Sunday, 19 June 2022

 महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत

पुणे, अमरावती आणि नाशिकला जन सुनावणी


            मुंबई, दि. 19: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुणे, अमरावती आणि नाशिक येथे जन सुनावणी आयोजित केली आहे. आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            जनसुनावणी चा तपशील खालील प्रमाणे

अ.क्र. वभागाचे नावसुनावणी दिनांक व ठिकाणवेळ

सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती/जमातीचे नाव

1 पुणे 30 जून 2022

व्हि.व्हि.आय.पी. शासकीय विश्रामगृह, पुणे.दु. 2.00 वा पासून

1) सगर2) कडिया3) कुलवाडी4) टकारी5) लिंगायत रड्डी

2अमरावती05 जुलै 2022

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, अमरावती.

सकाळी 11.00 वा पासून

1) हलवाई2) हलबा कोष्टी3) अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर

4) गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार , गु.कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार इ.

5) हडगर

6) तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करणेबाबत

7) केवट समाजातील तागवाले/तागवाली

3नाशिक15 जुलै 2022जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक.सकाळी 11.00 वा पासून

1) काथार/कंठहारवाणी2) कंसारा

3) अत्तार जातीच तत्सम जात पटवे, पटवेगर, पटोदर

4) बैरागी जातीच्या संदर्भात शासन निर्णायात दुरुस्ती

5) चेवले गवळी दाभोळी, गवळी व लिंगायत गवळी

6) नावाडी

16 जुलै 2022जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक.

सकाळी 11.00 वा पासून

7) वळंजूवाणी, कुंकारी वळांजूवाणी, वळुंज बळुंज, शेटे, दलाल इ.8) लाडशाखीय वाणी9) लाडवंजारी

10) रामगडिया सिख11) कानडे/कानडी

0000

बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले अभिनंदन

            मुंबई, दि. १९ : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत राज्यातील बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले आहे. यापैकी ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

            मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, बालगृहातील या विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत उज्ज्वल यश संपादन केले आहे, याचा मला अभिमान आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. बालगृहातील विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा, सुरक्षित वातावरण व कौटुंबिक प्रेम देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. बालगृहातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी विभागामार्फत नेहमीच घेतली जाते. या मुलांना शिक्षणासाठी मदत व मार्गदर्शनही विभागामार्फत केले जाते.

            राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे पाठविली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात दाखल करण्यात येते. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते, असे मंत्री ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

            राज्यात पुणे विभागातील बालगृहातील सर्वाधिक १८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून औरंगाबाद विभाग १०१ विद्यार्थी, कोकण विभाग ९८ विद्यार्थी, नाशिक विभाग ६१ विद्यार्थी, अमरावती विभाग ५१ विद्यार्थी, नागपूर विभाग ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० टक्के गुण मिळविले आहेत. १०५ विद्यार्थ्यांनी ७५ ते ८५ टक्के गुण मिळविले आहेत. १५२ विद्यार्थ्यांनी ६५ ते ७५ टक्के गुण मिळविले आहेत.

0000


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 



 पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी प्रयत्न

स्वच्छता सुविधापंचायतींना अनुदानासाठी

सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

            मुंबई दि. 19 : पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहेअशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहेअसेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आषाढी एकादशी निमित्त पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहेअसे श्री मुश्रीफ यांनी सांगितले.

            आषाढी एकादशीच्या निमित्त पुणेसातारासोलापूर जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्या सोबत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते. यानुसार पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहेअसे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

            पुणे, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या पन्नास टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे. हा निधी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना मागणीनुसार उपलब्ध करून द्यायचा आहेअसे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

            पुणे जिल्हा परिषदेला ब्याऐंशी लाख रुपयेसातारा जिल्हा परिषदेला वीस लाख पंचवीस हजार रुपये तर सोलापूर जिल्हा परिषदेला एक कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.

सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला मंजूर

            पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्या सोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असल्याचेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. एकूण मंजुरीच्या वीस टक्के प्रमाणात म्हणजेच एक कोटी चौतीस लाख चौसष्ठ हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बीडीएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला असल्याची माहितीही श्री. मुश्रीफ यांनी दिली.

0000

 

 


बाप रे

 


 


बाप दीन

 *बाबातही एक आई असते ।।*

*जीवन संगीत*

*19 June - Happy Father's Day*


*आई छान, बाप बरा असतो*

*औषधासारखा कडू !*

*पण उपचार मात्र खरा असतो.*

       त्याला वेळ कमी मिळतो,

       त्याच्याशी मेळही कमी जुळतो,

व्यवहारात हुशार असला तरी,

भावनांचा खेळ त्याला कमीच कळतो.

     घरून निघायची असो 

     की पुन्हा घरी परतायची -

     त्याला सदैव घाईच असते,

कठोर-निष्ठुर चेहऱ्या पलीकडे, 

*बाबातही एक आई असते ।।*


नेहमी छातीशी धरणे त्याला जमत नाही,

प्रेमासाठी रडणे सोडा,

साधा दिखावाही करत नाही,

       आयुष्यभर पुरत नाही, 

       आधारासाठीही उरत नाही,

- पण त्याची सारी जीवनयात्रा

लेकरांच्या पायी असते,

     *म्हणून भांडताना नेहमी लक्षात ठेवा,*

     *बाबातही एक आई असते ।।*


तिची माया दिसते... प्रेम दिसते,

त्याचा फक्त त्रागा दिसतो !

वात्सल्याच्या पदराचा 

पण तोही घट्ट धागा असतो,

     काळजीपोटची दटावणी त्याची

     लेकरासाठी अंगाईच ठरते,

*तुमच्यासमोर रडत नसला, तरी*

*बाबातही एक आई असते ।।*


*Happy Father's Day*


*Hug your parents everyday, it's really very effective anti-depressant.*

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

 महिला कार्यकर्त्यांच्या सहभागाशिवाय सामाजिक विकास अपुरा

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

            कानपूर, दि. 19 : महिला सुरक्षेबाबत संवेदनशिलतेने पाऊले उचलण्यासाठी मार्गदर्शक यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. या विषयात स्त्री आधार केंद्र संस्थेच्या माध्यमातून 1996 ते 2010 या काळात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी स्त्री-पुरुष समानता आधारित प्रशिक्षण घेण्यात आली. सध्याही आम्ही पोलिस व महिला कार्यकर्त्यांच्या सहकार्याने काम करीत आहोत, अशा सक्रीय सहभागाशिवाय सामाजिक विकास प्रक्रिया अपूर्ण असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

            कानपूर स्थित समाजसेविका श्रीमती नीलम चतुर्वेदी यांच्या सखी केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व अधिकाऱ्यांच्या मदतीने एकूण 80 कार्यशाळा पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विहित कार्यप्रणाली ठरविणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. बलात्कार, अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडित महिलेचा जबाब कसा घ्यायचा. अशा आपत्तीमध्ये सापडलेल्या जर कोणी मूकबधिर, कर्णबधिर, विशेष अपंग महिला असेल तर त्यांची उत्तरे कोणत्या माध्यमातून मिळवायची, पोलिसांशी कसे बोलावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. या विहित कार्यप्रणाली तयार करण्याचे काम सुमारे दहा वर्ष चालले आणि आजही सुरु आहे. पोलिसांशी संवाद आणि सहकार्याने हे काम केले जात आहे. विधान परिषदेची रचना, कायद्याची माहिती आणि सहाय्यक कार्य, कायदेशीर सहाय्य, पर्यावरणीय बदल, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सेवा आणि महिला संस्थांचे व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. आंतरराज्य स्तरावर, महिला संस्थांचा संवाद आवश्यक आहे आणि ज्यांना महिला संस्थेच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले.

            सखी केंद्राच्या संचालिका नीलम चतुर्वेदी यांनी समाजातील विविध व्यक्ती जसे की, दिव्यांग जेष्ठ नागरिकांनी हिंसाचार पीडित महिलांसाठी सखी केंद्र कसे काम करत आहे याची माहिती दिली. सखी केंद्राने संकेतस्थळ व मोबाईल ॲप तयार केले आहे. सर्वांनी या ॲपच्या माध्यमातून संस्थेच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. महिला कार्यकर्त्यांनी कोविडच्या कामकाजाच्या काळात संस्थांना केलेल्या मदतीबाबत त्यांचे अनुभव कथन केले.

            श्रीमती जेहलम जोशी यांनी पर्यावरण बदलाविषयी आपले विचार मांडले. विकासाच्या सीमेपासून कोणालाही दूर ठेवू नये यासाठी काम करत असल्याचे सांगितले. तसेच स्त्री आधार केंद्र शाश्‍वत विकासाच्या उद्दिष्ट बद्दल कशा पद्धतीने काम करीत आहे याबाबत भूमिका सांगितली महिला कार्यकर्त्यांना तयार करण्याचे कामही स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून केले जाते.

            स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या भगिनी श्रीमती जेहलम जोशी सामाजिक कार्यकर्ता श्रीमती नीलम चतुर्वेदी, विधानपरिषदेचे उपसभापती यांचे विशेष कार्य अधिकारी सचिन चिखलकर व मोठ्या संख्येने स्थानिक महिला कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

0000

 

कामाठीपुरा येथील मुलींनी तयार केलेल्या पोस्टकार्ड्सचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

            मुंबई,दि.19 : मुंबईमधील कामाठीपुरा येथील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या 8 मुलींनी तयार केलेल्या सचित्र पोस्टकार्ड्सचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) राजभवन येथे करण्यात आले.

            मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे, प्रोजेक्ट मुंबईचे मुख्याधिकारी शिशिर जोशी, रुपेश सोनवाले तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

000

Governor releases Postcards created by the children of Kamathipura

 Maharashtra Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari released a set of Picture Postcards created by the children of sex workers of Kamathipura at Raj Bhavan, Mumbai.

The set of picture postcards were developed from the art work done by the children of the commercial sex workers of Kamathipura as part of an initiative of Swati Pandey, Postmaster General of Mumbai Region.

Shishir Joshi, CEO, Co-founder, Project Mumbai, Rupesh Sonawale, Director, Mumbai GPO and others were present.

0000


 

Featured post

Lakshvedhi