Friday, 14 April 2023

🌹हे करून पहा✍🌹 आरोग्य संदेश

 🌹हे करून पहा✍🌹


१)उन्हाळी लागल्यास गोखरू काढा तीन वेळा रोज

२)दुर्वांचा रस एक चमचा तीन वेळा अंगाचा दाह,पोटातील उष्णता कमी होते.

३)लहान मुलांना उन्हाळी लागल्यास साळीच्या लाह्या कपभर पाण्यात.

४)तोंड आल्यास ताकाच्या गुळण्या करून ते पिणे

५)पेरुची कवळी पाच पान खाल्यास तोंड ,तोंडातील फोड जातात,पोटातील जळजळ बंद होते.

६)जाईच्या पानांचा रस एक चमचा मधात तोंडाला लावा तोंड येणं बंद होतं.

७)अंगात चमक,छातीत दुखणे,छाती जड होणे ,भरणे, छोट्या पाकळ्या चार लसूण रोज चावून खा.

८)उच्च रक्तदाब लसूण चावून खा रोज चार पाकळ्या लहान. नियंत्रणात येईल

, ब्लाँकेज जातील.

९)लिबाचा रस खोबरेल तेलाचा घालून अंगावर लावल्यास खाज कमी येते.डोक्यावर लावल्यास केस गळण बंद होतं.कोंडा, रुसी जाते.

१०)हातापायाची सुज येत असल्यास आघाड्याची झाडे मुळासकट जाळून राख गोमुत्रात एकत्र करुन रोज दोन वेळा एक चमचा घ्या सूज जाईल.

११)अंगावर पित्त उठल्यावर झेंडूची पाने,फुल यांचा रस अंगाला लावा.

१२)पित्ताचा गाठी आल्यास कांद्याचा रस शरीरावर लावा.

१३)अंगाला मुंग्या, झोकांड्या जाणे,अंग जड होत असल्यास.विड्याच्या पानांचा रस दोन चमचे,गाईच तूप एक चमचा,व किंचीत हिंग घालून घ्यावा.

१४)ब्लिडींग खूप होत असल्यास एक पिकलेल्या केळ्यात आवळ्याचा रस घालून कुस्करून मध व अर्धा चमचा साखरेत खा हेवी फ्लो कमी होतो.

१५)कडुलिंबाचा पाला आंघोळीच्या पाण्यात टाकून पाने खालल्यास अँलर्जी सह त्वचा रोग दुर पळतात.

१६)कानात मधाचे दोन थेंब व गोमूत्र दोन थेंब टाकल्यास कानात होणारे फोड व पू येणं बंद होतं

१७)कंबरदुखी असल्यास,जाँईन पेन,अंगदुखी, स्नायू दुखी असल्यास शेवग्याच्या पानांची भाजी एक दाणा चुना घालून खा.

१८)शेवग्याची साल ठेचून गरम करून दुखर्या भागावर लेप दिल्यास आराम पडतो.

१९)गजकर्ण, इसब,नायट,खरुज झाल्यास पारिजातकांचा पानांचा रस काढून त्यात कच्चा शेंगदाणा उगाळून लावा फरक पडतो.

२०)चंदन पावडर ओरिजिनल अथवा चंदन उगाळून, धने,वाळा,गुलाब पाण्यात वाटून लावल्यास घामोळे व उन्हाळ्यातील त्वचा रोग आटोक्यात येतात.

२१)जखम भरण्यासाठी हळदीत कडूनिंबाच्या पानांचा रस घाला जखम अथवा घाव भरतो.

२२)जखमेवर काताची पावडर टाकल्यास जखम बरी होते.

२३)जिर्याची पावडर,वावडींग पावडर,दुप्पट गुळा तून दिल्यास जंत पडतात.

२४)वावडींगाची पावडर फडक्यात बांधून ती किडलेल्या दाताखाली धरल्यास किड पडते,फडक्यास किड चिकटलेली दिसते.लाळ मात्र गिळू नये.

२५)झोप येत नसल्यास एक वाटी गरमपाण्यात मध व मेथीचे दाणे भीजवून पाणी प्या दाणे खा .झोप छान येईल.

  हे करून पहा निश्चित फरक पडेल च.

गजानन



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi