महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ व १६ एप्रिल रोजी खारघरमधील वाहतुकीत बदल
ठाणे, दि. १४: नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. १५ एप्रिल २०२३ रोजी १४.०० वाजेपासून ते दि. १६ एप्रिल २०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत खारघरमधील ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमणी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतचा रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना घेवून येणारे वाहन - बस यासाठी हा रस्ता खुला राहणार असून इतर वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.
अ) प्रवेश बंद:-
दिनांक १५/०४/२०२३ रोजी १४.०० वाजे पासून ते दिनांक १६/०४/२०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमानी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतच्या रस्त्यावर नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.
ब) पर्यायी मार्ग:-
२) ग्रामविकास भवन ने ग्रीन हेरीटेज चौक ते मुर्ती चौक, विनायक सेठ चौक मार्गे पापडीचा पाडा, तळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील. २) आरएएफ तळोजा कडून पापडीचा पाडा मार्गे, विनायक सेठ चौक, मुर्वी गांव चौक मार्गे इन्च्छीत स्थळी जातील.
(३) ओवेगावातील रहिवाशी ओवेगाव चौक ते पापडीचा पाडा मार्गे तळोजा किंवा खारघर येथून इच्छित स्थळी जातील.
ही अधिसूचना कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना येवुन येणारी वाहने / बस या करिता खुला राहील अशा वाहनांना लागू असणार नाही. तसेच अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असे श्री काकडे यांनी कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment