Tuesday, 11 April 2023

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्तमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

 महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्तमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

            मुंबई, दि. ११ :- भारतीय समाजक्रांतीचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


            यावेळी आमदार सर्वश्री तानाजी मुटकुळे, विकास कुंभारे, किशोर जोरगेवार,सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभाचे विजय शिंदे यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.


00000


महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन


            मुंबई, दि. ११ : भारतीय समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


            यावेळी उपसचिव प्रकाश येंदरकर, अवर सचिव विठ्ठल भास्कर, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ तसेच मागासवर्ग कर्मचारी संघटनेचे (मंत्रालय) अध्यक्ष भारत वानखेडे, पदाधिकारी भास्कर बनसोडे, सुभाष गवई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करणार

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


 


            मुंबई, दि. ११ : स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम स्वातंत्र्यवीर गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहेत.


            देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. वीर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला.


            महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये वीर सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातील आदर्श महापुरूष म्हणून ते आजही आदरणीय आहेत. त्यांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती, धैर्य आणि प्रगतीशील विचारांना पुढे न्यायचे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस साजरा करणे आवश्यक आहे, असे मंत्री सामंत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


            महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा विचार करुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी २८ मे हा त्यांचा जन्मदिवस राज्य शासनाने ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार यावर्षांपासून २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली आहे.


0000



 

थकवा घालवण्यासाठी उपाय*

 *थकवा घालवण्यासाठी उपाय*

                                      शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो. ह्या साठी शरीरातील रक्त वाढवणे गरजेचे आहे


*त्यासाठी खालील उपाय योजना करावी-* 


◼️मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.


◼️दररोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यावा. सफरचंद, बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकल्यास लवकर रक्त वाढण्यास मदत होते.


◼️ नियमित बीट खावे. शक्यतो कच्या बिटाची koshambir खावी.


◼️रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ खावा.


◼️चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.


◼️दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळआची पेस्ट करुन घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.


◼️तसेत दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा. आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा.


◼️दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करुन प्या.


◼️बीट आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते.


◼️ टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.


◼️खजूर खाणे तसेच काळे मनुकेही रात्री भिजत ठेऊन सकाळी रिकाम्या पोटी खाणे.


◼️भाजी बनविण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करा.


◼️रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी प्या.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/FDRangigFj16z0fy4mLsOz


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/FDRangigFj16z0fy4mLsOz

वदनी कवळ घेता.

 *........................* 


आज हॉटेल मध्ये जेवायला बसलो असताना एक उच्चभ्रू (हाय क्लास) कुटुंब (वडील, आई, आणि ५वी ६वित असलेला मुलगा) माझ्या समोर बसले होते. 

सहजच त्यांची नजर हॉटेल मध्ये असलेल्या एका श्लोकावर गेली. 

वदनी कवळ घेता...


ते वाचून त्यांच्यात चर्चा सुरू झाली की वदनी कवळ घेता म्हणजे काय... नाम घ्या फुकाचे म्हणजे काय? What is फुका? असे प्रश्न ते एकमेकांना विचारू लागले. 

त्यांच्यासोबत असलेलं ते भाबड लेकरू आई वडिलांच्या चर्चेकडे उत्सुकतेने बघत होते. 


पण मराठीचे फारसे ज्ञान नसल्यामुळे (अर्थात इंग्लिश मिडीयम) त्या श्लोकाचा अर्थ काय त्यांना उमगला नाही... त्यांनी त्यावर भलताच अर्थ जोडण्याचा निष्फळ प्रयत्न केला आणि चर्चा थांबवली आणि काहीतरी नवीन शिकायला मिळेल ह्या आशेने त्यांच्याकडे बघत असलेल्या त्या लेकराचा मात्र भ्रमनिरास झाला...


माझं जेवण झालं, बिल देऊन मी मुद्दाम त्या कुटुंबाच्या जवळ गेलो... त्या पोराच्या पाठीवर हात ठेवत म्हणालो, "काय रे कितविला आहेस?" तो म्हणाला "6th स्टँडर्ड" 

मग मी म्हणालो "तुला माहितेय त्या श्लोकाचा अर्थ काय आहे?" हे ऐकताच त्याचे कान टवकारले. आणि तो आशेने माझ्याकडे बघू लागला... 

वाक्य जोडतच मी त्याला म्हणालो... की...


वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे...

म्हणजे जेवताना तोंडात घास घेताना श्री हरीचे म्हणजेच देवाचे नाव आपण घेतले पाहिजे...


सहज हवन होते नाम घेता फुकाचे...

म्हणजे हे फुकटचे नाव घेतल्याने तुमच्या जेवणाचे सहज हवन म्हणजेच पचन होणार आहे...


जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म...

म्हणजे आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी किंवा जीवंत राहण्यासाठी सगळ्यात गरजेची गोष्ट म्हणजे अन्न आहे... म्हणूनच अन्नाला पूर्णब्रह्म म्हणले जाते...


उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म...

जसे यज्ञ करत असताना त्यात बऱ्याच गोष्टी नुसत्या टाकल्या जातात त्याप्रमाणे उदर म्हणजे आपले पोट त्या यज्ञात टाकलेल्या गोष्टीं प्रमाणे नुसते भरायचे नसते. 


हे ऐकून त्या लेकराच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव मला दिसले आणि त्या पालकांना What Is फुका? ह्या प्रश्नाचं उत्तर ही मिळालं...😅


 आपण मराठी म्हणून जन्मलो... मराठी राज्यात राहतो. मराठी म्हणून जगलो... पण साध्या एका श्लोकाचा अर्थ आपण आपल्या मुलाला सांगू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे.😩


मुलं लहानाची मोठी होताना आजूबाजूचे जग बघत असतात... त्यातून शिकण्याचा प्रयत्न करत असतात... मग त्यांना चांगल्या गोष्टी दाखवायच्या की वाईट ही जबाबदारी पालकांची आहे.


बर आज आपल्या सगळ्यांकडे इंटरनेट आहे. एक मिनिट घेऊन जर फक्त सर्च केलं असतं तरी त्यांना उत्तर मिळालं असतं. पण तेवढे ही कष्ट आपण घेत नाही...🤦🏻


असो... खऱ्या अर्थाने मराठी शाळेत शिकल्याच समाधान आज मला मिळालं... मला माझ्या शाळेचा आणि शिक्षकांचा अभिमान आहे.😇

या अनुभवातून काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील अशी मी आशा बाळगतो.

धन्यवाद...🙏

संकलक

 *प्रा. माधव सावळे*

Best of Luck👍🏻


┉❀꧁꧂❀┉*

    *‼️🌹शुभ दिवस 🌹‼️*

 🍃🍂🌷🙏🌷🍂🍃

*┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉*

*┊*  *┊*  *┊*  *┊*

*┊*  *┊*  *┊* 🍃

*┊*  *┊* 🍃 ❤️

*┊* 🍃 💚

🍃 🤍

🧡


🔥

शासकीय काम वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी मंत्रालय मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र

 शासकीय काम वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी

मंत्रालय मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र

- अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक

            मुंबई, दि. 10 : मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येत आहे. शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई-ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असूनशासनाचा कारभार हा लवकरच  कागद विरहित (Paperless) करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या  अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिली.

            मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरीकांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे टपाल स्वीकारण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत अपर मुख्य सचिव श्रीमती सौनिक बोलत होत्या. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज आणि अधिकारी उपस्थित होते.

            श्रीमती सौनिक म्हणाल्या की,  सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये प्राप्त होणाऱ्या टपालांवर तत्काळ कार्यवाही व्हावी व वेळेचा अपव्यव टाळण्यासाठी लवकरच टपाल केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई- ऑफिसच्या माध्यमातून पाठविण्यासाठी  ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

            मंत्रालयात फक्त टपाल देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांद्वारे प्राप्त होणारे टपाल स्वीकारण्यासाठी कार्यालयीन वेळेत मंत्रालयाच्या मध्यवर्ती टपाल केंद्रात टपाल स्वीकृतीसाठी विभाग व कार्यालय निहाय  व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येईलयाकरिता मध्यवर्ती टपाल केंद्रातील विभागांकरिता स्वतंत्र ई-खाते एनआयसी ( NIC) मार्फत तयार करण्यात येणार आहे.

            नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून कामकाज करणे अपरिहार्य आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशेपुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाहीअसे टपाल समक्ष स्विकारले जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आपले सरकार वेबपोर्टल  होणार लोकाभिमुख

             'आपले सरकारवेब पोर्टलच्या माध्यमातून 511 सेवा पैकी ३८७ सेवा नागरिकांना दिल्या जातात. शासनाच्या जास्तीत जास्त सेवा लोकाभिमुख करण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये 124  सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर  नागरिकांना आपले अर्ज दाखल केल्यापासून सेवा  सहज मिळाव्यात यासाठी  मोबाईल ॲप देखील सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे.

०००

खुश खबर❗डायबेटीस (शुगरसाठी) रामबाण इलाज*👇

 💁🏻‍♂️ *खुश खबर❗डायबेटीस (शुगरसाठी) रामबाण इलाज*👇


👨🏻‍⚕️ *Antox D & Antox T होय Antox D & Antox T* 🌿


🥫  *डायबेटीस शुगरसाठी अद्वितीय औषध आहे.*


*💯% नैसर्गिक, कोणताही दूष्परिणाम नाही. कोणतेही कृत्रिम साहित्य नाही,*


 *(शरीराला शक्ती व स्फूर्ती प्रदान करण्यात सहाय्यक, किडणी साठी शक्ती वर्धक)*

 


*🌱 आयुर्वेदाच्या ह्या अनमोल अतिशय प्राचीन व वनस्पतीशास्त्र युक्त पद्धतीने तयार केल्या गेलेल्या भेटीने. गेल्या खूप वर्षापासून हजारो लोकांना मदत केली आहे.*


💁🏻‍♂️ *कोणत्याही शुगर/ डायबेटीस विकारासाठी फोन करा !*



🪀7875481853


🪀https://wa.me/7875481853?text=शुगरमुक्तीकिट




👉 हे औषध मूळ कारणांना संबोधित करते. 

👉रोग प्रतिकारक शक्ती वाढवते आणि शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

👉औषध घेतल्यावर दूसऱ्या दिवसा पासून फरक जाणवतो.

 👉पोट साफ होणे,

👉 बीपी लेव्हलमध्ये येणे,

👉चिड -चिड कमी होणे, 

👉सेक्स पॉवर ह्या औषधाने वाढते,

👉 थकवा जाणवत नाही. 


🧪 *शुगर लेव्हलमध्ये असल्याने चांगले स्वच्छ दिसणे, हे या औषधाचे गुणधर्म आहेत.*


🔰 मूत्रवहन संस्थेशी संबंधित सर्व त्रास दूर करण्यात सहाय्यक.

🔰 प्रमेहामध्ये उपयोगी विषेशत: वाढलेल्या रक्तशर्करे मुळे उत्पन्न त्रास, अशक्तपणा, 

🔰डोळ्यासमोर अंधारी येणे, हातापायास मुंग्या येणे, 

🔰अत्याधिक तहाण लागणे, गळा सुखणे इ. त्रास दूर करण्यासाठी सहाय्यक


💁🏻‍♂️इतर औषधासोबत घेता येते. हलका व सुपचा आहार घ्यावा.


*आरोग्यदायी संपूर्ण माहिती तुमच्या व्हाट्सअप वर अगदी विनामूल्य आरोग्यदायी टीप्स विविध ऋतूत घ्यावयाची काळजी अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपचार पद्धतीची माहिती मधुमेह आहे घाबरू नका या आमच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी Hi मेसेज करा आपल्याला ग्रुप लींक मिळेल.फक्त मधुमेह पेशंटने *सहभागी व्हावे डायबेटिस* *मधुमेह साठी* *रामबाण🏹*

*Antox D & Antox T.* 


 *कोणत्याही शुगर डायबेटीस विकारासाठी फोन करा !*

*एक शेयर आपल्या प्रियजनांच्या साठी*


🪀7875481853



🙏   *सहकार्य करा   -इतरांना पण शेअर करा*

==========================

महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार प्रदान सोहळा पूर्वतयारी इतिहासात नोंद घेतली जाईल, ‘न भूतो - न भविष्यती’ असा हा कार्यक्रम करु

 महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार प्रदान सोहळा पूर्वतयारी

इतिहासात नोंद घेतली जाईल‘न भूतो - न भविष्यती’ असा हा कार्यक्रम करु

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            अलिबाग, दि. 10 (जिमाका) :- महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवार, दि.16 एप्रिल 2023 रोजी कॉर्पोरेट पार्कखारघरनवी मुंबई येथे आयोजित सोहळ्यात प्रदान केला जाणार आहेयामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढणार आहे. म्हणूनच आपण सर्वांनी झोकून देऊन काम करुया. इतिहासात नोंद घेतली जाईल‘न भूतो - न भविष्यती असा हा कार्यक्रम करुअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खारघर येथे केले.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार प्रदान पूर्वतयारी आढावा बैठक नवी मुंबईखारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईआमदार  भरत गोगावलेआमदार प्रशांत ठाकूरआमदार महेश बालदीसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजयकोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकरकोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार,  नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकरठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगरसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जीसहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदेरायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसेठाणेचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेरायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटीलनवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेउपायुक्त तिरुपती काकडेपंकज भुसानेसांस्कृतिक कार्य संचालनालय सहसंचालक श्रीराम पांडे आदी उपस्थित होते.

             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 हा आदरणीय अप्पासाहेबांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे. शासनाची आणि प्रशासनाची ही सर्वस्वी जबाबदारी आहे. ते म्हणाले कीकोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेने उपायुक्त दर्जाचा अधिकारी प्रत्येक गोष्टीसाठी समन्वय राखण्यासाठी नेमावा. सर्वच घटकांनी जबाबदारीचे भान ठेवून दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी.

            लाखों नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने काळजीपूर्वक काम करावेअसे सांगून मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतापिण्याचे पाणीशौचालय या व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले जावेअसे सूचित केले.

            पोलिसांना सूचना देताना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावीपोलिसांबरोबर ट्राफिक वॉर्डननाही या व्यवस्थेत सहभागी करून घ्यावे35 ते 40 हजार वाहने या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याबाबतही योग्य ती खबरदारी घेण्यात यावीलोकांची कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगितले.

            नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका यांची विशेष जबाबदारी आहे. आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती सर्व तयारी चोख ठेवावी. वैद्यकीय अधिकारीवैद्यकीय पथके यांनी पूर्ण तयारी ठेवावी, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी इतक्या तातडीने आपण बैठक घेत आहोत याबाबत सर्वांनी गांभीर्याने विचार करावा आणि त्याप्रमाणे काटेकोर नियोजन करून कार्यक्रम यशस्वीशिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सज्ज होऊयाया दिमाखदार कार्यक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीअसे आश्वासित उद्गार शेवटी काढले.

            आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम ज्या मैदानात होणार आहे त्या मैदानाची व तेथील इतर व्यवस्थांची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांशी मैदानातील व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली.

0000


 

Featured post

Lakshvedhi