महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत
पुणे, अमरावती आणि नाशिकला जन सुनावणी
मुंबई, दि. 19: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुणे, अमरावती आणि नाशिक येथे जन सुनावणी आयोजित केली आहे. आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जनसुनावणी चा तपशील खालील प्रमाणे
अ.क्र. वभागाचे नावसुनावणी दिनांक व ठिकाणवेळ
सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती/जमातीचे नाव
1 पुणे 30 जून 2022
व्हि.व्हि.आय.पी. शासकीय विश्रामगृह, पुणे.दु. 2.00 वा पासून
1) सगर2) कडिया3) कुलवाडी4) टकारी5) लिंगायत रड्डी
2अमरावती05 जुलै 2022
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, अमरावती.
सकाळी 11.00 वा पासून
1) हलवाई2) हलबा कोष्टी3) अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर
4) गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार , गु.कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार इ.
5) हडगर
6) तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करणेबाबत
7) केवट समाजातील तागवाले/तागवाली
3नाशिक15 जुलै 2022जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक.सकाळी 11.00 वा पासून
1) काथार/कंठहारवाणी2) कंसारा
3) अत्तार जातीच तत्सम जात पटवे, पटवेगर, पटोदर
4) बैरागी जातीच्या संदर्भात शासन निर्णायात दुरुस्ती
5) चेवले गवळी दाभोळी, गवळी व लिंगायत गवळी
6) नावाडी
16 जुलै 2022जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक.
सकाळी 11.00 वा पासून
7) वळंजूवाणी, कुंकारी वळांजूवाणी, वळुंज बळुंज, शेटे, दलाल इ.8) लाडशाखीय वाणी9) लाडवंजारी
10) रामगडिया सिख11) कानडे/कानडी
0000
बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश
मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले अभिनंदन
मुंबई, दि. १९ : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत राज्यातील बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले आहे. यापैकी ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.
मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, बालगृहातील या विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत उज्ज्वल यश संपादन केले आहे, याचा मला अभिमान आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. बालगृहातील विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा, सुरक्षित वातावरण व कौटुंबिक प्रेम देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. बालगृहातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी विभागामार्फत नेहमीच घेतली जाते. या मुलांना शिक्षणासाठी मदत व मार्गदर्शनही विभागामार्फत केले जाते.
राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे पाठविली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात दाखल करण्यात येते. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते, असे मंत्री ॲड.ठाकूर यांनी सांगितले.
राज्यात पुणे विभागातील बालगृहातील सर्वाधिक १८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून औरंगाबाद विभाग १०१ विद्यार्थी, कोकण विभाग ९८ विद्यार्थी, नाशिक विभाग ६१ विद्यार्थी, अमरावती विभाग ५१ विद्यार्थी, नागपूर विभाग ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० टक्के गुण मिळविले आहेत. १०५ विद्यार्थ्यांनी ७५ ते ८५ टक्के गुण मिळविले आहेत. १५२ विद्यार्थ्यांनी ६५ ते ७५ टक्के गुण मिळविले आहेत.
0000
No comments:
Post a Comment