Thursday, 26 August 2021

 *Seemantini * नावाचा अर्थ : *"एक अशी व्यक्ती आहे जी दुसऱ्यांच्या समस्यां दरम्यान त्यांच्या सोबत उभी राहते."* 😀

अशा प्रकारे तुमच्या नावाचा खरा अर्थ शोधा

👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

*https://marathi.mallu.fun/name/?meaning*

 कोविडचा धोका कमी झाल्यावर राज्यातील

यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देण्यात येणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

          मुंबईदि. 26 : कोविड पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली आहे. कोविडचा तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तविण्यात येत असल्याने कोविडचा धोका कमी झाल्यावर हळूहळू राज्यातील यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी अखिल भारतीय मराठी तमाश परिषदेच्या उपाध्यक्षा मंगला बनसोडेसचिव शेषराव गोपाळउपसचिव मोहीत नारायणगांवकरखजिनदार किरण ढवळपूरीकरसंचालक राजेश सांगवीकरसंचालक अविष्कार मुळेसंचालक मुसा इनामदार उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले कीराज्यातील लोककलावंतांना कोविड काळात आर्थिक सहाय्य देणे तसेच तमाशा फडाना मदत करणे यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.कोविड विषाणूचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी गेल्या काही काळापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.

            राज्यातील पूर्णवेळ तमाशा फड आणि हंगामी तमाशा फडांना प्रतिवर्षी शासनाकडून अनुदान मिळावेराज्यातील तमाशा फडांना एक तासांचा अधिक वेळ वाढवून मिळावागाव- यात्रा चालू करुन तमाशा फडांच्या कार्यक्रमांना परवानगी मिळावी अशा काही मागण्या असलेले निवेदन यावेळी उपस्थितांनी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांना दिले.

००००

 मद्यसाठयासह 18 लाख 80 हजार रुपये किंमतीचा माल जप्त

·       राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाची कामगिरी

            मुंबईदि. २५ : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठयासह १८ लाख ८० हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. मुंबई विभागाच्या भरारी पथकाने ही कामगिरी केली आहे.

            सोलापूर जिल्हयातील मोहोळ तालुक्यातील आढेगाव-तांबोळे रोडच्या उत्तरेस तपासणी केली असतागोवा राज्यात विक्रीस असलेले एकूण ३०१ पेट्यामध्ये परराज्यातील अवैध विदेशी दारू साठा करून त्याची विक्री करण्याचा उद्देश फरार आरोपीचा होता. या फरार आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आलेला असून आरोपीविरुध्द महाराष्ट्र प्रोव्ही. अॅक्ट १९४९ चे कलम ६५ (ई)८१८३ व ९० नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. गोवा राज्यात विक्रीस असलेले मद्यसाठासह एकूण रु.१८,८०,२४०/- इतक्या किंमतीचा गुन्ह्याच्या माल जप्त करण्यात आलेला आहे.

            राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमापअंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्माविभागीय आयुक्त सुनील चव्हाणराज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भरारी पथकाने ही कामगिरी केली आहे.

0000

 जलजीवन मिशन अंतर्गत नेवासा तालुक्यातील

नळ पाणीपुरवठा योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करा

     - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

           मुंबई दि. 25 : जलजीवन मिशनअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत नेवासा तालुक्यात जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

            जिल्हा परिषदेमार्फत २०२१-२२ च्या कृती आराखड्यात समाविष्ट योजनांचे अंदाजपत्रक तातडीने सादर करावे, अशा सूचनाही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

         जल जीवन मिशन अंतर्गत ५ कोटी रुपयांच्या वरील कामांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सर्वेक्षण व प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी राज्यस्तरावर प्रादेशिक विभागनिहाय एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हा परिषदेकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नेमणूक शासनामार्फत पुढील आठ दिवसात करण्यात येईल. ही नेमणूक झाल्यावर मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर संबंधित सल्लागारांसमवेत बैठक आयोजित करण्यात येऊन कामांना गती देण्यात येईल, असेही यावेळी ठरविण्यात आले.

           या बैठकीस मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकरपाणीपुरवठा विभागाचे सहसचिव तसेच जल जीवन मिशनचे प्रभारी अभियान संचालक प्रवीण पुरीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगरचे कार्यकारी अभियंता विजय वाईकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळउपविभागीय अभियंता एस एस दहिफळे उपस्थित होते.

0000

 वनविभागाच्या हद्दीत वसलेल्या मालाड पूर्वेतील वीज ग्राहकांना

घरगुती दराने वीज पुरवठा करण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

            मुंबईदि. 25 : पश्चिम उपनगरातील मालाड पूर्वेकडील आप्पा पाडा परिसरातील वनविभागाच्या हद्दीत वसलेल्या आंबेडकर व जामऋषी नगर वसाहतीतील वीज ग्राहकांना घरगुती दराने आकारणी करावीअसे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीजपुरवठादार अदानी इलेक्ट्रिसिटीला दिले.

             यामुळे या वसाहतीतील सुमारे साडेपाच हजार घरातील पंचवीस हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यावेळी दिंडोशी मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभूमहावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण व अदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी उपस्थित होते.

            मालाड पूर्वेकडील आप्पा पाडा परिसरातील वनविभागाच्या हद्दीत वसलेल्या आंबेडकर व जामऋषी नगर वसाहतीतील नागरिकांना वनविभागाच्या अडथळ्यामुळे वैयक्तिक घरगुती वीज जोडणी घेता येत नाही.  त्यावर तोडगा म्हणून सामायिक मीटरद्वारे वीज पुरवठा होत असल्याने त्यांना स्लॅब रेटचा फायदा होत नाही. त्यामुळे त्यांना वाढीव दराने वीज बिल भरावे लागत असून ते न परवडणारे आहे.

            यावर लवकरात लवकर तोडगा काढून तेथील ग्राहकांना वैयक्तिक वीज जोडण्या देऊन घरगुती वीज दराची आकारणी करण्याचे निर्देश डॉ.राऊत यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीला दिले. या बैठकीला स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी वन विभागाच्या अडथळ्यांमुळे वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे सांगितले. यावर या भागाचे सर्वेक्षण करून येत्या दि.15 सप्टेंबरपर्यंत अहवाल ऊर्जा कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश डॉ.राऊत यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीला दिले व वन विभागाच्या सहकार्याने यावर तोडगा निघेलअसे सांगितले.

 चिपळूणच्या लोकमान्य टिळक वाचन मंदिरासाठी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ग्रंथसंपदा रवाना

मराठी भाषा विभागाकडून अडीच हजार पुस्तके भेट

            मुंबईदि. 26 : चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथ संपदेचे महापुरामुळे नुकसान झाले होते. या वाचनालयासाठी  महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार ग्रंथसंपदा भेट दिली आहे. ही ग्रंथसंपदा घेऊन जाणाऱ्या वाहनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रवाना करण्यात आले.

            वर्षा शासकीय निवासस्थानी प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाईविभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणीमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटीलमराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादेसाहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या सचिव श्रीमती मिनाक्षी पाटील आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी या मराठी भाषा विभागाशी निगडित सर्व संस्थांच्या या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच त्यांनी भेट देण्यात येणाऱ्या ग्रंथसंपदेची माहिती घेतली.

            अतिवृष्टीमध्ये चिपळूण शहरात महापुराचे पाणी शिरल्याने सन १८६४ साली स्थापन झालेल्या व १५७ वर्षांची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरवाचनालयात वर्षानुवर्षे जोपासलेल्या अमुल्य अशा ग्रंथ संपदेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वाचनालयातील पुस्तकांचे नुकसान विचारात घेऊन वाचनसंस्कृती  वातावरण परत पूर्वपदावर यावे यासाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने अडीच हजार पुस्तके देण्यात येत असल्याची माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

            अनेक वर्षाची समृद्ध वाचन परंपरा असलेल्या या वाचनालयाला मदत व्हावीवाचकांना पुन्हा पुस्तके वाचनासाठी उपलब्ध व्हावीत आणि वाचनसंस्कृती अखंडीतपणे प्रवाहीत राहावीया हेतूने वाचनालयाला राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या कार्यालयांच्या पुढाकारातून मराठी भाषा विभागाकडून वैविध्यपूर्ण विषयांवरील मौलिक अशी अडीच हजार पुस्तके भेट देण्यात आली आहेत.

Featured post

Lakshvedhi