Friday, 10 June 2022

स्कूल chale

 राज्यातील शैक्षणिक वर्ष 13 जून पासून

विद्यार्थी 15 जूनपासून प्रत्यक्ष शाळेत

 

            मुंबईदि. 9- राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. तरदि. 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यातअसे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालकउपसंचालकशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष 23 जून रोजी सुरू होवून चौथा सोमवारदि. 27 जून 2022 रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

            दि. 13 ते 14 जून 2022 रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणेशाळेचे सौंदर्यीकरण करणेशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 प्रादूर्भाव तसेच आरोग्यविषयक बाबीच्या अनुषंगाने उद्बोधन करणे याचे नियोजन करण्यात यावे. तसेच विदर्भातील शाळांबाबत दि. 24 ते 25 जून 2022 रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येवून दि. 27 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यातअसे या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.

            शासनआरोग्य विभागस्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी देण्यात आलेले तसेच यापुढे देण्यात येणारे निर्देश / सूचनांचे काटेकोरपणे पालन होईलयाची दक्षता घेण्याचे तसेच शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे/ पालकांचे कोविड-19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने प्रबोधन/ उद्बोधन करण्यात यावेअसे निर्देशही श्री.मांढरे यांनी दिले आहेत.

 कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठीयुवा खेळाडूंना

प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे-बालेवाडीत राज्य कबड्डी असोसिएशनची दि. 15 जुलै रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

 

            मुंबईदि. 9 : राज्यात कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी व कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. तसेच राज्यात मॅटवरील कबड्डीच्या स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचनाउपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज दिल्या. दि. १५ जुलै रोजी बालेवाडी-पुणे येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणी समितीच्या सभेचे आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

            महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणी समितीच्या सभेचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेआमदार भाई जगतापउपाध्यक्ष शशिकांत गाडेउपाध्यक्ष शकुंतला खटावकरउपाध्यक्ष नेत्रा राजेशिर्केसहकार्यवाह ॲड आस्वाद पाटीलखजिनदार मंगल पांडेसहकार्यवाह रविंद्र देसाईमनोज पाटीलजिल्हा प्रतिनिधी बाबुराव चांदेरेनितीन बरडेलिना करपे-कांबळेसचिन भोसलेकबड्डी असोसिएशनचे समन्वयक अविनाश सोलवट यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकबड्डी महर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खेळाला मोठ्या उंचीवर पोहोचवले आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने विशेष प्रयत्न करावेत. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारे बदल आत्मसात करुन ते अंगिकारावेत. कबड्डी खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणीच्या सभेत कबड्डी दिन साजरा करणेविविध गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धाव्यावसायिक गट व इतर मान्यताप्राप्त स्पर्धेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक मुद्यावर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा संहिता २०११ नुसार तीन उत्कृष्ट व प्रख्यात खेळाडूंची राज्य सल्लागार समितीवर नियुक्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. असोसिएशनच्या शिवाजी पार्कस्थित इमारतीच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता यावेळी देण्यात आली.

*****


 पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे तातडीने पूर्ण करा

- पालकमंत्री शंभूराज देसाई

            वाशिम, दि. 9 (जिमाका) : देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे हे मुख्य तिर्थक्षेत्र पोहरादेवी आहे. संत सेवालाल महाराजांच्या समाधी मंदिर परिसरातील विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाने पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत 100 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या आराखड्यातील कामे यंत्रणांनी तातडीने पूर्ण करावीत. असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

            दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पालकमंत्री श्री.देसाई यांनी आज श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत आमदार संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोल्याचे अधीक्षक दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता व्यंकट मिठ्ठेवाड यांची उपस्थिती होती.

            पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे एका वर्षाच्या आत पुर्ण करावी. ही कामे करण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. सुधारित कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात यावे. या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता इमारतीच्या अंतर्गत सजावटीची कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावी. मंत्रालयस्तरावरुन पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण जाणार नाही. असे त्यांनी सांगितले.

            विकास आराखड्यातील 14 कोटी रुपयांची उर्वरित कामे त्वरीत सुरु करावी. असे सांगून श्री. देसाई म्हणाले, संबंधित यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावी. सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उणीवा राहणार नाहीत याबाबतची दक्षता घ्यावी. आराखड्यातील कामे करण्यासाठी मंजूर मर्यादीत रकमेच्या अंतर्गत विविध बाबींसाठी जिल्हास्तरीय समितीने निधी खर्च करण्याचा निर्णय घ्यावा. निधी खर्च होताच उर्वरित निधीची मागणी केल्यास निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असे ते म्हणाले.

            आमदार श्री. राठोड म्हणाले, तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत कार्य करताना यंत्रणांनी कालमर्यादा निश्चित करुन कामे पूर्ण करावी. या आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या समितीला पूर्ण अधिकार देण्याबाबतचे प्रधान सचिव (वित्त विभाग) यांच्या स्वाक्षरीचे पत्र काढण्यात आल्याचे श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.

            जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती यावेळी दिली. या सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मीणा, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, सार्वजनिक बांधकाम (विद्युत)विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता बोकडे व मानोरा तहसिलदार श्री. किर्दक यांची उपस्थिती होती.


००००

Nagar parishad सदयत्व

 नगरपरिषदानगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या

आरक्षणाची 13 जूनला सोडत

 

            मुंबईदि. 09 (रानिआ) : राज्यभरातील 216 नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 15 ते 21 जून 2022 या कालावधित हरकती व सूचना दाखल करता येतीलअशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज येथे केली.

            आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या 216 मध्ये 208 नगरपरिषदा आणि 8 नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिलाअनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी उद्या (ता. 10 जून) नोटीस प्रसिद्ध करतील. 13 जुलै 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईलअसेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

-0-0-0--


 The 'SEA' is same for 'ALL' but some take 'PEARLS' some take 'FISHES' & some come out with just 'WET LEGS'..

LIFE is common for all but we get what we TRY for..


Good morning 🌹🌹


 

 सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षणासाठी

     20 जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन


            मुंबई, दि. 9 :- मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीने या व्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थ्यांना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते. मुंबईतील वर्सोवा येथील प्रशिक्षण केंद्रात दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणाच्या १२८ व्या सत्रासाठी इच्छूकांनी २० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रदीप जगताप यांनी केले आहे.

            वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सागरी मत्स्यवयवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्त्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिके आदींचे प्रशिक्षण दिले जाते. १२८ व्या प्रशिक्षण सत्रासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थ्यांकडून ४५० रुपये आणि दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थ्यांकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

            या प्रशिक्षणासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत, प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असावा, १८ ते ३५ वर्षे वयोगटातील असावा, पोहता येणे आवश्यक, किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण आवश्यक, मासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असून प्रशिक्षणार्थ्याकडे बायोमॅट्रिक कार्ड अथवा आधारकार्ड असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज करताना त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक असून दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थी असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गटविकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची स्वाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

            निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारी करणाऱ्या तरुणांनी आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह विहित नमुन्यातील अर्ज मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-६१ येथे २० जूनपर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रदीप जगताप संपर्क क्र. ८७८८५५१९१६ आणि यांत्रिकी निर्देशक जयहिंद सूर्यवंशी संपर्क क्र. ७५०७९८८५५२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशिक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे.


००००

Featured post

Lakshvedhi