Tuesday, 11 April 2023

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्तमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

 महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्तमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

            मुंबई, दि. ११ :- भारतीय समाजक्रांतीचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


            यावेळी आमदार सर्वश्री तानाजी मुटकुळे, विकास कुंभारे, किशोर जोरगेवार,सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभाचे विजय शिंदे यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.


00000


महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन


            मुंबई, दि. ११ : भारतीय समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


            यावेळी उपसचिव प्रकाश येंदरकर, अवर सचिव विठ्ठल भास्कर, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ तसेच मागासवर्ग कर्मचारी संघटनेचे (मंत्रालय) अध्यक्ष भारत वानखेडे, पदाधिकारी भास्कर बनसोडे, सुभाष गवई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi