Friday, 17 June 2022

 आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दहावी उत्तीर्णांचे अभिनंदनपुढच्या वाटचालीस शुभेच्छा

 

            मुंबईदि. 17 :- दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

            " शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहेया यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करिअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रं खुणावत असतील. त्यामध्ये उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि डोळसपणे पावले टाका. अभ्यासात मेहनतीची तयारी ठेवायश निश्चितच मिळेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!"असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

0000


 

वृत्त क्र. 1828

राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

 

            मुंबईदि. 17 : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपली आवडकल बघून पुढील शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावीपरीक्षेतील यशाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न करावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात केले आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतातयंदा 96.94 टक्के विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असला तरी अंतिम साध्य नाहीत्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होताखचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शैक्षणिक कारकिर्दीच्या बरोबरीने आपले व्यक्तिमत्व अष्टपैलूसर्वांगसुंदर घडविण्याचा प्रयत्न करावा. शैक्षणिक कारकिर्द ठरवण्यासाठी योग्य शाखा निवडण्याचा दहावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कलाक्रीडाछंद आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांची आवडकल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावाअसेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.

*****


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi