Sunday, 25 September 2022

लंपिपशुधन आजार

 राज्यातील 21,948 बाधित पशूधनापैकी 8056 पशूधन उपचाराने झाले बरे

 

            मुंबईदि. 24 : राज्यामध्ये दि. 24 सप्टेंबर 2022 अखेर 30  जिल्ह्यांमधील 1757 गावांमध्ये फक्त 21,948 जनावरांमध्ये लंपी चर्म रोगाचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. यापैकी 8056 पशूधन उपचाराने बरे झालेले असल्याची माहिती पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. उर्वरीत बाधित पशूधनावर उपचार सुरु आहेत.

            राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 81.61 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या 5 किमी परिघातील 1757 गावातील 36.60 लक्ष पशूधन आणि परिघाबाहेरील 10.70 लक्ष पशूधन अशा एकूण 47.30 लक्ष पशूधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. गोशाला व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशूधन असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. तसेच शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवूद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असूनत्यासाठी देखील लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता सर्व 4850 पशूवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू असल्याची माहिती आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

 

            लंपी चर्म आजारावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिकसेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशूवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासिता छात्र यांना प्रती लसमात्रा रु. 3/- प्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले आहेत. सर्व खासगी पशूवैद्यकीय व्यावसायिकांनीसेवादात्यांनी तसेच पशूसंवर्धन विभागातील तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत असूनयासाठी त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. शासकीय पशूवैद्यकांनी तसेच खाजगी पशूवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत, अशा सूचनाही श्री सिंह यांनी दिल्या.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi