Saturday, 25 November 2023

रमाकांत पांडा यांचे छायाचित्रणाबरोबरचवन संवर्धनाचे कार्य महत्वपूर्ण

 . रमाकांत पांडा यांचे छायाचित्रणाबरोबरचवन संवर्धनाचे कार्य महत्वपूर्ण

                                                                                -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 25 : निसर्ग विविधतेने नटलेला आहे. या निसर्गातील वन्य प्राण्यांचे डॉ. रमाकांत पांडा यांनी केलेले छायाचित्रण कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. या बरोबरच त्यांनी सुरू केलेले वन संवर्धानाचे कार्य महत्वपूर्ण आहेअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            प्रसिध्द हृदय विकार शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांनी भारतातील पेंचजिम कॉर्बेटसातपुडाताडोबाबांधवगड या व्याघ्र प्रकल्पांसह केनियादक्षिण आफ्रिकाटांझानियाचा प्रवास करून सिंहवाघहत्तीबिबट्यासह वन्य प्राण्यांच्या काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर कला दालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळडॉ . रमाकांत पांडाएशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीनाथ के. ए. आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीडॉ. पांडा हे देशातील प्रथितयश हृदय शस्त्रक्रिया तज्ञ आहेत. त्यांनी निसर्गवन्य प्राणीपशु पक्षी यांचे केलेले छायाचित्रण सुंदर आहे. त्यांनी निसर्गाचे छायाचित्रण करण्याबरोबर संवर्धनाचे काम केले आहे. ते अनुकरणीय आहे. यावेळी  डॉ. पांडा यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi