सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 25 September 2022
वेस्ट टू एनर्जी प्रकल्प ‘
नाशिक महापालिकेचे खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प
चालविण्यास ‘महाप्रित’ उत्सुक
नाशिक, दि.२४: नाशिक शहरासाठी ईव्ही चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्याची महात्मा फुले नवीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रोद्योगिकी मर्यादित (महाप्रित) कंपनीने दर्शविली आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेचे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आणि ‘खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर’ चालविण्यास महाप्रित उत्सुक असल्याचे महाप्रितचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी यांनी सांगितले.
‘महाप्रित’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी नाशिक मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे भेट दिली. यावेळी त्यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.
मनपाचा वॉटर ट्रिटमेंट आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प संपूर्णपणे सोलर तंत्रज्ञानावर विकसित करून त्यातून ऊर्जा बचत होईल, असे श्री. श्रीमाळी यांनी यावेळी सांगितले. ‘महाप्रित’ केंद्र सरकारच्या भागीदारीत ऊर्जा बचत, सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहने व चार्जिंग स्टेशन प्रकल्प, प्रदूषण नियंत्रण अशा विविध प्रकल्पांमध्ये कार्यरत असून नाशिक येथे ईव्ही चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मनपाचे दोन प्रकल्प महाप्रितमार्फत चालविण्यासाठी सहमती दर्शवून याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. योजनांमध्ये मनपाला जास्तीतजास्त निधी मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बैठकीला महाप्रितचे कार्यकारी संचालक रविंद्र चव्हाण, महाव्यवस्थापक उमाकांत धामणकर, प्र. अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे, उपायुक्त मनोज घोडे-पाटील आदी उपस्थित होते.
00000
जागतिक पर्यटन दिन
जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीमार्फत दि.23 ते 29 सप्टेंबर दरम्यान विविध उपक्रम
मुंबई, दि.२४ : जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यावर्षीही 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करत असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) द्वारे सन 2022 करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य ‘पुनर्विचारात्मक पर्यटन’ (Rethinking Tourism) हे घोषित करण्यात आले आहे.
या वर्षी इंडोनेशियातील बाली येथे 27 सप्टेंबर रोजी अधिकृत जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाईल, जो विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनाकडे वळवला जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या घोषवाक्यानुसार आपण पर्यटन कसे करतो याचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.
एमटीडीसीच्या प्रधान कार्यालयासमवेत महामंडळ स्वत: परिचलन करत असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये, सर्व पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स, माहिती केंद्रे, कलाग्राम इ. ठिकाणी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत दि.23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत ‘पर्यटन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये नजिकच्या नामवंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शाळा, पुरातत्व विभाग आदींच्या सर्वसमावेशक योगदानातून हा पर्यटन सप्ताह विविध आकर्षक उपक्रमांची अंमलबजावणी करत उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात येत आहे.
पर्यटक निवासात वास्तव्य येणाऱ्या पर्यटकांचे विमानतळ, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येईल. पर्यटक निवासामध्ये या दिवशी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध स्पर्धा तसेच पारंपरिक खेळाचे आयोजन असेल. सर्व उपहारगृहामध्ये त्या त्या भागातील स्थानिक प्रसिद्ध असलेले विशेष पदार्थ तयार करण्यात येणार असून त्याबाबत उपहारगृहाच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना सूचना फलकाद्वारे अवगत करण्यात येणार आहे. पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालताना वास्तव्यास आलेल्या अतिथी पर्यटकांना निवासाभोवताली असलेल्या नजिकच्या सुरक्षित - पर्यावरण पूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल, नॅचरल वॉक इ. चा मनमुराद आस्वाद पर्यटकांना देण्यात येणार आहे.
‘पर्यटनावर पुनर्विचार’ या विषयावर विविध स्पर्धा, व्याख्यानमाला, कलेतून प्रबोधन आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्या निर्देशानुसार आणि महाव्यवस्थापक चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली 'पर्यटन सप्ताह’ हा पर्यटनाशी पुरेपूर निगडित राहील व आयोजित होत असलेल्या उपक्रमांद्वारे पर्यटनवाढ वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल, या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक स्थळी पदयात्रांचे आयोजन, छोट्या मॅरथॉन, गायन व वादनाचे कार्यक्रम, ग्रामीण भागांचे दर्शन, शालेय मुलांसाठी विविध उपक्रम, जबाबदार आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या अंतर्गत जंगल आणि शेती येथे पदभ्रमंती असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या निमित्ताने पर्यटन राजधानी औरंगाबाद येथे एमटीडीसी, विनीत फाउंडेशन आणि औरंगाबाद Ploggers यांच्या संयुक्त विद्यमाने मायक्रोप्लास्टिक प्लॉगिंग (Microplastic Plogging) या नाविण्यपूर्ण उपक्रमासोबतच 27 सप्टेंबर 2022 रोजी सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरणासाठी पूरक असे स्वच्छता अभियान, समुद्रकिनारा सफाई, हस्तकला, गडभ्रमंती असे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहेत. पर्यटनाचा पुनर्विचार करताना पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाची सांगड घालण्यात येणार आहे. पर्यटकांनी या उपक्रमांमध्ये भाग घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा, तसेच पर्यावरण रक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.
00000
लंपिपशुधन आजार
राज्यातील 21,948 बाधित पशूधनापैकी 8056 पशूधन उपचाराने झाले बरे
मुंबई, दि. 24 : राज्यामध्ये दि. 24 सप्टेंबर 2022 अखेर 30 जिल्ह्यांमधील 1757 गावांमध्ये फक्त 21,948 जनावरांमध्ये लंपी चर्म रोगाचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. यापैकी 8056 पशूधन उपचाराने बरे झालेले असल्याची माहिती पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. उर्वरीत बाधित पशूधनावर उपचार सुरु आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 81.61 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या 5 किमी परिघातील 1757 गावातील 36.60 लक्ष पशूधन आणि परिघाबाहेरील 10.70 लक्ष पशूधन अशा एकूण 47.30 लक्ष पशूधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. गोशाला व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशूधन असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. तसेच शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवूद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असून, त्यासाठी देखील लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता सर्व 4850 पशूवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू असल्याची माहिती आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
लंपी चर्म आजारावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिक, सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशूवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासिता छात्र यांना प्रती लसमात्रा रु. 3/- प्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले आहेत. सर्व खासगी पशूवैद्यकीय व्यावसायिकांनी, सेवादात्यांनी तसेच पशूसंवर्धन विभागातील तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत असून, यासाठी त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. शासकीय पशूवैद्यकांनी तसेच खाजगी पशूवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत, अशा सूचनाही श्री सिंह यांनी दिल्या.
Saturday, 24 September 2022
वयोश्री योजनेच्या लाभ जेष्ठ नागरिक
वयोश्री योजनेच्या लाभातून कोणीही वंचित राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 4 कोटींचे साहित्य वाटप
नागपूर दि. 24 : ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक पिढीचे वैभव असते. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आजचे चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जबाबदारी म्हणून ‘वयोश्री’ योजनेतील साहित्य वाटपातून कोणीही वृद्ध वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग यांच्यामार्फत आज नागपूर येथे दक्षिण - पश्चिम आणि पश्चिम नागपूर मतदार संघाकरिता ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ व ‘दिव्यांग सहायता योजना’ अंतर्गत साहित्य वाटप शिबीर घेण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वयोश्री योजनेतील प्रातिनिधीक साहित्य वाटप केले. कार्यक्रमासाठी दीक्षाभूमी परिसरातील काच्छीपुरा येथील पीकेव्ही मैदानावर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
भारतीय कृत्रिम अंग निर्माण मंडळ (एलिम्को) कानपूर, नागपूर महानगरपालिका नागपूर, सीआरसी नागपूर यांच्यामार्फत कृत्रिम अवयव, चष्मा, व्हीलचेअर, श्
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दातृत्वाच्या भूमिकेतून वयोश्री सारखी अत्यंत महत्त्वाची योजना ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी तयार केली आहे. वरिष्ठ नागरिकांना आयुष्याच्या उत्तरार्धात सहजपणे जीवन जगता यावे, यासाठी या साहित्याची गरज असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय कल्पकतेने नागपूर शहरासाठी या योजनेची वितरण यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे दक्षिण - पश्चिम, पश्चिम नागपूर मतदार संघातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही. ज्यांना आता साहित्य मिळाले नसेल त्यांना पुढच्या वेळी नक्की साहित्य मिळेल, असे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी अतिशय उत्तम दर्जाचे साहित्य वितरित करण्यात येत असून त्याचा दर्जा दीर्घकाळ टिकेल.
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, ज्येष्ठांची सेवा ही ईश्वरीय सेवा असून रंजल्या - गांजल्यांची सेवा करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपुरात जेष्ठ नागरिकांसाठी सुंदर बाग - बगीचे, विरंगुळा केंद्र यासोबतच जागतिक दर्जाचे दिव्यांग पार्क उभारण्यात येईल. अनुसूचित जाती व आदिवासी समुदायात मोठ्या प्रमाणात सिकलसेल रुग्ण आढळतात. अशा रुग्णांना 'बोन मॅरो ' ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अर्ध्या किमतीत उपचार उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या शिबीरात नागपूर शहर व जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना - 2021 आणि दिव्यांग सहायता योजनेतून दक्षिण - पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील 3 हजार 950 लाभार्थ्यांना 4 कोटी रुपयांच्या सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले. यामध्ये दिव्यांग सहायता योजनेचे 372 आणि वयोश्रीचे 3 हजार 578 लाभार्थी आहे. त्यांना 30 हजार 520 उपकरणे नि:शुल्क दिली गेली.
0000
समृद्धीप्रमाणे 'नागपूर-गोवा एक्सप्रेस
समृद्धीप्रमाणे 'नागपूर-गोवा एक्सप्रेस मार्ग ' होणार : देवेंद्र फडणवीस
'नरेडको'च्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची माहिती
नागपूर दि.२४ : नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा 'इकॉनॉमिकल कॉरिडॉर' विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ (नरेडको) या संस्थेमार्फत नागपूर येथील ली -मेरिडियन हॉटेल येथे बांधकाम व्यावसायिक आणि विकासक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा विविध गटातील उपलब्धीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पुरस्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार सर्वश्री परिणय फुके, मोहन मते, विजय दर्डा, उपमुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, नरेडकोचे अध्यक्ष राजन बांदेळकर, उपाध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, विजय दर्डा, महारेराचे संस्थापकीय प्रमुख गौतम चॅटर्जी, विदर्भ नरेडकोचे अध्यक्ष घनश्याम ढोकणे, उपाध्यक्ष ब्रीजमोहन तिवारी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यास सभापती मनोज कुमार सूर्यवंशी उपस्थित होते.
नागपूर हे शहर 'लॉजिस्टिक हब ' म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात 'लॉजिस्टिक सपोर्ट ' तयार होणार आहे. भारतातील प्रत्येक मोठ्या शहराला आठ ते दहा तासात नागपूर जोडले जाणार आहे. त्यामुळे या शहरात बांधकाम व्यावसायिक व विकासक यांना फार मोठी संधी आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये ५ हजार किलोमीटरचे 'एक्सप्रेस 'महामार्
महारेरा सारख्या कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिक व विकासक यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. विश्वासार्हता वाढली. रेरामुळे बांधकाम विकासक क्षेत्रात महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत अग्रेसर राज्य झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील या क्षेत्रात महाराष्ट्राने घेतलेल्या भरारीचे कौतुक केले आहे. या कायद्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरे झपाट्याने विकसित होत आहेत. बांधकाम व्यावसायिक व विकासकांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील असे त्यांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिकांनी सामान्य नागरिकांना परवडणारी घरे आणि हरित पट्टे सांभाळात तयार होणारी विस्तारित शहरे बनविण्याकडे लक्ष द्यावे,असे आवाहन फडणवीस यांनी केले. या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांना विविध गटात यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले.
00000
ग्लेशिअर वर सॅटेलाईट बेस इंटरनेट सेवा
भारतीय सेनेने काल जगातील सगळ्यात उंचावर असलेल्या युद्धभूमीवर म्हणजेच सियाचीन ग्लेशिअर वर सॅटेलाईट बेस इंटरनेट सेवा चालू केली असल्याचं स्पष्ट केलं आहे. तब्बल १९,०६१ फूट (५८०९ मीटर) उंचीवर भारताच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना २४ तास ३६५ दिवस इंटरनेट उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे त्यांचा बेसशी आणि कमांड सेंटरशी असलेला संपर्क अजून चांगल्या पद्धतीने प्रस्थापित होणार आहे.
बी.बी.एन.एल. या भारत सरकारच्या उपक्रमातून ही सेवा देण्यात येते आहे. सॅटेलाईट इंटरनेट सेवेत माहितीच आदान प्रदान हे थेट भूस्थिर उपग्रहमार्फत होत असते. हे उपग्रह पृथ्वीपासून जवळपास ३६,००० किलोमीटर च्या कक्षेत स्थापन केलेले असतात. यांच्या परिवलनाचा आणि पृथ्वीच्या परिवलनाचा वेग सारखा असल्याने त्यांच्याकडून सतत संदेशाची देवाणघेवाण होऊ शकते. भारतीय सेनेच्या सियाचीन नेटवर्कसाठी इसरो चे जीसॅट ११ आणि जीसॅट २९ हे उपग्रह वापरण्यात येणार आहेत.
सॅटेलाईट इंटरनेट हे बाकीच्या प्रणालीपेक्षा स्वायत्त असल्याने इतर नेटवर्क काही कारणाने बंद झाल्यावर ही हे नेटवर्क काम करत रहाते. ज्या भागात फायबर नेटवर्क किंवा इतर कोणत्याही मार्गाने नेटवर्क प्रस्थापित करणं शक्य नसते. तिकडे अश्या पद्धतीचं नेटवर्क वापरण्यात येते. येत्या काळात इसरो फक्त भारतीय सेनेसाठी एक उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. ज्यावर फक्त भारतीय सेनेला संपर्कासाठी ट्रान्सपॉन्डर देण्यात येणार आहेत. ज्यामुळे लेह- लडाख सारख्या अतिदुर्गम क्षेत्रात संपर्क अजून सक्षम होण्यास मदत होणार आहे.
जय हिंद!!! 🇮🇳
विनीत वर्तक
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...

