Sunday, 25 September 2022

जागतिक पर्यटन दिन

 जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीमार्फत दि.23 ते 29 सप्टेंबर दरम्यान विविध उपक्रम


            मुंबईदि.२४ : जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकारमहाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यावर्षीही 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करत असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) द्वारे सन 2022 करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य पुनर्विचारात्मक पर्यटन’ (Rethinking Tourism) हे घोषित करण्यात आले आहे.

          या वर्षी इंडोनेशियातील बाली येथे 27 सप्टेंबर रोजी अधिकृत जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाईलजो विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनाकडे वळवला जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या घोषवाक्यानुसार आपण पर्यटन कसे करतो याचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.

            एमटीडीसीच्या प्रधान कार्यालयासमवेत महामंडळ स्वत: परिचलन करत असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयेसर्व पर्यटक निवासेउपहारगृहेबोट क्लब्समाहिती केंद्रेकलाग्राम इ. ठिकाणी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत दि.23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत पर्यटन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये नजिकच्या नामवंत सामाजिकआर्थिकशैक्षणिक संस्थामहाविद्यालयेशाळापुरातत्व विभाग आदींच्या सर्वसमावेशक योगदानातून हा पर्यटन सप्ताह विविध आकर्षक उपक्रमांची अंमलबजावणी करत उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात येत आहे.

            पर्यटक निवासात वास्तव्य येणाऱ्या पर्यटकांचे विमानतळबस स्थानकरेल्वे स्टेशन अशा ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येईल. पर्यटक निवासामध्ये या दिवशी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध स्पर्धा तसेच पारंपरिक खेळाचे आयोजन असेल. सर्व उपहारगृहामध्ये त्या त्या भागातील स्थानिक प्रसिद्ध असलेले विशेष पदार्थ तयार करण्यात येणार असून त्याबाबत उपहारगृहाच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना सूचना फलकाद्वारे अवगत करण्यात येणार आहे. पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालताना वास्तव्यास आलेल्या अतिथी पर्यटकांना निवासाभोवताली असलेल्या नजिकच्या सुरक्षित - पर्यावरण पूरक ठिकाणी ट्रेकजंगल ट्रेलनॅचरल वॉक इ. चा मनमुराद आस्वाद पर्यटकांना देण्यात येणार आहे.

            पर्यटनावर पुनर्विचार’ या विषयावर विविध स्पर्धा, व्याख्यानमालाकलेतून प्रबोधन आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.

            महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्या निर्देशानुसार आणि महाव्यवस्थापक चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली 'पर्यटन सप्ताह’ हा पर्यटनाशी पुरेपूर निगडित राहील व आयोजित होत असलेल्या उपक्रमांद्वारे पर्यटनवाढ वृद्धिंगत होण्यास हातभार लागेलया दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक स्थळी पदयात्रांचे आयोजनछोट्या मॅरथॉनगायन व वादनाचे कार्यक्रमग्रामीण भागांचे दर्शनशालेय मुलांसाठी विविध उपक्रमजबाबदार आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या अंतर्गत जंगल आणि शेती  येथे  पदभ्रमंती  असे  उपक्रम  राबविण्यात  येणार  आहेत. या  निमित्ताने पर्यटन राजधानी औरंगाबाद येथे एमटीडीसीविनीत फाउंडेशन आणि औरंगाबाद Ploggers यांच्या संयुक्त विद्यमाने मायक्रोप्लास्टिक प्लॉगिंग (Microplastic Plogging)  या नाविण्यपूर्ण उपक्रमासोबतच 27 सप्टेंबर 2022 रोजी सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.

            पर्यावरणासाठी पूरक असे स्वच्छता अभियानसमुद्रकिनारा सफाईहस्तकलागडभ्रमंती असे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहेत. पर्यटनाचा पुनर्विचार करताना पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाची सांगड घालण्यात येणार आहे. पर्यटकांनी या उपक्रमांमध्ये भाग घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावातसेच पर्यावरण रक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवावाअसे आवाहन एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi