Sunday, 19 June 2022

बाप दीन

 *बाबातही एक आई असते ।।*

*जीवन संगीत*

*19 June - Happy Father's Day*


*आई छान, बाप बरा असतो*

*औषधासारखा कडू !*

*पण उपचार मात्र खरा असतो.*

       त्याला वेळ कमी मिळतो,

       त्याच्याशी मेळही कमी जुळतो,

व्यवहारात हुशार असला तरी,

भावनांचा खेळ त्याला कमीच कळतो.

     घरून निघायची असो 

     की पुन्हा घरी परतायची -

     त्याला सदैव घाईच असते,

कठोर-निष्ठुर चेहऱ्या पलीकडे, 

*बाबातही एक आई असते ।।*


नेहमी छातीशी धरणे त्याला जमत नाही,

प्रेमासाठी रडणे सोडा,

साधा दिखावाही करत नाही,

       आयुष्यभर पुरत नाही, 

       आधारासाठीही उरत नाही,

- पण त्याची सारी जीवनयात्रा

लेकरांच्या पायी असते,

     *म्हणून भांडताना नेहमी लक्षात ठेवा,*

     *बाबातही एक आई असते ।।*


तिची माया दिसते... प्रेम दिसते,

त्याचा फक्त त्रागा दिसतो !

वात्सल्याच्या पदराचा 

पण तोही घट्ट धागा असतो,

     काळजीपोटची दटावणी त्याची

     लेकरासाठी अंगाईच ठरते,

*तुमच्यासमोर रडत नसला, तरी*

*बाबातही एक आई असते ।।*


*Happy Father's Day*


*Hug your parents everyday, it's really very effective anti-depressant.*

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi