Friday, 10 June 2022

बोंबाबोब


 

कौशल्य

 सोलापूर जिल्ह्याला प्रशस्तीपत्र

            देशभरातून एकूण ९ जिल्ह्यांना या स्पर्धेंतर्गत ‘प्रशस्तीपत्र पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले. या श्रेणीत सोलापूर जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

            श्री. शंभरकर यांनी सांगितले, वर्ष २०२०-२१ चा जिल्हा कौशल्य नियोजन आरखडा तयार करून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. मेडीकल हब म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख असून महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून जिल्ह्यात रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. ही बाब लक्षात घेवून रुग्णांना गुणवत्तापूर्ण औषधोपचार देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. केळी, द्राक्ष प्रक्रियाविषयक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. तसेच ऑनलाईन सॉफ्टस्कील प्रोगाम यशस्वीपणे राबविण्यात आल्याचेही श्री शंभरकर यांनी सांगितले.

              या स्पर्धेत देशभरातील ४६७ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाने पुरस्कार निवडीसाठी दिल्ली आणि खरगपूर आयआयटीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली होती. 

००००



कौशल्य विकास

 महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची केंद्राच्या ‘कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत’ मोहरमहाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार प्रदान

            नवी दिल्ली, दि. 9 : केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत (२०२०-२१)’ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाच जिल्ह्यांनी बाजी मारली. सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम आणि सोलापूर या विजयी जिल्ह्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज येथे गौरविण्यात आले.

                 येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सभागृहात केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते‘ जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे’ (२०२०-२१) पुरस्कार प्रदान करण्यात आले. मंत्रालयाच्या सहसचिव अनुराधा वेमुरी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य नियंत्रण अधिकारी वेदमनी तिवारी यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६७ जिल्ह्यांतून विजयी ठरलेल्या ३० जिह्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये या यावेळी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना तीन श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ‘उत्कृष्टता पुरस्कार’

           ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत’ देशभरातून एकूण 8 जिल्ह्यांना ‘उत्कृष्टता पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले. यात सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

         पुरस्कार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना शेखर सिंह म्हणाले, उत्कृष्टता पुरस्कार श्रेणीत निवड झालेल्या देशातील ८ जिल्ह्यांमध्ये सातारा पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आहे. पुरस्काराचा मनस्वी आनंद असून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात मोलाचा वाटा आहे. कोविड महामारीच्या काळात केंद्र आणि राज्यशासनाच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जवळपास १ हजार कोविड फ्रंटलाईन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. साहसी खेळ, ग्रामीण व कृषी पर्यटनासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली. कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रिया आणि कातकरी समाजातील लोकांना येत्या काळात कौशल्य प्रशिक्षण देण्याचा तसेच ग्रामीण व कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

              श्रीमती मंजूलक्ष्मी म्हणाल्या, राज्य कौशल्य विकास विभाग, जिल्हा कौशल्य विकास केंद्र आणि जिल्ह्यातील बचतगटांच्या उत्तम कार्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बचतगटांच्या महिलांना आदरातिथ्य क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात आले. मालवण आणि वेंगुर्ला भागातील न्याहरी निवासांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच मत्स्यव्यवसाय, आंबा, काजू आणि बांबुवरील प्रक्रिया उद्योगाबाबत विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्याचे श्रीमती मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.

ठाणे आणि वाशिम जिल्ह्यांना उत्कृष्टता प्रमाणपत्र

                   या स्पर्धेंतर्गत देशभरातून एकूण १३ जिल्ह्यांना ‘उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले. यात ठाणे आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे आणि वाशिम जिल्ह्याच्या त्यांच्या समकक्ष सुनंदा बजाज यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

             श्रीमती जावळे म्हणाल्या, ठाणे जिल्हा हा महानगर परिक्षेत्रात येतो व जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के लोकसंख्या ही १५ ते ३० वयोवर्ष गटातील तरुणांची आहे. त्यामुळे तरुणांना केंद्रस्थानी ठेवून विविध कौशल्य कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. ठाणे जिल्ह्यात शहरी, ग्रामीण आणि आदिवासी अशा तिन्ही स्तरातील महिलांचे वास्तव्य आहे अशा महिलांचे स्थलांतर थांबविण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. येत्या काळात जिल्ह्यातील तृतीयपंथींयासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

        श्रीमती बजाज म्हणाल्या, वाशिम हा आकांक्षी जिल्हा असल्याने व येथील बहुतांश उद्योग हे शेतीआधारित असल्याने जिल्हा कौशल्य नियोजन आराखडयात यासंबधी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यातून ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ जात असल्याने बांधकाम क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. केंद्रशासनाच्या ‘संकल्प’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिलांसाठी बेकरी, पाककला आणि शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

कला विद्यापीठ

 कला विद्यापीठासाठी सांघिक भावनेने काम करण्याची गरज

- मंत्री उदय सामंत

            मुंबई, दि. 9 : सर ज. जि. कला महाविद्यालयाची ख्याती आणि आकर्षण इतर राज्यांना आहे. या महाविद्यालयाचे उपकेंद्र त्यांच्या राज्यात व्हावे अशी मागणी इतर राज्यांकडून होत असतांना महाविद्यालयाची ख्याती टिकवून ठेवण्याची आणि कलाकारांच्या कलाकृती जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. या महाविद्यालयाचे रुपांतर कला विद्यापीठात व्हावे यासाठी सांघिक भावनेने काम केले पाहिजे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

            सर ज. जि. कला महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कलाकार, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याला संबोधित करताना मंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष उत्तम पाचर्णे, प्र. कला संचालक प्रा. विश्वनाथ साबळे, माजी अधिष्ठाता प्रा. विनोद मानकर, ज्येष्ठ चित्रकार प्रकाश, भिसे, विख्यात चित्रकार रवी मंडलिक, प्राचार्य फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल तांबे आदी संघटनांचे अध्यक्ष, अधिकारी- कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले की, या कला महाविद्यालयाचे रूपांतर कला विद्यापीठात होण्यासंदर्भात अनेकांमध्ये गैरसमज, संभ्रम निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे हा गैरसमज आणि संभ्रम दूर होणे गरजेचे आहे. सर ज. जि. कला महाविद्यालयाचे रूपांतर कला विद्यापीठात व्हावे याचा सामोपचाराने निर्णय होणे गरजेचे आहे. राज्यात कला विद्यापीठ व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कलाप्रेमी असल्याने त्यांनीही कला विद्यापीठाबाबत सकारात्मक बैठक घेवून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. कला शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी हा केंद्रबिंदू असला पाहिजे. चांगले विद्यार्थी घडविल्यास आपोआपच विद्यालयासह शासनाचेही कौतुक केले जाते. त्यामुळे या विद्यापीठाचा फायदा कोणाला होणार याचाही विचार करण्याची गरज आहे, लवकरच एकत्रित बैठक घेवून मार्ग काढला जाईल, असे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

            प्राचार्य फेडरेशन, शिक्षक शिक्षकेतर संघटना आणि विनाअनुदानीत संघटनाच्या मागण्यांबाबत समन्वय समिती स्थापन करणे गरजेचे आहे. या समितीच्या माध्यमातून मागण्या मांडल्यास लवकरात लवकर मार्गी लागतील. चांगल्या कामांसाठी शासन नेहमीच सकारात्मक राहिले आहे. संघटनांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

बटाट्याचा ब

 🌻🌸🌻🌸🌻🌸🌻

*बाळाचे पाय पाळण्यात*


लेखक:

©शैलेश महाजन 

योग शिक्षक, अध्यात्मिक साधक,

समुपदेशक.

( फ्रीलांसर कंटेंट राईटर )

varadsm@gmail.com

_____________________

👏 *श्री सद्गुरूंच्या कृपेने* 🌻 आज *बाळाचे पाय पाळण्यात दिसतात का?* हा अतिशय वेगळा, थोडा विनोदी व थोडा मार्मिक लेख लिहिण्याचा योग आला. लेख थोडा मोठा आहे पण गमतीशीर आहे. शेवटपर्यन्त वाचा. मजा येईल.😄😄


बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा अर्थ *लहानपणीच मुला मुलींचे गुण (दोन्ही अर्थी)😀 कळतात.*

(येथे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव नाही बरे😀)


ह्यासाठी एक उदाहरण घेऊ


*उदाहणादाखल :*👇

जेव्हा आई आपल्या मुलाला / मुलीला दुकानात जाऊन बटाटे आणायला सांगते तेव्हा *काय काय गंमत घडते* ते पाहू.आणि बाळाचे पाय पाळण्यात कसे दिसतात तेही पाहू!😇

( उदा. बटाटे १०रुपये किलो असतात असे समजू ) 


*आणि मुलांचे(मुला मुलींचे) विविध नमुने पाहू.*👇


*नमुना नं.१)* मुलगा सरळ दुकानात जातो १० रुपये दुकानदाराला देतो १किलो बटाटे घेतो. सरळ घरी येतो. बटाटे आईला देतो. 

*मोठेपणीचां साधा सरळ माणूस*


*नमुना नं.२)* बटाटे आणायला मुलगा रमतगमत दुकानात जातो व रमतगमत घरी येतो.

*मोठेपणी पर्यटक*


*नमुना ३)* मुलगा पटापट जातो व पटापट येतो.

*मोठेपणी कामाची घाई असलेला, उतावीळ*


*नमुना ४)* रस्त्यातील दुकाने बघत बघत जातो येतो.

*मोठेपणी खरेदीची आवड असलेला, शॉपिंग वाला*


*५)* रस्त्यात कुठे डोंबाऱ्याचा खेळ, जादूचा खेळ किंवा भिकारी वैगरे गाणे म्हणत असतील तर तेथे रेंगाळणारा.

*मोठेपणी संगीत, नाटक, सिनेमाची आवड असणारा*


*६)* मी आत्ताच जायला पाहिजे का? नंतर नाही का चालणार? असे प्रश्न विचारणारा.

*मोठेपणी आळशी*

 

*७)* मित्राला बरोबर घेऊन जाणारा.

*मोठेपणी मित्रपरिवारात*


*८)* स्वतः न जाता मित्राला बटाटे आणायला सांगणारा.

*मोठेपणी लीडर*


*९)* दुकानात जावून पैसे नीट मोजून देऊन नीट बघून बटाटे आणणारा.

*मोठेपणी व्यवहार कुशल*


*१०)* बटाटे आणून आई कडे देऊन तिथेच रेगळणारा काहीतरी खाऊ द्यावा म्हणून.

*मोठेपणी लोभी*


*११)* दुकान दाराला बटाटे स्वस्त दे म्हणून १० रुपये कीलोचे बटाटे ९ रुपये किलोने आणून १रुपया घरी परत देणारा.

*मोठेपणी काटकसरी, व कुटुंबावर प्रेम करणारा*


*१२)* १०रुपयाचे बटाटे ९ रुपयात घेऊन १ रुपयाचे चॉकलेट खाणारा.

*मोठेपणी फाळके बाज*


*१३)* १०रुपयाचे बटाटे ९ रुपयात घेऊन दुकान दाराला सगणार की १किलो बटाटे न देता ९०० ग्रॅम दे व १०० ग्रॅम चां १रुपया असे दोन रुपये घेऊन ते दोन रुपयाचा खावू खाणारा.

*मोठेपणी दलाल*


*१४)* दुकान दाराचे लक्ष नाही असे पाहून हळूच एक दोन बटाटे पिशवीत टाकणारा.

*मोठेपणी चोर*


*१५)* सकाळी बटाटे आण म्हणून सागितले असताना अग मी विसरलो, पैसे पडले, पैसे चालत नाहीत, बटाटे नव्हते, दुकान बंद होत. अशी खूप कारणे

 देणारा व इलाजच नाही म्हणून ज्याला बटाटे आणायला आई सांगते तो.

*सरकारी नोकरीत जाणार*


*१६)* नीट जाऊन नीट पॅकिंग करून काळजीपूर्वक सांभाळून घेऊन येणारं तो

*प्रायव्हेट नोकरीत लागणार*


*१७)* आई कडे एक बटाटा मागुन घेऊन तो मातीत लावण्याचा प्रयत्न करणारा किंवा कापून निरीक्षण करणारा.

*मोठेपणी शेतकरी किंवा शास्त्रज्ञ होणार*


*१८)* बटाटे आणून दिल्यावर आई ने दिलेला खाऊ इतरांना वाटून टाकणारा

*समाज सेवक*


*१९)* बटाटे आणायला चाललो आहे हे गावभर ओरडून ओरडून तेच तेच बरेच दिवस सांगणारा.

*रिपोर्टर*


*२०)* एकदा सकाळी १० रुपये घेऊन "हा लगेच आलो" म्हणून आश्वासन देऊन गेलेला व रात्री उशिरा हसत हसत घरी येऊन आईला जो सांगतो १० रुपये पडले (ज्याने १० रुपये खाल्ले) व आई ला म्हणतो उद्या परत १० रुपये दे मी नक्की बटाटे आणतो.

*तो राजकारणी होणार*


शक्यतो हे असेच असते आपला लहानपणी पासूनचा मूळ स्वभाव बदलत नसतो. जसे आपण मोठे होतो तसे आपल्यावर विविध प्रकारचे शेंदूर लेपन मात्र होते.


😇 बघा एक गंमत म्हणून विचार करुयात आणि आठवूयाआपले लहानपण

शोधुयात कोणाचे पाय किती पाळण्यात दिसत होते ते ?

किंवा आताच कोणी लहान आहेत त्यांचे पाळण्यातील पाय शोधायचा प्रयत्न करूयात. पण एक गंमत म्हणून ह!😀😀


👏धन्यवाद!👏

*आवडला त


र नक्की दुसऱ्याच्या पाळण्यात पाठवा.. . (म्हणजे watsap फेस बुक ला हो)*

😭😜😳😠😇😀☺

बाल हक्क

 बालकांच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांचे बालपण जपूया

– मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

            मुंबईदि9 : राज्यातील बालकांच्या हक्काबाबत जनजागृतीसह बालकांना न्याय मिळण्यासाठी बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे.परंतू आजही अनेक उपेक्षित आणि अनाथ बालकांना बालपण जगता येत नाही. या मुलांचे बालपण जपण्यासाठी विभागामार्फत सकारात्मक प्रयत्न केले जातीलअसे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

            मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या कामकाजाबाबत आज शासकीय निवासस्थानी आढावा बैठक झाली.

            या बैठकीस बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाहमहिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदनबाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव उदय जाधवसहसचिव श.ल. आहिरे तसेच आयोगाच्या सदस्य ॲड. निलिमा चव्हाणॲड. प्रज्ञा खोसरेॲड. जयश्री पालवेसायली पालखेडकरचैतन्य पुरंदरे  आदी उपस्थित होते.

            मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्याबालकाला जन्मजात जीवन जगण्याचा तसेच विकासाचा अधिकार आहे. कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या बालकांना विशेष संरक्षण आणि मदत शासनामार्फत दिली जाते. बालकांच्या विकासासाठी असलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीचे सक्षमीकरण करण्याबाबत तसेच बालकामगार प्रथा याबाबत व्यापक उपाययोजना करणेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

            राज्यातील अनाथएकल रस्त्यावरील मुलेबालकामगार यांच्या न्याय हक्कांसाठीशिक्षणासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या योजना जास्तीत जास्त बालकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध माध्यमाचा वापर करण्याच्या सूचना यावेळी मंत्री ॲड.ठाकूर यांनी संबंधितांना दिल्या. राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री ॲड.ठाकूर यांनी यावेळी दिली.

            राज्यातील बालकांचे सशक्तीकरण करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून विविध योजना व उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात महिला व बालविकास भवन बांधण्यात येणार असल्यामुळे योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहेअसे मंत्री ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

            श्रीमती शहा म्हणाल्यासामान्य जनतेला बालकांचे हक्ककायदे व नियम यांची माहिती व्हावी यासाठी ही माहिती असणारे पोस्टर सार्वजनिक ठिकाणीतसेच शाळा व शाळेजवळील परिसरात लावण्यात येणार आहेत. बालस्नेही ग्रामपंचायत उपक्रम आगामी काळात आयोगामार्फत राबविण्याचे नियोजन  आहे.

            या आढावा बैठकीत आयोगाच्या आस्थापना व लेखाविषयी  प्रश्नासंदर्भात चर्चा झाली.

------

प्राथमिक शिक्षक बदली

 प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू

----

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही

- हसन मुश्रीफ

 

            मुंबईदि. 9 : ग्रामविकास विभागामार्फत होणारी जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपीपारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे.  कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र, आता या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्यांना गती मिळेल. राज्यात आजमितीस जवळपास 2 लाख प्राथमिक शिक्षक असून या प्रणालीमुळे बदली प्रक्रियेत कोणत्याही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार नाहीअसे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सांगितले.

            जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून सन 2022 मधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या प्रणालीचे अनावरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमारउपसचिव का.गो.वळवीपुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समिती अध्यक्ष आयुष प्रसादसातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडापुणे स्मार्ट सीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलतेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा सचिन ओंबासेमुंबई मनपा सहआयुक्त अजित कुंभारएमएमआरडीए सहआयुक्त राहुल कर्डीलेत्याचप्रमाणे आज्ञावली विकसित करणारे विन्सीस आयटी सर्व्हिसेस आणि साय-फ्युचर इंडिया प्रा.लि.चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले कीनियुक्त अभ्यासगटाने मागील बदली प्रक्रियेत असलेल्या सर्व त्रुटी दूर करून सर्वसमावेशक अशी ऑनलाईन आज्ञावली विकसित केली आहे. पूर्वी शिक्षकांची बदली करताना विविध समस्या निर्माण होत होत्या. आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे बदली प्रक्रिया पारदर्शक होईल. त्याचप्रमाणे आता यापुढे शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन न होता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            अपर मुख्य सचिव श्री.राजेशकुमार म्हणाले कीया ऑनलाईन प्रणालीद्वारे बदली प्रक्रिया अतिशय सोपी व पारदर्शक होणार आहे. गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशासाठी शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतातत्या आता या संगणकीय प्रणालीमुळे पूर्ण होणार आहे. या संगणकीय प्रणालीत चुकीची माहिती भरल्यास ती अन्य शिक्षकांना पाहता येईलअशी सुविधा देण्यात आली आहे. ही प्रणाली देशातील कोणत्याही राज्यात नसून या आज्ञावलीला अन्य राज्यातून मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

            जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदलीच्या प्रचलित संगणकीय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली होती. या अभ्यासगटाने राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी विभागवार भेटी व चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्यक्ष बदल्या करतांना त्यांना बदल्यांसंदर्भात येणाऱ्या अनुभवांचा तौलनिक अभ्यास करून या अभ्यासगटाने अहवाल शासनाला सादर केला.

            जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षक संवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ग्रामविकास विभागाच्या 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाद्वारे बदलीचे सुधारित धोरण निश्चित केले आहे. यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताशाळांमधील घटणारी पटसंख्याअध्यापनातील स्थैर्यशिक्षकांना काम करताना येणाऱ्या अडी-अडचणी आदी विचारात घेण्यात आल्या.

            आंतरजिल्हा बदली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यास किमान 5 वर्षे सलग सेवा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पक्षाघातदिव्यांग कर्मचारीशस्त्रक्रिया झालेलेविधवाकुमारिका शिक्षकपरित्यक्ता तसेच वयाने 53 वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी त्याचबरोबर पती-पत्नी एकत्रिकरण आदींची विशेष संवर्ग शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.

            जिल्हांतर्गत बदली : जिल्हांतर्गत बदली करतांना ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण आणि विद्यमान शाळेत 5 वर्षे पूर्ण झाली आहेअशा शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हातील अवघड क्षेत्र आणि शाळांची यादी घोषित करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली असून यासंदर्भात प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. बदलीस पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील30 शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे पक्षाघाताने आजारी शिक्षक, दिव्यांग शिक्षक, शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, विधवा शिक्षक, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता-घटस्फोटीत महिला शिक्षक तसेच व्याधिग्रस्त शिक्षकांबरोबरच पती-पत्नी एकत्रिकरण आदी या विशेष संवर्ग शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली नको असल्यास अर्ज करावा लागणार आहे.


            शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी 6 टप्पे ठरविण्यात आले असून त्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या बदल्यांबाबत अनियमिततेची तक्रार आल्यास त्याचा निपटारा करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे


            या जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. या समितीने निविदा प्रक्रिया राबवून तयार केलेली आज्ञावली आणि प्रणालीचा प्रत्यक्ष वापर सुरू होत आ


            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा तर वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यांनी आभार मानले




संजय डी.ओरके, विसंअ/9जून20



22000.हे..

Featured post

Lakshvedhi