भुकेलेल्यांची भूक भागवणारी क्रांतिकारक योजना : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यातील गरीब व गरजूंना किमान एक वेळ सवलतीच्या दरात पोटभर जेवण मिळावे यासाठी महाविकास आघाडी शासनाने सुरू केलेली 'शिवभोजन योजना' क्रांतिकारक ठरली आहे.आजपर्यंत दहा कोटी गरजूंनी या शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे लागू केलेली टाळेबंदी कालावधीत आणि जुलै २०२१ मध्ये आलेल्या नैसर्गिक संकटाच्या कालावधीत शिवभोजन थाळींचे मोफत वितरण करण्यात आले होते त्यामुळे गरजूंना मोठा दिलासा मिळाला होता.राज्यातील गरीब व गरजूंना सवलतीच्या दरात पोटभर जेवण देण्याचा शासनाचा निर्धार आहे. अन्न,नागरी पुरवठा विभाग सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यामुळे ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.
शिवभोजन योजनेला चांगला प्रतिसाद हेच या योजनेचे यश आहे
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात सुरू असलेली 'शिवभोजन योजना' ही महाविकास आघाडी सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. राज्यातील गरीब व गरजूंना किमान एक वेळ सवलतीच्या दरात पोटभर जेवण मिळावे,या उद्देशाने राज्य सरकारने २०२० साली शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे.आजपर्यंत या योजनेतून दहा कोटी गरजू जनतेने या शिवभोजन थाळी योजनेचा लाभ घेतला आहे.टाळेबंदी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत या योजनेमुळे गरजूंना दिलासा मिळाला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिवभोजन केंद्रांमध्ये सी.सी.टी.व्ही. यंत्रणा, शिवभोजन केंद्रांच्या १०० मीटर परिघामध्ये जिओ फेन्सिंग सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालविण्यास देताना महिला बचत गटांचा प्राधान्याने विचार करण्यात येत आहेत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी काटेकोरपणे कामाचे सनियंत्रण करण्यात येत आहेत. ही योजना अधिक चांगल्या प्रकारे सुरू रहावी, यासाठी नवीन उपाययोजना करण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment