सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 26 September 2023
सगळ्यांची मतं ऐका, पण इतरांच्या मतांनी तुटू नका.* 🌹
*सगळ्यांची मतं ऐका, पण इतरांच्या मतांनी तुटू नका.* 🌹
एक चित्रकार होता. गुरूचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता. गुरू व स्वत:च्या कलेवर त्याला प्रचंड विश्वास होता. पण स्वत:वर त्याचा विश्वास फारसा नसावा. तीन दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले. पण ‘आपले चित्र चांगले आहे का?’ हा प्रश्न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला.
एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते चित्र लावले. त्याखाली एक पाटी लावली, मी हे काढलेले चित्र तुम्हाला कसे वाटले? यात कुठेही चूक वाटली तर त्याजागी एक छोटीशी फुल्ली मारा.’ लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो पोहोचला. संपूर्ण चित्र फुल्ल्यांनी भरलेले पाहून त्याचे डोळे भरले. काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिले होते.
चित्रकाराचा जीव तुटला. तो धावत आपल्या गुरूकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हरलो. मी खूप वाईट चित्रकार आहे. मी चित्रकला सोडायला हवी. मी संपलो.’ हे ऐकून गुरूने म्हटले, ‘तू व्यर्थ नाहीस. तू फार चांगला चित्रकार आहेस. मी ते सिद्ध करू शकतो. असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये. तसेच चित्र परत काढून चित्रकार दोन दिवसांनी गुरूकडे आला.
गुरू त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन आला. ते चित्र परत रस्त्यावर ठेवले आणि खाली एक पाटी लिहिली, ‘मी हे चित्र काढले आहे. काही चुका आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा.’ ही पाटी लावून ते दोघे निघाले.
संध्याकाळी परत जाऊन त्यांनी पाहिले तर कुणीही त्या चित्राला हातदेखील लावला नव्हता. सहा-आठ दिवस ते चित्र तसेच राहिले. यावर गुरू म्हणाले, ‘फुल्ल्या मारणे सोपे असते, पण दुरुस्ती करणे कठीण असते.’
दुनियेच्या कोर्टात स्वत:ला उभे करू नका.
सगळ्यांची मतं ऐका, पण इतरांच्या मतांनी तुटू नका. मी कोण आणि कसा हे पहिल्यांदा स्वत:ला विचारा.🙏🌹
आपले सरकार २.०” – कार्यपद्धती अद्ययावत
आपले सरकार २.०” – कार्यपद्धती अद्ययावत
नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा “आपले सरकार २.०" हा शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. तसेच पी. जी. पोर्टल हे केंद्र शासनाकडून हाताळण्यात येणारी कार्यप्रणाली आहे. राज्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे ऑनलाईन पद्धतीने एकाच ठिकाणी निवारण करुन घेता यावे, हा या एकत्रीकरणाचा हेतू आहे. राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करता यावी तसेच प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने अशा तक्रारींचे निवारण करावे यासाठी "आपले सरकार"ही तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागांबरोबरच राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ही तक्रार निवारण प्रणाली www.aaplesarkar.
या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या प्रणालीचे प्रशासकीय व तांत्रिक दृष्टीकोनातून अद्ययावतीकरण करणे आवश्यक होते. त्यासाठी ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, प्रशासनाकडून तक्रारींचे ऑनलाईन निवारण आणि वरिष्ठ कार्यालयांकडून या प्रक्रियेचे संनियंत्रण इ.संदर्भात शासनाने या प्रणालीच्या अंमलबजावणीसंबंधीची विहित कार्यपद्धती निश्चित केली आहे. संबंधित शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.
शासनाने आता "आपले सरकार २.०" या संगणकीकृत तक्रार निवारण प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे नवीन वैशिष्टे विहित केली आहेत. काय आहेत ही वैशिष्टे हे जाणून घेवूया या लेखातून...
नागरिक नोंदणी सुविधा :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) - नागरिक फक्त मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी वापरुन लॉग-इन करु शकतात.
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - वैयक्तिक तपशील व सोशल मीडिया लॉग-इन कॅप्चर करणे जसे की, फेसबुक.
क्षेत्रीय कार्यालयाची व्यापकता :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) - जिल्हा टप्प्यात फक्त चार प्रशासनाचा समावेश होता. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस कार्यालय, महानगरपालिका.
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) – सद्य:स्थितीतील चार प्रशासकीय कार्यालय सोडून इतर सर्व जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील क्षेत्रीय कार्यालये.
अर्जदाराकडून स्मरणपत्र :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) - स्मरणपत्राची सुविधा नाही.
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - 21 दिवसात तक्रारीचे निराकरण न झाल्यास नागरिक संबंधित कार्यालयात ऑनलाईन स्मरणपत्र दाखल करू शकतात.
अधिकाऱ्याला 7 व्या व 14 व्या दिवशी (Alert System) :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) - सुविधा नाही.
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - तक्रार निवारण अधिकाऱ्याला तक्रार 21 दिवसांच्या आत निराकरण करण्यासाठी तक्रार आल्यापासून 7 व्या व 14 व्या दिवशी System Auto Generated पूर्वस्मरण दिले जाईल.
तक्रारीसाठी मजकूर आकार व सहपत्र :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) - तक्रार दाखल करण्यासाठी 2000 पर्यंत शब्दांची मर्यादा तसेच 2 एम.बी. पर्यंत सहपत्र अपलोड करण्याची सुविधा.
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - तक्रार दाखल करण्यासाठी 3000 पर्यंत शब्दांची मर्यादा तसेच 4 एम. बी. पर्यंत सहपत्र अपलोड करण्याची सुविधा.
एस्केलेट वैशिष्टे :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) - सुविधा नाही.
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - तक्रार निराकरण झाल्यानंतर अर्जदार समाधानी नसल्यास तक्रारदार वरिष्ठ स्तरावर पुन्हा तक्रार नोंदवू शकतात.
पदानुक्रम :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) - मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच जिल्हास्तरावरील कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस कार्यालय, महानगरपालिका.
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - मंत्रालयीन प्रशासकीय विभाग ते तालुकापर्यंत सर्व कार्यालये, सर्व प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख आपल्या अधिनस्त कार्यालयातील प्रकरण व अहवालांचे परीक्षण व आढावा घेऊ शकतात.
तंत्रज्ञान :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती)- Drupal 7.x जे ठराविक पातळीपर्यंत स्केलेबल आहे.
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - Cake PHP जे उच्च समवर्ती लॉग-इनला समर्थन देते.
लवचिकता :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) - नवीन युजर तयार करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याला कमी लवचिकता होती.
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - नवीन युजर तयार करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याला जास्त लवचिकता आहे.
पी.जी.पोर्टल(सी.पी.ग्राम) एकत्रिकरण :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) .
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - पी.जी.पोर्टलवरील तक्रार निवारण अधिकाऱ्याला आता एकाच लॉग-इनमध्ये पी.जी.पोर्टल व आपले सरकारवरील तक्रारी प्राप्त होतील.
एन.आर.आय. (अनिवासी भारतीय) नोंदणी सुविधा :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) - सुविधा नाही.
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - कोणतेही अनिवासी भारतीय (एन.आर.आय.) तक्रार नोंदवू शकतात.
सूचना:-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) - सुविधा नाही.
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - नागरिक शासकीय योजनांसंबंधी किंवा कोणत्याही प्रशासकीय विभागांच्या धोरणासाठी सूचना दाखल करू शकतात.
मुख्यमंत्री हेल्पलाईन-एजंट लॉग-इन सुविधा :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती) - सुविधा नाही.
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - १८००१२०८०४० मुख्यमंत्री हेल्पलाईन वर आता तक्रार नोंदविता येईल.
फीडबॅक कॉल सुविधा :-
•आपले सरकार 1.0 (सद्य:स्थितीतील कार्यपद्धती).
•आपले सरकार 2.0 (सद्य:स्थितीतील नवीन प्रणालीनुसार कार्यपद्धती) - प्रशासकीय सुधारणा व रचना कार्यपद्धती या उपविभागाकडून तक्रार निवारण झाल्यानंतर तक्रारदाराला अकस्मातपणे तक्रार निवारण करण्याबद्दल विचारणा करण्यात येईल व त्याबाबतचा मासिक अहवाल वेळोवेळी प्रशासकीय विभागांच्या निदर्शनास आणण्यात येईल.
•प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी मुख्य सचिव यांच्या स्तरावरुन तक्रारींचा आढावा घेण्यात येईल.
• १८ सप्टेंबर, २०२३ पासून आपले सरकार २.० अंमलात आल्यानंतर प्रलंबित तक्रारींचे जुन्या पोर्टलवरुनच निराकरण होईल, याची दक्षता संबंधित विभागांनी घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
•आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी कोणती तक्रार ग्राह्य धरण्यात यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाकडून (पीएमओ कार्यालय) प्राप्त झालेल्या कार्यनियमावली नुसार पुढीलप्रमाणे दिलेल्या आहेत.
आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारींवर मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धती -
"अ" आणि "ब" चे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.
अ) कार्यवाही न करावयाच्या बाबी:-
•न्यायालयाशी संबंधित असलेले/प्रलंबित असलेले कोणतेही प्रकरण,
•माहिती अधिकाराशी संबंधित तक्रार,
•खाजगी / कौटुंबिक तक्रार,
•सूचना/सल्ला असल्यास,
•देशाच्या सार्वभौमत्व व एकात्मकतेला तडा पोहोचेल अशी तक्रार,
•निनावी टपाल,
•स्वाक्षरी नसलेले टपाल,
•अर्जदाराकडून प्राप्त होणाऱ्या त्रोटक तक्रारी,
•असभ्य भाषेतील अर्थहीन व त्रोटक भाषेतील पत्र,
•विविध कमिशन, बॉडीजसाठी नामांकनासाठी विनंत्या, पुरस्कारांसाठी नियमित विनंती, नोकऱ्यांसाठी नियमित विनंत्या, आर्थिक सहाय्यासाठी विनंत्या,
•मोफत पास/सवलत तिकिटांसाठी विनंती
•भारताच्या आंतरराष्ट्रीय बाबींवर प्रकाश टाकणारी परदेशी लोकांची पत्रे,
•कुठल्याही धर्मविषयक बाबी
खाली नमूद केलेल्या वस्तूंच्या स्वरूपात अनुकूलता मागणारी पत्रे आणि यासारख्या वस्तू:-
i) शाळा / महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नियमित विनंत्या
ii) एजन्सी/डीलरशिपसाठी नियमित विनंत्या
iii) दुकान / किऑस्क / तेहबाजारीसाठी नियमित विनंत्या
iv) जमीन / घर / फ्लॅट इ. वाटपासाठी नियमित विनंत्या
ब) कार्यवाही करावयाच्या तक्रारी :-
वर नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही न करावयाच्या तक्रारींशिवाय सर्व तक्रारी.
अशा प्रकारे ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, प्रशासनाकडून तक्रारींचे ऑनलाईन निवारण आणि वरिष्ठ कार्यालयांकडून या प्रक्रियेचे संनियंत्रण इ. संदर्भात शासनाने या प्रणालीच्या अंमलबजावणीसंबंधीची विहित कार्यपद्धती निश्चित केली आहे. या कार्यपद्धतीचा अवलंब केल्याने तक्रार दाखल करणे व त्या तक्रारीचे विहीत कालावधीत निवारण करणे सहज सुलभ होणार आहे.
राजू धोत्रे
सहायक संचालक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
दिलखुलास’, 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमांतपर्यटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांची मुलाखत
दिलखुलास’, 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमांतपर्यटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांची मुलाखत
मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटन वाढावे यासाठी दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन’ जगभरात साजरा केला जातो. त्याअनुषंगाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आपली संस्कृती, सण, उत्सव, भाषा, परंपरा जगभरात पोहोचावी यादृष्टीने परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यटनस्थळी कोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहे, याबाबत व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जोशी यांनी ‘दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 26, बुधवार दि. 27 आणि गुरुवार दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार, दि. 27 सप्टेंबर, 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
००००
Monday, 25 September 2023
आशियाई स्पर्धेत नेमबाजीत सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशियाई स्पर्धेत
नेमबाजीत सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन
ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी
मुंबई, दि. 25 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांशसिंह पनवर, ऐश्वर्यसिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे विशेष कौतुक केले आहे.
चीनमध्ये फुयांग (हांगजोऊ) येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या संघाने १० मीटर एअर रायफल्स प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. यात रुद्रांक्ष, ऐश्वर्य आणि दिव्यांश यांनी सुरुवातीपासूनच कामगिरीत सातत्य ठेवून गुणांची कमाई करत, संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. रुद्रांक्ष पाटील हा ठाण्याचा खेळाडू आहे. त्याच्या नेमबाजीतील नैपुण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाठबळ दिले आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या तिघांचेही विशेष कौतुक करीत म्हटले आहे की, भारताने नेहमीच आशियाई क्रीडा स्पर्धेवर वर्चस्व राखले आहे. यंदाच्या या स्पर्धेत सुरुवातच या तिघांनी नेमबाजीत सुवर्ण पदकाचा वेध घेऊन केली आहे. यासाठी या खेळाडूंचे, त्यांच्या प्रशिक्षक-मार्गदर्शकांचे आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुबीयांचे देखील कौतुक करावे लागेल. अशा जिद्दी आणि मेहनती खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावरच भारताची यंदाच्या या स्पर्धेतील कामागिरी अशीच दिमाखदार राहील आणि आपला भारत या स्पर्धेत पदक तालिकेत अव्वल राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या यशस्वितेसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडूंच्या पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत
.
0000
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन
मुंबई, दि 25 : पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, उपसचिव रोशनी कदम-पाटील, अवर सचिव रविंद्र पेटकर, विभागाचे कक्ष अधिकारी अर्जुन गिराम यांनीही पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन के
ले.
घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का* ?"
*घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का* ?"
हे आवश्य वाचा ****
कोणत्याही देवाच्या आरती नंतर एका सुरात व धावत्या चालीत
*ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे*.
सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.
*आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया*
व त्याचा अर्थ समजावून घेऊ.
ही
*प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे*.
*वैशिष्ट्ये* :
(१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे
*रचयिता वेगवेगळे* आहेत.
(२) ही चारही कडवी
*वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली* आहेत.
(३) पहिले कडवे
*मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत*
भाषेत आहेत.
(४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे.
पण ही
*सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली* जाते.
(५) यातील एकही कडवे *गणपतीला उद्देशून* नाही.
(६) वेगवेगळ्या कवींची व *वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून*
ही प्रार्थना बनवली गेली आहे.
आता आपण प्रत्येक कडवे *अर्थासह* पाहूया
१) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |
भावे ओवाळीन म्हणे नामा |
*वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे*
अर्थ...
विठ्ठलाला उद्देशुन
*संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन*.
माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर
*तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन*.
२) त्वमेव माता च पिता त्वमेव |
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |
त्वमेव सर्व मम देव देव |
*हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे*. *ते संस्कृत मध्ये आहे*.
हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.
अर्थ..
*तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस*.
(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |
बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात | करोमि यद्येत सकल परस्मै |
नारायणापि समर्पयामि ||
*हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे*.
ते व्यासांनी लिहिलेले आहे.
अर्थ…
*श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित*
करीत आहे.
(४) अच्युतम केशवम रामनारायणं |
कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |
श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |
जानकी नायक रामचंद्र भजे ||
*वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे*.
म्हणजेच आठव्या शतकातील आहे.
अर्थ…
मी *भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला*.
हरे राम हरे राम |
राम राम हरे हरे |
हरे कृष्ण हरे कृष्ण |
कृष्ण कृष्ण हरे हरे |
*हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरणं' या उपनिषदातील आहे*.
*कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे*.
*अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे*.
तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे.
रचना कोणाची असो
*हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो*.
अर्थ समजून म्हटले तर आरती मध्ये भाव येतात...
🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया.
