्या काही दिवसांत जवळपास 75हजार गिरणी कामगारांना घरे द्यावयाची आहेतअसे मंत्री श्री. सावे यांनी स्पष्ट केले. विविध विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ही संघटना सरकारला सहकार्य करत आहेत.

0000

रायगड मधील यात्रा च तपशील

 


Featured post

Lakshvedhi