Friday, 17 June 2022



 सहस्त्रचंद्र दर्शनानिमित्त विविध मान्यवरांकडून राज्यपालांचे अभिष्टचिंतन.

          मुंबई, दि. 17 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 17) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांसह विविध मान्यवरांनी राज्यपालांचे अभिष्टचितंन केले. राष्ट्रपतींनी दूरध्वनी करुन तसेच पत्राव्दारे राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

          उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबांळकर, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार मंगल प्रभात लोढा आदींनी राज्यपाल कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना सहस्त्रचंद्रदर्शन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

          सकाळी राज्यपालांनी वाढदिवसानिमित्त सिध्दीविनायक मंदिरात जाऊन विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले.

          केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, आंध्रप्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय राज्यमंत्री अजय भट, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दूरध्वनीवरुन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

००००

President of India, Dy CM, Leader of Opposition greet Governor Koshyari on 80th birthday

          Mumbai 17 : President of India Ram Nath Kovind called up Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari and greeted him on the latter's birthday on Friday (17 June).

          Deputy Chief Minister Ajit Pawar, Leader of the Opposition Devendra Fadnavis, Chairman of Maharashtra Legislative Council Ramraje Naik Nimbalkar, MP Praful Patel, MLA Mangal Prabhat Lodha were among those called on the Governor at Raj Bhavan and wished him on his 80th birthday.

          Governor of Kerala Arif Mohammed Khan, AP Governor Biswabhusan Harichandan, Uttarakhand CM Pushkar Singh Dhami, Minister Dhananjay Munde, former MP Vijay Darda and many others telephoned the Governor or wished him through various platforms.

00000



 

 आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दहावी उत्तीर्णांचे अभिनंदनपुढच्या वाटचालीस शुभेच्छा

 

            मुंबईदि. 17 :- दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

            " शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहेया यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करिअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रं खुणावत असतील. त्यामध्ये उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि डोळसपणे पावले टाका. अभ्यासात मेहनतीची तयारी ठेवायश निश्चितच मिळेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!"असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

0000


 

वृत्त क्र. 1828

राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

 

            मुंबईदि. 17 : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपली आवडकल बघून पुढील शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावीपरीक्षेतील यशाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न करावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात केले आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतातयंदा 96.94 टक्के विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असला तरी अंतिम साध्य नाहीत्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होताखचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शैक्षणिक कारकिर्दीच्या बरोबरीने आपले व्यक्तिमत्व अष्टपैलूसर्वांगसुंदर घडविण्याचा प्रयत्न करावा. शैक्षणिक कारकिर्द ठरवण्यासाठी योग्य शाखा निवडण्याचा दहावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कलाक्रीडाछंद आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांची आवडकल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावाअसेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.

*****


 


 ग्रासलॅण्ड विकसित करा


            मानव वन्यजीव संघर्ष घडत असलेल्या संरक्षित वनाच्या बफर क्षेत्रात ग्रास लॅण्ड वाढवण्याचे प्रयत्न झाल्यास तृणभक्षी प्राणी शेताकडे येण्याचे व त्यांच्या पाठोपाठ वन्यजीवांचे मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी होईल याबाबीकडे मुख्यमंत्र्यांनी वनाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

सामाजिक दायित्व

            विकास कामांसाठी वन जमीन वळती करतांना ज्या पर्यायी ठिकाणी वृक्षलागवडीची अट घालण्यात आलेली असते त्या ठिकाणी प्रत्यक्षात वृक्षलागवड होते का, झाल्यास त्याची स्थिती काय असते यासंबंधीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी वन विभागाला दिल्या. कंपन्यांच्या सामाजिक दायित्वातून वृक्षलागवडीसाठी निधी, मनुष्यबळ तसेच इतर संसाधनांच्या उपलब्धतेसाठी सहकार्य मिळवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबाद इको बटालियन ने लावली ६६२ हेक्टरवर झाडं

            औरंगाबाद इको बटालियन ने मागील पाच वर्षात ६६२ हेक्टरक्षेत्रावर जवळपास ८ लाख ७१ हजार ४७७ झाडे लावली असून ही रोपे जगण्याचे प्रमाण सरासरी ८९.५४ टक्के इतके असल्याची माहिती कर्नल मन्सुर अली खान यांनी यावेळी दिली. आजघडीला इको बटालियनने स्वत: तयार केलेल्या रोपवनामध्ये २.५० लाख रोपे तयार असल्याचेही ते म्हणाले. इको बटालियन मधील सैनिक रोप लागवडीपासून त्यांच्या संरक्षणापर्यंतची काळजी घेत असल्याने वृक्ष जगण्याचे प्रमाण अधिक आहे. हे काम करत असतांना त्यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या वन्यजीव संरक्षणाचेही काम होत असल्याचे ते म्हणाले.

            ठाणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद वनवृत्तामध्ये, राजगड, रायगड, शिवनेरी किल्ल्याच्या सभोवताली गेल्या पावसाळ्यात हवाई बीज पेरणी अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती बैठकीत देण्यात आली.

0000

 महाराष्ट्रातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी अतिरक्त दोन इको बटालियनची केंद्राकडे मागणी

मराठवाडा इको बटालियनला पाच वर्षांची मुदतवाढ

महापालिका क्षेत्रात मियावाकी वन विकसित करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

            मुंबई, दि. १७ : राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण २० टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या सहकार्यातून वृक्षलागवड करून हरित क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न करण्याच्या दृष्टीने औरंगाबाद येथील पहिल्या इको बटालियन कंपनीस आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी, तसेच अतिरक्त दोन इको बटालियन कंपनीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचा  तातडीने पाठपुरावा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. इको बटालियनच्या माध्यमातून राज्यातील निवृत्त माजी सैनिकांना रोजगार प्राप्त होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            आज मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानातील समिती कक्षात इको बटालियन च्या कामाचा आढावा घेतला. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटेमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीनवी दिल्लीचे प्रादेशिक सेना महासंचालक लेफ्टनंट जनरल पी. एम. सिंगऔरंगाबादच्या इको बटालियनचे  कमांडिंग ऑफीसर प्रादेशिक सेनेचे (इकॉलॉजी) कर्नल मन्सुर अली खानयांच्यासह वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री पुढे म्हणालेपावसाची अनियमितता लक्षात घेऊन इको बटालियन ने लावलेली ही झाडं पाच वर्षांनंतर कशी जगवता येतील, याचे नियोजन वन विभागाने करावे.

हवाई बीज पेरणी

            वृक्षांची हवाई बीज पेरणी करतांना जिथे लोकांचे येणे जाणे कमी आहेनैसर्गिकरित्या त्या बीजाला आणि रोपांना पाणी मिळू शकेल,  पुरेशी  माती उपलब्ध असेल अशी स्थळे निवडण्यात यावीत. ज्या डोंगरावर वरच्या बाजूला सपाट जागा उपलब्ध आहे तिथे छोटे तळे घेऊन पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवता येईल का याचा वन विभागाने विचार करावा, जेणेकरून डोंगरावर लावलेल्या रोपांना सोलर पंपाच्या सहाय्यानेसुक्ष्म‍ सिंचन पद्धतीने पावसाळ्यानंतरही पाणी देता येऊ शकेल. वन विभागाने यावर्षी त्यादृष्टीने असा पथदर्शी कार्यक्रम तयार करून अंमलात आणावा.

            डोंगरांवर पूर्वी सलग समतल चर खोदून पाणी अडवण्याची व्यवस्था केली जात असे. जलसंधारण आणि रोजगार हमी विभागाबरोबर वन विभागाने संरक्षित वन क्षेत्रात असे सलग समतल चर खोदण्याची कामे मोठ्याप्रमाणात हाती घ्यावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

स्थानिक प्रजातींची रोपे लावा

            हवाई बीज पेरणी असोइको बटालियन मार्फत करण्यात येणारी वृक्षलागवड असो किंवा वन विभाग आणि लोकसहभागातून होणारी वृक्षलागवड असो ती करतांना स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करावी. ही लागवड करतांना पक्ष्यांची अन्नसाखळी विकसित होईल यादृष्टीने जाणीवपूर्वक लक्ष दिले जावे.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

            आपण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या रंगांचीफुलांची झाडं फुलतांना पहातो.  महाराष्ट्रातील अशा काही डोंगर रांगामध्ये वृक्षलागवड करतांना अशा स्थानिकरित्या फुलणाऱ्या विविध रंगांच्या वृक्षांचीविविध फुलांच्या वृक्षांची व्हॅलीतयार करता येऊ शकेल का याचाही वन विभागाने अभ्यास करावा. असे करतांना येथेही पक्ष्यांची अन्नसाखळी अबाधित राहीलतिथे वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर वाढेल हे पहावे.

महापालिका क्षेत्रात मियावाकी वन विकसित करा

            शहरामधील हरित क्षेत्र वाढवण्याच्यादृष्टीने सामाजिक वनीकरण विभागामार्फत प्रत्येक महापालिका क्षेत्रात जागेच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त जागांवर मियावाकी वन विकसित करावे असे निर्देशही त्यांनी दिले.

 पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

            मुंबई, दि १७ : देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले

            आज पोहरादेवी येथील महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामध्ये महंत बाबू सिंग राठोड त्याचप्रमाणे मेहताब सिंग नाईक, ॲड अभय राठोड, पोपट चव्हाण व बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे काम रखडता कामा नये. वेळच्या वेळी यासाठी निधी दिला जात असला तरी कालबध्दरितीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

            यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आदींची उपस्थिती होती

 राज्यात कौशल्यरोजगार निर्मितीउद्योजकतेबरोबर नाविन्यतेस मिळणार चालना

जिल्ह्यांमध्ये कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती

- मंत्री राजेश टोपे

            मुंबईदि. १७ : राज्यात कौशल्यरोजगारउद्योजकतेबरोबर नाविन्यतेस प्रोत्साहन देण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती’ स्थापन करण्यात येत असल्याची माहिती कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

            संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपाध्यक्ष असतील. त्याचबरोबर महापालिका आयुक्त किंवा नगरपालिकेचे मुख्याधिकारीजिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकजिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापककृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधीस्थानिक आयटीआयचे प्राचार्य याबरोबरच माविम आणि उमेद अभियानाचे प्रतिनिधीखाजगी इन्क्युबेशन सेंटरचे प्रतिनिधीजिल्ह्यातील मान्यताप्राप्त स्टार्टअपचे प्रतिनिधीउद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आदी सदस्य या समितीवर असतील. जिल्हा कौशल्यरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असतील. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहेअसे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

            जिल्ह्याचा कौशल्य विकास आराखडा आणि नवीन संकल्पनांचा आराखडा तयार करून त्याची  प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या समितीची राहील. उद्योगकेंद्रित कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आणि नवउद्योजक घडविणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट्य असेल.

             त्याचबरोबर स्टार्टअप्स परिसंस्थेचा विकास करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातआयटीआयमध्ये नाविन्यता कक्षाची स्थापना करुन त्याद्वारे जिल्ह्यातील नवउद्योजक तसेच स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्यात येईल. जिल्ह्याच्या खरेदी प्रक्रियेत स्टार्टअप्सना प्राधान्य देण्यास सहकार्य करण्यात येईल. स्टार्टअप्सना क्वालिटी टेस्टिंगपेटंटसाठी सहाय्य करण्यात येईल. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात महिला उद्योजकता कक्षाची स्थापना करण्यात येवून त्याद्वारे सर्व स्तर व वयोगटातील महिलांना उद्योजकतेसाठी मार्गदर्शन व आवश्यक ते सहाय्य करण्यात येईल. जिल्ह्यामध्ये कौशल्य व रोजगाराभिमुख तसेच नाविन्यतेच्या योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीसंस्थांना ही समिती सन्मानपत्र प्रदान करुन त्यांचा गौरव करेल.

            मोठ्या उद्योगांशी चर्चा करुन त्याप्रमाणे आयटीआयमध्ये सुसंगत प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम लागू करणेकामगार बाजाराचा कल ओळखणेरोजगाराची मागणी आणि पुरवठा यांचा आढावा घेणेग्रामीण स्तरावरील स्थानिक कौशल्ये तसेच नवीन संकल्पना शोधून त्यांना प्रोत्साहन देणेमहिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणीसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करणे असे विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात या समितीकडून नियोजन करण्यात येईल. समितीची दर महिन्याला बैठक घेण्याबाबत सूचीत करण्यात आले असल्याचे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

००००


 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडे

प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

            मुंबई, दि. 17 : राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन योजना व मानधन वाढ करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

            अंगणवाडी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळासोबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.

            मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अंगणवाड्यांची संख्या जास्त आहे. आपण दरवर्षी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट देतो. कोविड काळात मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रूपयाचे सानुग्रह अनूदान दिले. महिला व बालविकास विभाग अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेहमीच पाठीशी असतो. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना सबंधिताना मंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिल्या.

            या बैठकीस एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रूबल अग्रवाल, उपसचिव वि. रा. ठाकूर, एकात्मिक बाल विकास उपायुक्त गोकुळ देवरे, उपायुक्त विजय क्षीरसागर, अंगणवाडी कर्मचारी समितीचे एम. ए. पाटील, राजेश सिंह, निशा शिवूरकर, विजया सांगळे, अनिता कुलकर्णी, अरूणा अलोणे, माया पवार, चंदा लिगरवार, हुकुमताई ठमके उपस्थित होते.

00000



Featured post

Lakshvedhi