Tuesday, 11 April 2023

वदनी कवळ घेता.

 *........................* 


आज हॉटेल मध्ये जेवायला बसलो असताना एक उच्चभ्रू (हाय क्लास) कुटुंब (वडील, आई, आणि ५वी ६वित असलेला मुलगा) माझ्या समोर बसले होते. 

सहजच त्यांची नजर हॉटेल मध्ये असलेल्या एका श्लोकावर गेली. 

वदनी कवळ घेता...


ते वाचून त्यांच्यात चर्चा सुरू झाली की वदनी कवळ घेता म्हणजे काय... नाम घ्या फुकाचे म्हणजे काय? What is फुका? असे प्रश्न ते एकमेकांना विचारू लागले. 

त्यांच्यासोबत असलेलं ते भाबड लेकरू आई वडिलांच्या चर्चेकडे उत्सुकतेने बघत होते. 


पण मराठीचे फारसे ज्ञान नसल्यामुळे (अर्थात इंग्लिश मिडीयम) त्या श्लोकाचा अर्थ काय त्यांना उमगला नाही... त्यांनी त्यावर भलताच अर्थ जोडण्याचा निष्फळ प्रयत्न केला आणि चर्चा थांबवली आणि काहीतरी नवीन शिकायला मिळेल ह्या आशेने त्यांच्याकडे बघत असलेल्या त्या लेकराचा मात्र भ्रमनिरास झाला...


माझं जेवण झालं, बिल देऊन मी मुद्दाम त्या कुटुंबाच्या जवळ गेलो... त्या पोराच्या पाठीवर हात ठेवत म्हणालो, "काय रे कितविला आहेस?" तो म्हणाला "6th स्टँडर्ड" 

मग मी म्हणालो "तुला माहितेय त्या श्लोकाचा अर्थ काय आहे?" हे ऐकताच त्याचे कान टवकारले. आणि तो आशेने माझ्याकडे बघू लागला... 

वाक्य जोडतच मी त्याला म्हणालो... की...


वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे...

म्हणजे जेवताना तोंडात घास घेताना श्री हरीचे म्हणजेच देवाचे नाव आपण घेतले पाहिजे...


सहज हवन होते नाम घेता फुकाचे...

म्हणजे हे फुकटचे नाव घेतल्याने तुमच्या जेवणाचे सहज हवन म्हणजेच पचन होणार आहे...


जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म...

म्हणजे आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी किंवा जीवंत राहण्यासाठी सगळ्यात गरजेची गोष्ट म्हणजे अन्न आहे... म्हणूनच अन्नाला पूर्णब्रह्म म्हणले जाते...


उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म...

जसे यज्ञ करत असताना त्यात बऱ्याच गोष्टी नुसत्या टाकल्या जातात त्याप्रमाणे उदर म्हणजे आपले पोट त्या यज्ञात टाकलेल्या गोष्टीं प्रमाणे नुसते भरायचे नसते. 


हे ऐकून त्या लेकराच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव मला दिसले आणि त्या पालकांना What Is फुका? ह्या प्रश्नाचं उत्तर ही मिळालं...😅


 आपण मराठी म्हणून जन्मलो... मराठी राज्यात राहतो. मराठी म्हणून जगलो... पण साध्या एका श्लोकाचा अर्थ आपण आपल्या मुलाला सांगू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे.😩


मुलं लहानाची मोठी होताना आजूबाजूचे जग बघत असतात... त्यातून शिकण्याचा प्रयत्न करत असतात... मग त्यांना चांगल्या गोष्टी दाखवायच्या की वाईट ही जबाबदारी पालकांची आहे.


बर आज आपल्या सगळ्यांकडे इंटरनेट आहे. एक मिनिट घेऊन जर फक्त सर्च केलं असतं तरी त्यांना उत्तर मिळालं असतं. पण तेवढे ही कष्ट आपण घेत नाही...🤦🏻


असो... खऱ्या अर्थाने मराठी शाळेत शिकल्याच समाधान आज मला मिळालं... मला माझ्या शाळेचा आणि शिक्षकांचा अभिमान आहे.😇

या अनुभवातून काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील अशी मी आशा बाळगतो.

धन्यवाद...🙏

संकलक

 *प्रा. माधव सावळे*

Best of Luck👍🏻


┉❀꧁꧂❀┉*

    *‼️🌹शुभ दिवस 🌹‼️*

 🍃🍂🌷🙏🌷🍂🍃

*┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉*

*┊*  *┊*  *┊*  *┊*

*┊*  *┊*  *┊* 🍃

*┊*  *┊* 🍃 ❤️

*┊* 🍃 💚

🍃 🤍

🧡


🔥

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi