Saturday, 18 June 2022

प्रशिक्षण

 जालना शासकीय आयटीआयमध्ये4 नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु

- मंत्री राजेश टोपे यांची माहिती

· नवीन तंत्रज्ञानावर आधारीत तसेच औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार अभ्यासक्रम सुरु करण्यास प्राधान्य.

            मुंबई, दि. १७ : जालना येथील तालुकास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) सन २०२२-२३ या वर्षापासून ४ नवीन व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली. नवीन तंत्रज्ञानावर आधारीत औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार या आयटीआयमध्ये आयओटी टेक्निशियन (स्मार्ट सिटी), आयओटी टेक्निशियन (स्मार्ट हेल्थ केअर), ड्रोन टेक्निशियन व सोलर टेक्निशियन या ४ नवीन अभ्यासक्रमांच्या ४ तुकड्या सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 


            मंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मोठा सहभाग आहे. जागतिक दर्जाचे व व्यवसायाभिमुख, आस्थापनांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मोठा वाटा आहे. आर्थिक उदारीकरणामुळे राज्यात औद्योगिकरण वेगाने वाढत आहे. औद्योगिक तंत्रज्ञान उत्पादनाच्या बदलत्या प्रक्रियामुळे उद्योगधंद्यांना कुशल मनुष्यबळाची गरज वाढत आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करणेही गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


            जालना आयटीआयमध्ये आजमितीस १५ व्यवसायाच्या २८ तुकड्या कार्यरत असून संस्थेत एकूण ६०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सद्यस्थितीत मराठवाड्यात सौरउर्जेवर आधारीत व अनुषंगिक कामांशी निगडीत औद्योगिक आस्थापनांना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. स्थानिक गरजा व औद्योगिक आस्थापनांची मागणी लक्षात घेता तसेच रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असलेल्या या ४ नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या जालना आयटीआयमध्ये सुरु करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्याचे कौशल्य विकसित करुन रोजगार निर्मिती करण्यासाठी मदत होऊ शकेल, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.


            या ४ नव्या अभ्यासक्रमाची प्रत्येकी १ तुकडी चालू शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याचे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.



प्रशिक्षण

 घनसावंगी शासकीय आयटीआयमध्ये

4 नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता


- कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे

नवीन तंत्रज्ञानावर आधारीत तसेच औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार अभ्यासक्रम.

            मुंबई, दि. १७ : घनसावंगी (जि. जालना) येथील तालुकास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) सन २०२२-२३ या वर्षापासून ४ नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली. नवीन तंत्रज्ञानावर आधारीत औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार या आयटीआयमध्ये रीमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट (पीपीए)/ड्रोन पायलट, स्मार्ट फोन टेक्निशियन कम ऍप टेस्टर, सोलर टेक्निशियन व मशिनिस्ट या ४ नवीन अभ्यासक्रमांच्या ५ तुकड्या सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 


            मंत्री श्री. टोपे म्हणाले की, राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मोठा सहभाग आहे. जागतिक दर्जाचे व व्यवसायाभिमुख, आस्थापनांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मोठा वाटा आहे. आर्थिक उदारीकरणामुळे राज्यात औद्योगिकरण वेगाने वाढत आहे. औद्योगिक तंत्रज्ञान उत्पादनाच्या बदलत्या प्रक्रियेमुळे उद्योगधंद्यांना कुशल मनुष्यबळाची गरज वाढत आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करणेही गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


            घनसावंगी आयटीआयमध्ये आजमितीस ५ व्यवसायाच्या १० तुकड्या कार्यरत असून संस्थेत एकुण २१६ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. जालना जिल्हा औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असून स्टील कॅपीटल म्हणून ओळखला जातो. जालना जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करुन रोजगार निर्मिती करण्यासाठी घनसावंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे भविष्यातील विकासाचा व आधुनिक जगाशी सुसंगत अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असलेल्या ०४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या नविन तुकड्या या संस्थेसाठी निवडण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने गरजू विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करुन रोजगार निर्मिती करण्यासाठी ज्यादा मागणीचे नवीन व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरु करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याचे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

            रीमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट (पीपीए)/ड्रोन पायलट, स्मार्ट फोन टेक्निशियन कम ऍप टेस्टर आणि सोलर टेक्निशियन या ३ नव्या अभ्यासक्रमाची प्रत्येकी १ तुकडी तर मशिनिस्ट अभ्यासक्रमाच्या २ तुकड्या चालू शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याचे मंत्री

श्री. टोपे यांनी सांगितले.

जागा चिकुवणी

 शुभ सकाळ ...

*चिक्कूची बी फळात राहूनही, फळ पक्व झालं की त्यातून अलगद बाहेर पडते, अगदी स्वच्छपणे.*


*आंब्याची कोय मात्र, आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते, फळ पिकले तरी, रसातून अलग होत नाही. परिणाम तिलाही लोक पूर्ण चोखल्याशिवाय फेकत नाहीत.*


*म्हणून, चिकूच्या बी सारखं वागावं, सगळ्या मोहजालात राहूनही योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं. कोयीसारखं माया रूपी रसात गुरफटून रहाल, तर लोक मात्र पिळून फेकल्याशिवाय राहणार नाहीत, पिळायच्या आधीच बाहेर पडावं!*


*आयुष्यात कधीच हा विचार करत बसु नका कि कोण कसा कधी कुठे आणि का बदलला, फक्त हे बघा कि तो तुम्हाला काय शिकवून गेला.*

शुभसकाळ


माय

 ☝️हरीण गरोदर असल्याची कल्पना मगरीला तिच्या थरथरत्या पोटावरुण आली, आणि भक्ष म्हणुन धरलेले हरीण मगरीने सोडून दिले, माणसातली माणुसकी संपत चालली असताना, . . .पशू मधली ही भाव


ना खूप काही शिकवून जाते,. . . .😔👍🏻

Friday, 17 June 2022

भवताल

 भवताल कट्टा ४६ (आज सायंकाळी)

विषय :

३००० वर्षांपूर्वीच्या महापाषाण संस्कृतीचा पुनर्शोध

(माणसाला मृत्यूनंतरच्या जगाबाबतचे कुतूहल पूर्वापार आहे. त्यातूनच ३००० वर्षांपूर्वी आवडती व्यक्ती किंवा समूहातील प्रमुखाच्या मृत्यूची आठवण म्हणून दगडी स्मारके उभी केली जात. जगभरातील ही प्रथा महाराष्ट्रातही आढळते. विशेष म्हणजे ही प्रथा वेगळ्या रूपात आजही पाळली जाते. त्याचाच पुनर्शोध घेणारा कट्टा...)

वक्ते :

अमित भगत

पुरातत्व विज्ञानाचे अभ्यासक

शुक्रवार, १७ जून २०२२; सायं. ७ ते ८.३०

सहभागासाठी झूम लिंक :

https://bit.ly/3QnvLRT

किंवा

भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह,

पेजची लिंक :

https://facebook.com/bhavatal

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 आपत्ती कालावधीत आधार ठरलेली शिवभोजन योजना

 

           राज्यातील गरीब व गरजू घटकांकरिता  सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध  करण्यासाठी 'शिवभोजन योजना२६ जानेवारी २०२० पासून सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत दहा कोटी  शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आले आहे.या योजनेचा आढावा घेणारा लेख ......

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली  'शिवभोजन योजनामहाविकास आघाडी शासनाची अत्यंत  महत्वकांक्षी योजना आहे.राज्यातील कोणीही अन्नाविना उपाशी राहू नयेगरीब आणि गरजू जनतेला माफक दरात अन्न उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू झालेली 'शिवभोजन योजनाही अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.गेल्या दोन वर्षात आलेल्या नैसर्गिक संकटात शिवभोजन योजनेमुळे गरजू नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना कालावधीत किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.

           शिवभोजन योजनेंतर्गत १० रूपये प्रति थाळी याप्रमाणे भोजन उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये दोन चपात्याएक वाटी भाजीएक वाटी वरण व एक मृद भात याचा समावेश  आहे. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी ५० रूपये व ग्रामीण भागामध्ये ३५ रूपये एवढी असून प्रति ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या १० रूपये एवढ्या रकमेच्या व्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून शासनाकडून भोजनालय चालकास देण्यात येते.

             'शिवभोजन योजनासुरू झाल्यापासून ०८ जून २०२२ पर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 10 कोटी 71 हजार 959 थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 15 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2021 या काळात वितरित केलेल्या 2 कोटी 70 लाख 51 हजार 472  मोफत थाळ्यांचा समावेश आहे.

             शिवभोजन योजनेतंर्गत राज्यात  प्रतिदिन २.०० लाख एवढ्या शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात येत आहे. कोरोना काळात एकूण ९१३ नवीन शिवभोजन केंद्रांना मंजूरी देण्यात आली असून ३८ कार्यरत शिवभोजन केंदांच्या थाळीसंख्येत वाढ करण्यात आली आहे. सध्या राज्यात १,५२८ शिवभोजन केंद्र कार्यान्वित आहेत.

                शिवभोजन योजना कार्यान्वित करण्यासाठी "शिवभोजन अॅप्लिकेशन" तयार करण्यात आले आहे.  या ॲपचा वापर करुनच शिवभोजन थाळी वितरित करणे बंधनकारक आहे. शिवभोजन थाळ्या वितरित करण्यापूर्वी लाभार्थींचे नाव व छायाचित्र घेण्यात येतो.तर फोन नंबर वैकल्पिक आहे.या अॅपवर शिवभोजन केंद्र चालकास रोजचा मेन्यू प्रसिद्ध करता येतो.

          कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे  मजूरस्थलांतरीतबेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थ्यांचे जेवणाअभावी हाल-अपेष्टा होत असल्याने दि. २९ मार्चच्या आदेशान्वये दि. १४ एप्रिल २०२१ पर्यंत शिवभोजन थाळी लाभार्थींना ५ रूपये मध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. या कालावधीत एकूण ३ कोटी ६८ लाख १० हजार ७७९ शिवभोजन थाळ्या वितरित करण्यात आल्या आहेत.

           कोरोना कालावधीत शासनाने कडक निर्बंध लागू केल्याने गरीब व गरजू जनतेचे जेवणाअभावी हाल होऊ नये म्हणून १५ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण २ कोटी ७० लाख ५१ हजार ४७२ एवढ्या शिवभोजन थाळ्या लाभार्थींना निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात विविध भागात जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. महापुरामुळे रायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग,सातारासांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आपत्तीग्रस्त भागातील शिवभोजन केंद्रावर दुप्पट क्षमतेने शिवभोजन  थाळीचे वितरण केले गेले. पूरग्रस्तांना पूर कालावधीत सव्वादोन लाख शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आले  होते.दि. ०१ ऑक्टोबर २०२१ पासून शिवभोजन थाळीचा दर पूर्वीप्रमाणे १० रूपये प्रतिथाळी एवढा करण्यात आला आहे.

          राज्यात शिवभोजन योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच कार्यरत शिवभोजन केंद्रांवर परिणामकारक नियंत्रण ठेवण्याकरीता राज्यातील सर्व शिवभोजन केंद्रांमध्ये सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व शिवभोजन केंद्रांच्या १०० मीटर परिघामध्ये जिओ फेन्सिंग सुविधाही दि. २२ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे शिवभोजन केंद्रचालकांना केंद्राच्या १०० मीटर परिघामध्येच शिवभोजन योजनेचे व्यवहार करता येतात.

        शिवभोजन योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत या योजनेवर  ३३४ कोटी रूपये एवढा खर्च झाला आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात या योजनेसाठी २२० कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे.


 भुकेलेल्यांची भूक भागवणारी क्रांतिकारक योजना : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

              राज्यातील गरीब व गरजूंना किमान एक वेळ सवलतीच्या दरात पोटभर जेवण मिळावे यासाठी महाविकास आघाडी शासनाने सुरू केलेली 'शिवभोजन योजनाक्रांतिकारक ठरली आहे.आजपर्यंत दहा कोटी गरजूंनी या शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे लागू केलेली टाळेबंदी कालावधीत आणि जुलै २०२१ मध्ये  आलेल्या नैसर्गिक संकटाच्या कालावधीत शिवभोजन  थाळींचे मोफत वितरण करण्यात आले होते त्यामुळे गरजूंना मोठा दिलासा  मिळाला होता.राज्यातील गरीब व गरजूंना सवलतीच्या दरात पोटभर जेवण देण्याचा शासनाचा निर्धार आहे. अन्न,नागरी पुरवठा विभाग सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम  राबविल्यामुळे ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.

शिवभोजन योजनेला चांगला प्रतिसाद हेच या योजनेचे यश आहे 

- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात सुरू असलेली 'शिवभोजन योजनाही महाविकास आघाडी सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. राज्यातील गरीब व गरजूंना किमान एक वेळ सवलतीच्या दरात पोटभर जेवण मिळावे,या उद्देशाने राज्य सरकारने २०२० साली शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे.आजपर्यंत या योजनेतून दहा कोटी गरजू जनतेने या शिवभोजन थाळी योजनेचा लाभ घेतला आहे.टाळेबंदी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत या योजनेमुळे गरजूंना दिलासा मिळाला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिवभोजन केंद्रांमध्ये सी.सी.टी.व्ही. यंत्रणाशिवभोजन केंद्रांच्या १०० मीटर परिघामध्ये जिओ फेन्सिंग सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालविण्यास देताना महिला बचत गटांचा प्राधान्याने विचार करण्यात येत आहेत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी काटेकोरपणे कामाचे सनियंत्रण करण्यात येत आहेत. ही योजना अधिक चांगल्या प्रकारे सुरू रहावीयासाठी नवीन उपाययोजना करण्यात येत आहेत.

Featured post

Lakshvedhi