Sunday, 1 January 2023

. *_पु. लं... च्या शब्दात ...!!

 . *_पु. लं... च्या शब्दात ...!!!_*


शून्यातून विश्व, 

     की विश्वातून शून्य ...!!!

          टू रुम किचनचा 

               एखादा फ्लॅट ...

                    दोन चार एकरचं 

                         फार्म हाऊस ...,

                    एखादी चार चाकी गाडी 

               आणि भौतिक वस्तूंचं 

          प्रदर्शन मांडता आलं, की

     आपण म्हणतो ...

अमक्या-तमक्यानं 

     शून्यातून विश्व 

          निर्माण केलं ....!!!

               म्हणजे होतंय कांय, की 

                    सुख मिळेल, या आशेनं 

                    माणूस श्रीमंत होण्यासाठी

              धडपडतोय, पण सुखी 

          कांही दिसत नाही ...!!!

     आपणचं म्हणतो, की

आमच्या लहानपणी खूप 

     मजा यायची ...

          खूप करमायचं, 

               घर भरलेलं असायचं ...

                    दिवस कधी मावळायचा 

               ते कळायचंच नाही ...!!!

          मग आता

     कांय झालं ???

मजा कुठं गेली ???

     एकटं एकटं कां वाटतं ...???

          छातीत धडधड कां होते ...???

               कशामुळं करमत नाही ...???

                    कारण...

              "विश्व निर्माण करण्याची" 

          व्याख्या कुठंतरी चुकली ...!!!

     विश्व निर्माण करणं 

म्हणजे ...

नाती गोती जपणं ...

     छंद जोपासणं ...

          पाहुणे होऊन जाणं ...

               पाहुण्यांचं स्वागत करणं ...

                    खूप गप्पा मारणं ...

               घराच्या उंबऱ्यात 

          चपलांचा ढिग दिसणं ...

     खळखळून हसणं ...

आणि ...

     काळजातलं दुःख सांगून

          मोकळेपणानं रडणं ...!!!

               या गोष्टी आपण

                    प्राप्त करू शकलो, तर ...

               "शून्यातून विश्व 

          निर्माण केलं" असं म्हणावं ...

     तुम्हीच सांगा ... 

आपल्या आयुष्यांत या 

     सर्व गोष्टींची वाढ झाली, 

          की घट झाली ...???

               तुमचं खरं दुःख तुम्ही

                    मोकळेपणानं किती 

               जणांना सांगू शकता ???

          असे किती मित्र, शेजारी,

     नातेवाईक आपण निर्माण 

करू शकलो ...???

     खूप कमी, 

          किंबहूना नाहीच ...!!!

               मग आपण 

                    "विश्व निर्माण" 

                केलं कां ...???

          तर नाही ...

     मित्रहो, 

रजिस्ट्रीच्या कागदाच्या 

     फायली म्हणजे विश्व ...???

          भौतिक साधनांची रेलचेल 

               म्हणजे विश्व ...???

                    नाही ...!!!

               लॉकरमध्ये ठेवलेले 

          हिरे मोत्यांचे दागिने 

     म्हणजे विश्व ...???

मुखवटे घातलेल्या 

     चेहऱ्यांची गर्दी 

          म्हणजे विश्व ...???

               नाही ...!!!

                    हे समजून 

               घ्यावं लागेल ...!!!

          मोठं बनण्याच्या

     दडपणामुळं ...

आणि मग कामाच्या 

     व्यापामुळं ...

          नाती दूर जाणार 

                असतील, ...

                    इतरांना तुच्छ लेखण्यामुळं

               आणि अहंकारामुळं माणसं 

          जवळ येणार नसतील...

      दुःख सांगायला, 

मन हलकं करायला 

     जागांच उरणार नसेल, 

          तर ...

               आम्ही शून्यातून 

                     विश्व निर्माण केलं,  

                की ...

         विश्वातून शून्य...?????

 🌷🌷🌷🌷🙏🏻🌷🌷🌷🌷

           ( पु लं.च्या एका‌ संग्रहातून )

🙏

*वर्षाच्या शेवटी सर्वांसाठी एक अप्रतिम गाणे -* 

🎼🎼🎧🎧

 *भले बुरे जे घडून गेले,* *विसरून जाऊ सारे क्षणभर* , 

 *चला विसाऊ या वळणावर* 

*या $ $ $ $ वळणावर*

👇👇

नशा अशी की निशा

 नशेत टुण्णं झालेले Surve घराकडे चालले होते.


 वाटेत चायनीजची गाडी दिसली. ते गाडीवर गेले अन् म्हणाले "एक प्लेट चिकन चिली दे."


गाडीवाला म्हणाला "चिकन आता रेडी नाही. आणि आता खुप उशीर ही झालाय. गाडी बंद करायची वेळ झालीच. कच्चं शिल्लक आहे ते देऊ का ? "

सुर्वेनी विचार केला घरी गेल्यावर बायको बनवेल.


 त्यांनी होकार दिल्यावर गाडीवाल्यानी एक किलो चिकन प्लास्टिक बॅग मध्ये टाकून ती बॅग सूर्वेंच्या हातात दिली.


सुर्वे घराजवळ आल्यावर गल्लीतली कुत्री त्यांच्यावर भुंकू लागली. सुर्वेही त्यांना शिव्या देऊ लागले. 


तेव्हा एक मोठा कुत्रा त्यांच्यासमोर आला पण तो सुर्वेवर न भुंकता फक्त त्यांच्याकडे फक्त पहात उभा राहिला होता.


सुर्वे त्यांच्याकडे पाहून म्हणाले "तू एकदम चांगला कुत्रा आहेस. इतर कुत्र्यासारखं तू माझ्यावर भुंकला नाहीस. तूला चांगल्या माणसाची पारख आहे. तुझी अन् माझी खुप जमेल. मी तुझ्यावर खुश झालो आहे. हे घे चिकन खा."

असं म्हणत हातातल्या बॅग मधलं सर्व चिकन त्यांनी त्या कुत्र्याच्या समोर टाकलं.


 कुत्रा ते खाऊ लागला तर बराच वेळ सुर्वे प्रेमानी त्याच्या पाठीवर हात फिरवत होते. 


नंतर ते घराकडे निघाले...


घरी पोहोचल्यावर बायकोनी जे ताटात वाढून आणून दिलं ते गुपचुप खाल्लं आणि झोपून गेले.


इकडं सुर्वेच्या बायकोनी दुपारीच ऐकलं होतं की गावात एक बिबट्या आला असून सायंकाळी तो एका घरात ही शिरला होता.


 बऱ्याच लोकांनी त्याला पाहिलं होतं. 


म्हणून ती आपल्या नवऱ्याच्या काळजीत होती. पण नवरा सुरक्षित घरी आलेला पाहून तिने देवाचे आभार मानून आता ती ही झोपण्याच्या तयारी करू लागली...


तोच मुलांच्या मोबाईल वर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याला कैप्शन होतं की

आपल्या गल्लीतला सूपर हिरो...


मूलानी तो व्हिडिओ आपल्या आईला दाखवला.


 बिबट्याला चिकन खाऊ घालत, वरून त्यांच्याच पाठीवरून हात फिरवत असलेल्या आपल्या नवऱ्याला पाहून ती बिचारी बेशुद्ध पडली.


हिच तर खरी ताकद असते दारूची...


कळले का भाऊ???

Copied and edited from FB 🤣🤣🤣🤣

शुभ वर्ष

 *हा असं वागला ,*

       *तो तसं वागला ,*        

       *कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा,*            

        *आपण पुढे कसं वागायचं , याचा विचार करा .* 

         *आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे ,*     

            *तर तुम्ही चांगले आहात म्हणून.*       

🌺✨ *_ शुभ वर्ष🌺

Saturday, 31 December 2022

जावू बाई जोरात,31st


 

राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

 राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन


हवामान केंद्र मुंबईतील तापमान, प्रदुषण, हवेची गुणवत्ता, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरणे आदी अचूक माहिती देणार.

मुंबई, दि.31 : सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौर उर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी दि. 31 प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.   

हवामान केंद्राच्या माध्यमातून मुंबईतील तापमान, प्रदूषण, हवेची गुणवत्ता, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरणे, कार्बन डाय ऑक्साईडची पातळी आदी विषयक अचूक माहिती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहता येणार आहे. या हवामान केंद्रामुळे मुंबई हवामानाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर जोडले जाणार असून 'वेदर अंडरग्राउंड' या जागतिक हवामान विषयक संस्थेच्या संकेतस्थळाशी जोडले जाणार आहे.  

जागतिक हवामान बदल हे गंभीर आव्हान असून विद्यापीठे, शिक्षक व संशोधक यांनी या विषयावर निकडीने काम केले पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.      

हवामान केंद्र स्थापना सोहळ्याला सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील भारत-अमेरिका अभ्यास केंद्राच्या संचालिका प्राध्यापिका पारोमिता सेन, प्राध्यापक निल फिलिप, प्राध्यापक ब्रायन वॉन हल, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु उज्वला चक्रदेव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु कारभारी काळे तसेच तसेच सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील विज्ञान, तंत्रज्ञान व पब्लिक पॉलिसी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते. 

       भारतात अश्या प्रकारची 6 हवामान केंद्रे ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश व इतर राज्यात यापूर्वीच स्थापन करण्यात आली असून लवकरच एसएनडीटी महिला विद्यापीठ जुहू परिसर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील हवामान केंद्र स्थापन केले जाणार असल्याचे प्रा. पारोमिता सेन यांनी यावेळी सांगितले. 





अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनने सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कला दिलेल्या आर्थिक सहकार्यातून हे केंद्र स्थापन करण्यात आले असून केंद्राच्या माध्यमातून मिळालेली हवामानासंबंधी माहिती राजभवनाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले. 


oooo

Governor Koshyari unveils Weather Station at Raj Bhavan

Mumbai, Date.31 : Solar Powered Weather Station to provide accurate data of air quality, humidity, UV rays in Mumbai

A Solar Powered Weather Station for Climate Change Monitoring was installed in presence of State Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Sat (31 Dec).

The weather installation project is a collaboration with the City University of New York (CUNY) and IIT Bombay through their National Science Foundation collaborative grant project to monitor air pollution and weather on a micro-scale in Mumbai.

Prof Paramita Sen, Adjunct Lecturer. Department. Chemistry, Earth Sciences, and Environmental Sciences, City University of New York, Prof Neal Philip, Prof Brian Van Hull of City University of New York, Prof Ujwala Chakradeo, Vice Chancellor SNDT Women's University, Prof Karbhari Kale, Officiating Vice Chancellor, Savitribai Phule Pune University and students from the Science, Technology and Public Policy Department of the City University of New York were present.

Addressing the invitees, the Governor said Climate Change is a serious challenge to the world. He called upon the University students to make it a mission to understand and address the various challenges arising from global climatic change.

According to Prof Paramita Sen, the Weather Station at Raj Bhavan will help measure accurately and access from anywhere the temperature, pollution levels, air quality, humidity, solar radiation, Ultraviolet Rays, Carbon Dioxide levels in Mumbai. 

According to her, the weather data will be linked to the 'Weather Underground' network and will bring Mumbai on the world map of climate monitoring. She said that a similar Weather Stations will be installed at the Juhu Campus of SNDT WOmen's University and the Savitribai Phule Pune University in the near future

She informed the Governor that the US National Science Foundation International Science Experiences for Students had made a grant of $300,000 for the project, under which solar powered weather stations have already been set up in Telangana, Odisha, Andhra Pradesh and other places. The information available from the Weather Station will soon be made accessible from the website of Raj Bhavan, she said. 


0000


 


 



महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार प्रकरणी फेरचौकशी करणार

 महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये

गैरव्यवहार प्रकरणी फेरचौकशी करणार


- मंत्री संदीपान भुमरे.

            नागपूर, दि. ३० : उस्मानाबाद जिल्ह्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची बाब गंभीर आहे. याप्रकरणी 4 अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तरी याप्रकरणी फेर चौकशी करण्यात येईल, संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत दिली.


            याबाबत सदस्य कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री श्री. भुमरे बोलत होते.


             मंत्री श्री भुमरे म्हणाले की, या प्रकरणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे. याप्रकरणी गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. दोषी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या असून इतर नियमित दोषी अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येत आहे.


            या प्रकरणी 1 कोटी 12 लाखाचा अपहार झाला आहे. संबंधिताकडून 75 लाख 70 हजार वसूल करण्यात आले असून उर्वरित रकम वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत लाचलुचपत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी चालू आहे. असे अपहार होऊ नयेत यासाठी आधार लिंक केले जात आहे. हा सर्व प्रकार उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये झाला असून बीड जिल्ह्यात पैसे उचलण्यात आले आहेत. याबाबत खातेदाराची चौकशी चालू आहे. १०० दिवसात रोजगार मिळण्यासाठी नगरपंचायतीमार्फत काम घेता येते. ज्याप्रकारे मागणी होते, त्या अनुषंगाने सर्व मजुरांना काम दिले जात आहे. अकुशल कामगारांना वेळेत पैसे उपलब्ध होत आहेत.


            यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, यशोमती ठाकूर, प्रकाश साळुंखे, सुरेश वरपूडकर, अदिती तटकरे यांनी सहभाग घेतला

बनावट खत विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार

 बनावट खत विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार


- मंत्री शंभूराज देसाई


            नागपूर, दि. ३० : बनावट खत विक्री करणाऱ्यांवर चाप बसावा यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक नियुक्त करून बी-बियाणे, खते यांचे गोडाऊन तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील. अशा बनावट खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आजच दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.


            बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खताची पिशवी शेतकऱ्यांना घेण्याकरिता एक वेगळे खत घेण्याची सक्ती केल्याबाबत प्रश्न सदस्य संजय गायकवाड यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.


            मंत्री श्री देसाई म्हणाले की, बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खताची पिशवी शेतकऱ्यांना घेण्याकरिता एक वेगळे खत घेण्याची सक्ती करून विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. हे दुकान 15 वर्षांपूर्वीचे असून लिंकिंग पद्धतीने खते दिली. याबाबत प्राथमिक चौकशी केली आहे. त्या दुकानाचा दहा दिवसांसाठी परवाना रद्द केला आहे. असे लिंकिंग पुन्हा होणार नाही यासाठी क्षेत्रिय अधिकारी यांच्यामार्फत अचानक तपासण्या करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वरिष्ठ जिल्हा कृषी अधिकाऱ्यामार्फत याची चौकशी करून दोषीअंती संबधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल.


            या दुकानाचा पंधरा वर्षे जुना परवाना आहे. यामुळे या दुकानाची पंधरा वर्षांत पहिलीच तक्रार असल्यामुळे परवाना पुन्हा दहा दिवसांनी पूर्ववत केलेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत परवानाधारक खत विक्रेत्याने डीपी खतासोबत इतर खते शेतकऱ्यांना सक्ती करून विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सागर सीड्स अँड फर्टीलायझर यांचा विक्री परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला होता.


            परंतु खरीप हंगामामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत लिंकिंग पद्धतीने विक्री न करण्याबाबात दिलेले हमी पत्र विचारात घेऊन निलंबित केलेला खत विक्री परवाना पूर्ववत करण्यात आला आहे.


            यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला होता.


0000

Featured post

Lakshvedhi