Friday, 14 April 2023

व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प राबविणार

 व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प राबविणार


                                                                                                -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


हत्ती संवादकाची मदत घेणार


            मुंबई, दि. 14 : राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धन करण्यात येणार आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी राज्यातील वन्य हत्ती नियंत्रणासाठी हत्ती संवादकाची मदत घेण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला.


            कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात वन्यजीवांच्या वाढत्या उपद्रवासंदर्भात चर्चा करण्यासाठी काल सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर , वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, वनबलप्रमुख वाय. एल.पी.राव, प्रधान मुख्यवनसंरक्षक महिप गुप्ता, गुरुप्रसाद आदी अधिकारी उपस्थित होते.


            या बैठकीत वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान यावर सविस्तर चर्चा करताना श्री. मुनगंटीवार म्हणाले की, या समस्येवर केवळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हा उपाय नाही. वन्य प्राण्यांना विशेषतः हत्तींना गावापर्यंत, शेतांपर्यंत येण्यापासून रोखण्यासाठी काय योजना करता येतील याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी हत्ती संवादकाची मदत घेता येईल, असेही त्यांनी सूचविले. यावेळी देशातील नऊ राज्यात वन्य हत्तींशी संवाद साधून त्यांना नियंत्रित करणारे प्राणी संवादक आनंद शिंदे यांच्या कामांविषयी सादरीकरणही करण्यात आले.


            हत्तींना गावापर्यंत येण्यास रोखण्यासाठी ‘एलिफंट प्रूफ फेन्स’ अर्थात एपीएफकरिता मनरेगा योजनेतून निधी मिळावा या दृष्टीने केंद्राकडे पाठपुरावा करण्यात यावा.पर्यावरण व वन्यजीव संवर्धनासाठी देशातील उद्योग जगताकडून मिळणाऱ्या सामाजिक उत्तर दायित्व (सीएसआर) निधीपैकी शून्य पूर्णांक पाच टक्के निधी देणे बंधनकारक करावे अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात येईल, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.


            जंगलातील झाडे कटाईबाबत परवानगी देताना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि ऑफलाइन परवानगी बंद करण्याचे निर्देश वनमंत्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. कोल्हापूर जिल्ह्यात गवा या प्राण्यांचा उपद्रव गंभीर असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त करुन लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांशी संवाद वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

🌹हे करून पहा✍🌹 आरोग्य संदेश

 🌹हे करून पहा✍🌹


१)उन्हाळी लागल्यास गोखरू काढा तीन वेळा रोज

२)दुर्वांचा रस एक चमचा तीन वेळा अंगाचा दाह,पोटातील उष्णता कमी होते.

३)लहान मुलांना उन्हाळी लागल्यास साळीच्या लाह्या कपभर पाण्यात.

४)तोंड आल्यास ताकाच्या गुळण्या करून ते पिणे

५)पेरुची कवळी पाच पान खाल्यास तोंड ,तोंडातील फोड जातात,पोटातील जळजळ बंद होते.

६)जाईच्या पानांचा रस एक चमचा मधात तोंडाला लावा तोंड येणं बंद होतं.

७)अंगात चमक,छातीत दुखणे,छाती जड होणे ,भरणे, छोट्या पाकळ्या चार लसूण रोज चावून खा.

८)उच्च रक्तदाब लसूण चावून खा रोज चार पाकळ्या लहान. नियंत्रणात येईल

, ब्लाँकेज जातील.

९)लिबाचा रस खोबरेल तेलाचा घालून अंगावर लावल्यास खाज कमी येते.डोक्यावर लावल्यास केस गळण बंद होतं.कोंडा, रुसी जाते.

१०)हातापायाची सुज येत असल्यास आघाड्याची झाडे मुळासकट जाळून राख गोमुत्रात एकत्र करुन रोज दोन वेळा एक चमचा घ्या सूज जाईल.

११)अंगावर पित्त उठल्यावर झेंडूची पाने,फुल यांचा रस अंगाला लावा.

१२)पित्ताचा गाठी आल्यास कांद्याचा रस शरीरावर लावा.

१३)अंगाला मुंग्या, झोकांड्या जाणे,अंग जड होत असल्यास.विड्याच्या पानांचा रस दोन चमचे,गाईच तूप एक चमचा,व किंचीत हिंग घालून घ्यावा.

१४)ब्लिडींग खूप होत असल्यास एक पिकलेल्या केळ्यात आवळ्याचा रस घालून कुस्करून मध व अर्धा चमचा साखरेत खा हेवी फ्लो कमी होतो.

१५)कडुलिंबाचा पाला आंघोळीच्या पाण्यात टाकून पाने खालल्यास अँलर्जी सह त्वचा रोग दुर पळतात.

१६)कानात मधाचे दोन थेंब व गोमूत्र दोन थेंब टाकल्यास कानात होणारे फोड व पू येणं बंद होतं

१७)कंबरदुखी असल्यास,जाँईन पेन,अंगदुखी, स्नायू दुखी असल्यास शेवग्याच्या पानांची भाजी एक दाणा चुना घालून खा.

१८)शेवग्याची साल ठेचून गरम करून दुखर्या भागावर लेप दिल्यास आराम पडतो.

१९)गजकर्ण, इसब,नायट,खरुज झाल्यास पारिजातकांचा पानांचा रस काढून त्यात कच्चा शेंगदाणा उगाळून लावा फरक पडतो.

२०)चंदन पावडर ओरिजिनल अथवा चंदन उगाळून, धने,वाळा,गुलाब पाण्यात वाटून लावल्यास घामोळे व उन्हाळ्यातील त्वचा रोग आटोक्यात येतात.

२१)जखम भरण्यासाठी हळदीत कडूनिंबाच्या पानांचा रस घाला जखम अथवा घाव भरतो.

२२)जखमेवर काताची पावडर टाकल्यास जखम बरी होते.

२३)जिर्याची पावडर,वावडींग पावडर,दुप्पट गुळा तून दिल्यास जंत पडतात.

२४)वावडींगाची पावडर फडक्यात बांधून ती किडलेल्या दाताखाली धरल्यास किड पडते,फडक्यास किड चिकटलेली दिसते.लाळ मात्र गिळू नये.

२५)झोप येत नसल्यास एक वाटी गरमपाण्यात मध व मेथीचे दाणे भीजवून पाणी प्या दाणे खा .झोप छान येईल.

  हे करून पहा निश्चित फरक पडेल च.

गजानन



आली शासकीय योजनांची जत्रा’एकाच ठिकाणी मिळणार विविध योजनांचे लाभ

 आली शासकीय योजनांची जत्राएकाच ठिकाणी मिळणार विविध योजनांचे लाभ

२७ लाख नागरिकांना लाभ देणारा हा अभिनव उपक्रम यशस्वी करा

                                             - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

            मुंबई, दि. १४: आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५  हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा उद्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. १५ जून पर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर २७ लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

             "जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची असे हे  अभियान असून त्याचे समन्वयन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे.

कमीत कमी कालावधीत विविध योजनांचा लाभ

             जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात येतात. मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणेयोजनांची माहिती घेणेआवश्यक दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणेकागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते. दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते. कित्येक वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्ण होत नाही. यावर पर्याय म्हणून चाळीसगावजामनेरमुरबाडकल्याण इत्यादी ठिकाणी "जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाचीनावाचा अभिनव व पथदर्शी उपक्रम  राबविण्यात आला आहे. या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यात आला आहे.

एकाच छताखाली विविध विभाग

             या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. या उपक्रमाची पूर्वतयारी १५ एप्रिल २०२३ ते १५ मे२०२३ या कालावधीत  करण्यात येईल. या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणेप्रस्तावित लाभार्थ्यींची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येतील.

            प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान ७५ हजार लाभार्थ्यींना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असेल. लाभार्थ्यींना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर / तालुकास्तरावर दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

मंत्रालय ते विविध यंत्रणांसाठी एसओपी

            केंद्र व राज्यशासनाच्या योजनांचा आढावा घेऊन या उपक्रमांतर्गत राबवावयाच्या योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरविण्यात येईल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना  स्वयंस्पष्ट सूचना दिल्या जातील. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घेतले जाईल. महानगरपालिकांकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांबाबत संबंधित विभागीय आयुक्त व महानगरपालिका आयुक्त वेळोवेळी मार्गदर्शन करतील. या अभियानाच्या आयोजनासाठी निधी उपलब्धतेबाबतही शासन निर्णयात तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयस्तर ते तालुकास्तर व विविध यंत्रणांसाठी कार्यपद्धतीही एसओपी’ निर्धारित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने विविध स्तरावरील जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले आहे.योजनेची माहिती पोहचवूनअर्ज भरून घेणे ते लाभार्थ्यींची निवड आणि प्रत्यक्ष लाभ देणे इथपर्यंत कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे.

            या अभियानाचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षांना मुख्यमंत्री सचिवालयातील जनकल्याण कक्षास सादर करावा लागणार आहे.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ व १६ एप्रिल रोजी खारघरमधील वाहतुकीत बदल

 महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ व १६ एप्रिल रोजी खारघरमधील वाहतुकीत बदल

ठाणेदि. १४: नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. १५ एप्रिल २०२३ रोजी १४.०० वाजेपासून ते दि. १६ एप्रिल २०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत  खारघरमधील ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमणी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतचा रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना घेवून येणारे वाहन - बस यासाठी हा रस्ता खुला राहणार असून इतर वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.

अ) प्रवेश बंद:-

दिनांक १५/०४/२०२३ रोजी १४.०० वाजे पासून ते दिनांक १६/०४/२०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमानी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतच्या रस्त्यावर नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.

 ब) पर्यायी मार्ग:-

२) ग्रामविकास भवन ने ग्रीन हेरीटेज चौक ते मुर्ती चौकविनायक सेठ चौक मार्गे पापडीचा पाडातळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील. २) आरएएफ तळोजा कडून पापडीचा पाडा मार्गेविनायक सेठ चौकमुर्वी गांव चौक मार्गे इन्च्छीत स्थळी जातील.

(३) ओवेगावातील रहिवाशी ओवेगाव चौक ते पापडीचा पाडा मार्गे तळोजा किंवा खारघर येथून इच्छित स्थळी जातील.

ही अधिसूचना कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना येवुन येणारी वाहने / बस या करिता खुला राहील अशा वाहनांना लागू असणार नाही. तसेच अग्निशमन दलपोलीसरूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाहीअसे श्री काकडे यांनी कळविले आहे.

000

चेहर्याचि त्वचा ओघळल्यास, ढिलि पडल्यास.. घरगुति उपायः*

 *चेहर्याचि त्वचा ओघळल्यास, ढिलि पडल्यास.. घरगुति  उपायः*



१)  काँफिः    दोन वा तीन चमचा खोबरेल तेल घेउन त्यात  एक कप  ब्राउन शुगर, एक चमचा दालचिनि पावडर ,  व एक कप काँफि पावडर टाकून सर्व एकत्र करून चेहर्याला  लावून खालून वरच्या दिशेला पंधरा मिनिटे चोळावे. मग कोमट पाण्याने धुऊन टाका.

२)  टोमँटोः    टोमँटोत  अस्ट्रिंजंट मुबलक असतं तेव्हा याचा रस काढून तो चेहर्याला नेहमिच लावत राहा.

३)  अंडेः।   अंड्याचा पांढरा भाग त्वचेला कसाव आणतो. तेव्हा अंड्याच्या पांढर्या भागात मध मिसळून ते अर्धा तास लावून ठेवावे. वनंतर धुवा आठवड्यातून

 एकदा करा.

३)  काकडिः।  काकडि किसून लगदा करा व तो चेहर्याला लावून ठेवा.

४) तुरटिः  हे खुपच इफेक्टिव्ह अस्ट्रिंजंट आहे आंघोळिनंतर याला चेहर्यावर दोन मिनिटे चोळावे त्वचेत कसाव येतो.

५)  केळः  केळाने त्वचा घट्ट होते

 स्मँश करून व थोडे मध टाकून  लावावे नंतर धुवा.

६)   फिश आँईलः  याच्या कँपँसूल फोडून त्याने मालिश करा चेहर्यावर .

७)  बदाम आँईलः याने चेहर्याचि मालिश करा नेमाने

८) कोरफड जेलः याने त्वचा घट्ट होते. नेमाने याचा जेल लावावा.

९) मुलतानि मातिः याने कसाव येतो. तैव्हा हि लावून नंतर धुवावे.

१०)  स्ट्राँबेरि, मध व दही एकत्र करून लेप लावा नंतर धुवावा.

.. वरिल सर्वच उपाय  चांगले आहे


 सुनिता सहस्त्रबुद्धे


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



हसू आलं का

 संशयाची हद्द झाली


राव.....


.


.


.


नवऱ्याची बायपास सर्जरी झाल्यानंतर बायकोने सर्जनला एकच प्रश्न केला... .


.


.


.


यांच्या ❤हृदयात कोणी दुसरी🙆 होती का हो?!!!


😜😜😜


डॉक्टरसुद्धा अतरंगी पोहोचलेला (पुण्याचा).....


म्हणाला.... "तिलाच तर बायपास केली आहे आता !!"


😝😛

भारतीय प्रेस परिषदेची शोध समिती

 भारतीय प्रेस परिषदेची शोध समिती

१७१८ एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर

 

            मुंबईदि. १३ : भारतीय प्रेस परिषदेच्या शोध समितीची बैठक १७ व १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून सह्याद्री अथितीगृह, मुंबई येथे होणार आहे. न्यायमूर्ती श्रीमती रंजना प्रकाश देसाई अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत पत्रकारितेशी निगडित विविध ३६ प्रकरणांवर सुनावणी होईल. ही सुनावणी माध्यमे आणि सर्व सामान्य नागरिकांसाठी खुली राहीलअसे भारतीय प्रेस परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.


Featured post

Lakshvedhi